"अगा जे घडलेचि नाही........!"

परळीतील 'त्या' आपहरण प्रकरणी 'नवा ट्विस्ट' आला समोर ! 'किडनॅपिंग नव्हे कोम्बिंग ऑपरेशन': किडनॅपर नव्हे ते निघाले पोलीस ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... गेल्या अकरा दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास केला. यातून या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते किडनॅपिंग नाही तर पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन होते हे आता स्पष्ट झाले आहे. राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून दि. 06/05/ 2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली. यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ ...