
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा परळी वैजनाथ, प्रतिनिधी... क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्तशिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना परळी वैद्यनाथ च्या वतीने रविवार दि 04:05:2025 रोजी सकाळी 09:00 वाजता क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्त भजनी मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन श्री संत गुरुलिंगस्वामी मठ संस्थान, बेलवाडी या ठिकाणी केले असुन स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येणार आहेत तरी या कार्यक्रमास जास्ती जास्त भजनी मंडळाने सहभाग नोंदवावा व कार्यक्रमासाठी समाज बांधवानी तसेच भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,परळी वैजनाथ यांनी केले आहे.