नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार


कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी


परळी वैद्यनाथ (दि. 04) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात मी त्या शनिवारपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. 


शनिवारी (ता.07) रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवात होईल. या गणेश महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना तसेच रामायण चित्रपटातुन देशाच्या घराघरात पोहोचलेली सीतेचा अभिनय अत्यंत उत्कृष्टरित्या केलेली अभिनेत्री क्रिती सनोन या दोघींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  


यावर्षीच्या गणेश महोत्सवात प्रतिवर्षी पेक्षाही उत्तम दर्जाच्या कलाकारांच्या उपस्थितीत परळी वासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी गणेशोत्सवाचे 10 ही दिवस अनुभवायला मिळणार आहे. 


असे आहेत कार्यक्रम

पहिल्या दिवशी सात सप्टेंबर शनिवारी अभिनेता संकर्षण कराडे त्याचबरोबर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तेजा देवकर, ऋतुजा जुन्नरकर, पूनम कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी 8 तारखेला रविवारी सायंकाळी प्रसिद्ध गायक कैलाश खेर व गायिका अभिलिप्सा पांडा यांच्या शिव भजन गीतांचा कार्यक्रम होईल. 


9 सप्टेंबर, सोमवार, अभिनेत्री अमृता खानविलकर, पूजा सावंत, समीरा गुजर, संस्कृती बालगुडे, प्रसंनजीत कोसंबी व अंशिका चोनकर यांचा महाराष्ट्राच्या तारका हा सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रम.


10 सप्टेंबर, मंगळवार : सुप्रसिद्ध बॉलीवूड सिनेतारका, ड्रीमगर्ल, हेमामालिनी यांचा राधा कृष्ण लीला दर्शवणारी शास्त्रीय नृत्याद्वारे विशेष प्रस्तुती.


11 सप्टेंबर, बुधवार : महाराष्ट्राची संस्कृती अंतर्गत या अभिनेत्री मानसी नाईक, माधुरी पवार, मीरा जोशी, हेमलता बने, ऐश्वर्या बदडे यांचा संगीतमय कार्यक्रम.


12 सप्टेंबर, गुरुवार : इंडियाज गॉट टॅलेंट फेम क्रेझी हॉपर्स ग्रुप आग्रा यांचा नृत्य थरार व हिंदवी पाटील व प्राजक्ता गायकवाड लावणी यांची जुगलबंदी.


13 सप्टेंबर, शुक्रवार : चला हवा येऊ द्या सहभाग - स्मिता गोंदकर, जुई बेंडकले, हेमांगी कवी, सागर करंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, श्रेया बुगडे व इतर


14 सप्टेंबर, शनिवार : महाराष्ट्राची हास्य जत्रा सहभाग - समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, चेतना भट व इतर.


15 सप्टेंबर, रविवार : अजय अतुल लाईव्ह, जगप्रसिद्ध गायक, गीतकार व संगीतकार अजय व अतुल गोगावले यांचा 50 कलाकारांच्या संचासह लाईव्ह गीतांचा कार्यक्रम.


16 सप्टेंबर, सोमवार - प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व टीमचा भीमगीतांचा खास कार्यक्रम.


दरम्यान या गणेश महोत्सवाच्या निमित्ताने धनंजय मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून परळी वासियांना तसेच बीड जिल्ह्यातील गणेश भक्तांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी अनुभवास मिळणार असून या गणेश महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाह वाल्मीक अण्णा कराड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?