● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

 परळी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार मैदानात: निवडणुकीत दोन राजेसाहेब देशमुख



  परळी वैजनाथ, प्रतिनिधी

 संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

     बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जांपैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे.

      बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.. आता गेवराई मतदार संघात 21, माजलगाव मतदार संघात 34, बीड 31, आष्टी 17 , केज 25, परळी 11 याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून सहा मतदार संघात 139 उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत. 

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार 

1 .धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

2. राजेसाहेब किशनराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 

3. धोंडीराम लक्ष्मण उजगरे बहुजन समाज पक्ष 

4.केदारनाथ वैजनाथ जाधव पीजेन्टस् ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

5. भागवत बबनराव वैद्य विकास इंडिया पार्टी

 6.साहस पंढरीनाथ आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा

 7.अल्ताफ खाजामिया सय्यद अपक्ष 

8.दयानंद नारायण लांडगे अपक्ष

9. राजेसाहेब उर्फ राजाभाऊ सुभाष देशमुख अपक्ष

10. शाकीर अहमद शेख,अपक्ष

11. हिदायत सादेकअली सय्यदअपक्ष


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?