प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन



मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

     ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

       अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने टाटांनी देशातच नव्हे तर जगभरात छाप सोडली.

    रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. ते 1991 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष बनले आणि 2012 पर्यंत त्यांनी समूहाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या कार्यकाळात, टाटा समूहाचा जागतिक स्तरावर विस्तार झाला, टेटली, कोरस आणि जग्वार लँड रोव्हर यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण करून, टाटा मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत कंपनीपासून जागतिक पॉवरहाऊसमध्ये बदलले.

     रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये सुप्रसिद्ध पारशी टाटा कुटुंबात झाला. त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सुनी टाटा. लहान वयातच त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.


रतन टाटा 1962 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि त्यांच्या कौशल्यामुळे आणि समूहामध्ये त्यांना मिळालेल्या विविध अनुभवांमुळे हळूहळू त्यांनी प्रगती केली. 1991 मध्ये, त्यांची टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.


यानंतर टाटा समूहात अनेक मोठे बदल झाले आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठा विस्तार केला. नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याबरोबरच, त्यांनी प्रतिष्ठित जग्वार लँड रोव्हर आणि कोरस स्टील सारखे मोठे अधिग्रहण देखील केले, ज्यामुळे टाटा समूहाने जागतिक व्यासपीठावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

    देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.  

कारकीर्द. 

     रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1936 रोजी मुंबईत झाला. टाटा 10 वर्षांचे असताना, 1948 मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. आजी नवजबाई टाटा यांनीच टाटांना दत्तक घेतले. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पुढे बिशप कॉटन स्कूल, शिमला, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. रतन टाटा यांनी अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्यापासून ते लिपिकपदाच्या नोकरीपर्यंत सर्व केले.


रतन टाटा यांची कामाविषयीची प्रामाणिकता आणि धडपड पाहून जेआरडी यांनी रतन टाटांना टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टीलमधून आपल्या उद्योग जगतातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. प्रचंड मेहनताच्या जोरावर टाटांनी समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम काम केले. ज्या सालात टाटांनी समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तो काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत खडतर होता. पंतप्रधान व्ही पी सिंह आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात भारताने खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 1990 ते 2012 या काळात त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषवले तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते.आज घडीला टाटा ग्रुपच्या ८० देशांत १०० कंपन्या आहेत आणि त्यामध्ये सव्वाचार लाख कर्मचारी आहेत.

परोपकार अन् दानधर्मासाठी रतन टाटा यांची विशेष ओळख होती. आपल्या कमाईतला ठराविक वाटा ते दरवर्षी धर्मादाय कार्यात खर्च करत असत. चार वर्षांपूर्वी देशावर कोव्हिडचे संकट आलेले असताना रतन टाटा यांनी पीएम केअर फंडाला १०० कोटी रुपये दिली होती.


*भारतीय उद्योगविश्वातील ‘टायटन’ आणि टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे.*


*सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवत ८ रुपयांच्या मिठापासून ते १ लाखात कार अशी विविध उत्पादनं त्यांनी भारतीय बाजारपेठेत आणली. देशाच्या औद्योगिक भरभराटीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासोबतच त्यांचे सामाजिक कार्य देखील उत्तुंग होते.*


*अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देश टाटा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.*


*रतन टाटा यांना सद्गती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!.*

*भावपूर्ण श्रद्धांजली!*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?