न.प. परळी वैजनाथ: जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणला; माजी नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

परळी नगर परिषद कार्यालयात घरकुल विभागातील एक करमचारी शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. या कर्मचाऱ्यांस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद या न प कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय- नौकरी (MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे शासकीय कामकाज करित असताना यातील आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1) अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3) शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुरन - 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),3(5) BNS सह कलम 3(1) (r) (s), 3(2)(va) अजाज अप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  उपवीभागीय पोलीस अधिकारी चार्ज गेवराई नीरज राजगुरु हे करीत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश असलेले अन्वर मिश्कीन शेख हे माजी नगरसेवक आहेत तर दुसरा एक आरोपी शेख अजीज इस्माईल हे  माजी नगरसेविकेचे पुत्र आहेत. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना