
प्रविण काळे महाराष्ट्र शासनाच्या 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' पुरस्काराने सन्मानित परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अधिकारी पदावर कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री. प्रविण काळे यांची ओळख आहे. आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम प्रविण काळे करत असतात. काम करत असताना अडचणी येतात पण त्या कशा सोडवायच्या हे प्रविण काळे यांच्याकडून शिकावे. कारण कामाचा व्याप कितीही असला तरी सर्वसामान्यांची सेवा करणे हा एकच ध्यास उराशी बाळगणारे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून प्रविण काळेे यांचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी या पुरस्काराने आज त्यांना सन्मानित केले आहे. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा जीवने साहेब व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके साहेब, प्रकल्प संचालक पाटील मॅडम व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद बीड येथे त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रविण काळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती त्यांना मिळाली असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रविण काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल...