MB NEWS:DIGITAL PAGE-दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश

 आपणा सर्वांना दिवाळीच्या तेजोमय ुभेच्छा!



लाख दिव्यांच्या उधळत ज्योतीआली ही दिवाळी,

ती येता सार्यांच्याच मनास हर्ष होतो भारी...

फराळफटाकेकपड्यांचा थाटच असे वेगळा,

कंदिलपणत्यारोषणाईचा रंगच असे न्यारा...

MB NEWS  DIGITAL PAGE च्या सोबतीने साजरा करु हा आनंद सोहळा...!

        अश्विन महिन्याची चाहूल लागली की आपल्याला दिपोत्सव साजरा करण्याचे वेध लागतात. दिवाळीत आवलेल्या पणत्या, दिव्यांची रोषणाई आणि आनंदी वातावरण यांनी आपल्या मनातील आणि बाहेरचा अंधार दूर होतो आणि आपले आयुष्य प्रकाशमय होतं. घरातील साफसफाई, आकाशकंदिल बनवणे, दिवे रंगवणे, रांगोळी काढणे, फराळ बनवणे हे तर आपण करतोच, पण दिवाळीची खरी रंगत वाढते ती या दरम्यान येणा-या दिवाळी अंकांमुळे. वेगवेगळ्या विषयांवरचे प्रतिभावान लेखकांचे लेख, कथा, कविता आणि मनोरंजक माहिती यांनी दिवाळी अंक भरगच्च भरलेला असतो.नव्या संकल्पनेतील  डिजीटल दिवाळी विशेष पेज देण्याचा हा प्रयत्न आहे. हा उपक्रम आपणांस नक्कीच आवडेल हीच अपेक्षा..... आपल्या प्रतिक्रीया नक्की कळवा.

                    - संपादक, एमबी न्युज. 

----------------------------------------

_____________________

 ■   दिवाळीबाबत दाते पंचांगकर्ते यांची माहिती

यावर्षी शास्त्रीयदृष्टया  दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते

         वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी आहे तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (धनत्रयोदशी विषयी सविस्तर खुलासा दाते पंचांगात पान ८९ वर दिलेला आहे.) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी एका दिवशी आलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. ग्रहणाचे दुसरे दिवशी 26 ऑक्टोबर रोजी बुधवारी दिवाळी पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे.
वसुबारस (21 ऑक्टोबर 2022, शुक्रवार)
या दिवशी सौभाग्यवती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.
ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।। अर्थ - हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळेस गाय वासराच्या मूर्तिची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.



धनत्रयोदशी, यमदीपदान (22 / 23 ऑक्टोबर 2022, शनिवारी / रविवार)
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील
अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

धनत्रयोदशी दोन दिवस खुलासा- दि. 22 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी द्वादशी समाप्ति सायं. ६:०३ आहे. सायंकाळी ६:०३ नंतर सूर्यास्त होत असलेल्या गांवी दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे तर काही प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.



दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोंकण, गोवा, गोधा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशात दि.. 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी करावी.

----------------------------------------


----------------------------------------

दि. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख गांवे सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)

_____________________


_____________________


नरक चतुर्दशी (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वपिक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8 ) औदुंबर 9) दक्ष 10 ) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त
लक्ष्मीकुबेर पूजन (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
शेतकऱ्यांसाठी मागर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।

अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।

भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥


अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

लक्ष्मीपूजन मुहूर्त (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
दुपारी ३:०० ते सायं. ६:००, सायं. ६:०० ते रात्री ८:३०, रात्री १०:३० ते रात्री १२:००
खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) (25 ऑक्टोबर 2022, मंगळवार)
हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.ग्रहणाचा वेध हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईकरिता दुपारी ४:४९ ते सायंकाळी ६:०८) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. (आपल्या गावच्या ग्रहणस्पर्श व मोक्ष वेळा पंचांगात पहाव्यात)
या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे पासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही.तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजन देखील
परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)
यापूर्वी 1995 मध्ये याच प्रमाणे 23 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होते, 24 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज आलेली होती. या नंतर 3 नोव्हेंबर 2032 मध्ये याच प्रमाणे दिवाळीमध्ये ग्रहण येणार आहे मात्र हे ग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही, उत्तर भारतामध्ये दिसेल.

_____________________


_____________________

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) (26 ऑक्टोबर 2022, बुधवार)
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते..
या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त (26 ऑक्टोबर 2022, बुधवार) पहाटे ३:३० ते ६:३०, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११:०० ते १२:३०
यमद्वितीया (भाऊबीज) - (26 ऑक्टोबर 2022, बुधवार)
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
    वर्षभरातील इतर सण उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात कुटुंबात एकोपा राखला जातो..प्रत्येक धर्मीयांच्या सण उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.
● दाते पंचांगकर्ते, सोलापूर

_______________________________


_______________________________


 ● परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ



रळी वैजनाथ /प्रा.रविंद्र जोशी.....

        काही वस्तू, काही व्यक्ती ,काही इमारती, काही जागा ,काही प्राणी, काही पक्षी, काही पदार्थ ,काही कला, काही परंपरा, काही रस्ते, काही चौक, या त्या भागाच्या- त्या त्या गावाच्या- त्या त्या परिसराच्या प्रतिनिधिक प्रतीक बनलेल्या असतात. 
      परळी व परिसराचे एक ऊर्जावान प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिरानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे. परंतु परळी औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे नेमके कोणते चित्र डोळ्यासमोर येणार तर सर्वांच्याच मनामनात आणि डोळ्यात साठवलेले प्रतीक म्हणजे थर्मलच्या धूर निघणाऱ्या तीन चिमण्या. आज या तीन चिमण्यांपैकी एक चिमणी आपल्यातून भूर उडून निघून गेली.
     खरंतर ही निर्जीव वस्तू परंतु प्रत्येक परळीकर आला आणि परळीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हुरहुर वाटली आणि मन काही काळासाठी का होईना विषन्न झालं प्रत्येकाची भावना आणि प्रतिक्रिया ही शोकयुक्त आणि हळवी होती यातच या निर्जीव चिमणीने प्रत्येकाशी आपले घट्ट नाते गेल्या पन्नास वर्षात कसे निर्माण केले होते याची प्रचिती येते.
   इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा झाली आहे.कोळशापासून  विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन नंबरची चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. 
      मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्री सुद्धा  भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व परिचित चिमणी पाडण्यात आली आहे. या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा.
           प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते तशी परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली  जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.
      मराठवाड्यातील एकमेव  विद्युत निर्मिती करणारे हे केंद्र आहे. 1971 साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या.
        मागच्या काही दिवसापासूनच कालावधी संपलेल्या संचातील साधन सामग्री बाजूला करण्याचे काम चालू आहे. यातच ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन एप्रिल 1979 मध्ये सुरू करण्यात आला होता. 
        2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 3 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॅटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची 120 मिटर उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.  

    परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत  भुर्रऽऽऽ उडाली. परंतु यातूनही तमाम परळी व परिसरातील नागरिकांची संवेदनशील भावना या चिमनी सोबत असल्याचे क्रिया प्रतिक्रिया करून दिसून आले ही चिमणी यापुढे दिसणार नसली तरी आजपर्यंतच्या पिढ्यांसाठी हा एक मोठा आठवणीचा ठेवा असणार आहे.
    येणाऱ्या नव्या पिढ्यांना ज्या ज्या वेळी परळीचा इतिहास सांगितला जाईल त्यावेळी या ठिकाणी तीन चिमण्या होत्या त्यातून धूर निघायचा अशा प्रकारच्या आठवणी सांगण्याची व थर्मल चा इतिहास नव्या पिढीला वारंवार सांगण्याची संधी मात्र आत्ताच्या पिढीला मिळणार आहे त्यामुळे आपलीशी झालेली चिमणी प्रत्यक्षात दुर ओळखताना दिसणार नसली तरी ती प्रत्येकाच्या मनात नक्कीच साठवलेली राहणार आहे.
-------------------------------------------------

■ संबंधित बातम्या......



● Video ●


-------------------------------------------------

-------------------------------------------------

|अभिनय:एक अवलोकन |

                - ✍️प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे
--------------------------------
अभिनय : नृत्य, नाट्य, चित्रपट यांसारख्या प्रयोगीय कलांमध्ये नटाने आशयप्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय. 

भरताने अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत : आहार्य, आंगिक, वाचिक, व सात्त्विक. या चार प्रकारांच्या विश्लेषणाने अभिनयकलेची अंगे स्पष्ट होतात : आहार्य अभिनयात नटाची कृती नसते. भूमिकेची ओळख पटण्यासाठी केलेली रंगभूषा, वेशभूषा व अलंकरण म्हणजेच आहार्य अभिनय होय. वस्तुतः ती नटाच्या भूमिकेच्या बाह्यांगाची सजावट होय. श्रीगणेश, दशानन यांसारख्या पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करीत. आंगिक अभिनय हाच भूमिकाप्रकटनाचा खराखुरा पाया आहे. हालचाली, अंगविक्षेप, हावभाव आणि चेहऱ्यावरील विकारदर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार. त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी कित्येक वेळा त्यांस उपकरणाची जोड देणे आवश्यक असते. आंगिक अभिनयातील लय आणि ताल यांची स्वाभाविक परिणामकारकता प्रतीत करून देण्याऱ्यासाठी नर्तिकेने पायात बांधलेले घुंगरू अथवा घेतलेली ओढणी यांसारख्या उपकरणांचाही आंगिक अभिनयातच अंतर्भाव करावा लागेल. भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी आंगिक अभिनयाला शब्दांची जोड देणे क्रमप्राप्त असते. नटाने उच्चारलेला सार्थ किंवा ध्वनित शब्द म्हणजे वाचिक अभिनय. रंगाविष्कारकलेला काव्याची जोड मिळाल्यानंतर वाचिक अभिनयास  अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूमिकचे प्रकटन करण्यासाठी नट कोणत्यातरी आदर्शाची नक्कल करीत असला, तरी ती नक्कल मूळ आदर्शाचे केवळ बाह्यदर्शन घडवावे या हेतून केलेली नसते. त्या आदर्शाचे सत्त्व व वैशिष्ट्य यांचे नटाला जे दर्शन घडले असेल, त्याचा प्रत्यय प्रेक्षकाला देऊन आपली अनुभूती परिपूर्ण करावी आणि प्रेक्षकाला आपल्या अनुभूतीत सहभागी करावे, असे सर्जनशील प्रयोजन त्याला अभिनयाद्वारे साध्य करावयाचे असते. यामुळे त्याला झालेले मूळ आदर्शाचे सम्यक ज्ञान हेच त्याच्या निर्मितीचे खरेखुरे स्वारस्य असते. अशा प्रकारच्या स्वारस्यमूलक भूमिकानिर्मितीच्या प्रयत्‍नाला ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा आहे. रामाची भूमिका करणाऱ्या नटाने रामाचे बाह्य रूप अथवा त्याचें शब्द यांच्याच द्वारा प्रेक्षकांना केवळ रामाच्या भूमिकेचा परिचय व त्याच्या कृतीचे व उक्तीचे संवाहन करण्यात समाधान न मानता, रामाचे व्यक्तिमत्त्व स्वतः समजून, ते पाहणाऱ्याला समजेल व उमजेल अशा रीतीने अभिव्यक्त करणे व त्याची प्रेक्षकांना प्रतीती देणे, हा सात्त्विक अभिनय होय. अभिनयाचा वापर प्रयोगीय कलांमध्ये होत असला, तरी प्रत्येक कलाप्रकाराच्या गरजा व मर्यादा यांनुसार त्या त्या कलाप्रकारातील अभिनयस्वरूपात फरक पडणे अटळ आहे.


||☞अभिनयाचे प्रकार☜||

अभिनयाचे चार प्रमुख प्रकार सांगितले आहेत -
अ.आंगिक

ब.वाचिक

क.सात्विक

ड.आहार्य

’अभिनय’’ च्या अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक धर्मी
नाट्य धर्मी
या व्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो
---------------------------------------------------------------
अभिनय म्हणजे एखाद्या व्यक्तीचा झालेला कायाप्रवेश (अभिनय करताना अपन एखादी व्यक्तिरेखा सकरतो म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या मद्धे आणतो) - दिलीप प्रभावळकर.
कलाकार हा दुप्पट आयुष्य जगतो एक स्वताचे आणि दुसरे तो ज्या व्यक्तिरेखा सकरतो त्यांचे.
---------------------------------------------------------------
||*अभिनय*|| -
’अभिनय’’ च्या अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोकधर्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो.
आंगिक अभिनय - 
आंगिक अभिनय म्हणजेच शारीरिक हालचाली, चेहरा आणि हावभाव या माध्यमातून भावना रसिकांपर्यंत पोहोचवणे.
सात्विक अभिनय -
सात्विक अभिनय म्हणजे ज्यमद्धे स्वेद, स्तंभ, कंप, अश्रु, वैवर्ण्य, रोमांच, स्वरभंग आणि प्रलय याची गणना होते.
वाचिक अभिनय - 
वाचा म्हणजे वाणी,बोलणे.शब्दोचारातुन भावना व्यक्त करने म्हणजे वाचिक अभिनय.
नाट्यवाचन,कथाकथन,आकाशवाणीवरून होणारी नाट्य ही वाचिक अभिनयाची उदाहरने आहेत.
शब्दाच्या नुसत्या उच्चारावरून पत्राची ओळख झाली पाहिजे,त्यावरून त्याचे वय,व्यवसाय व मानसिक अवस्था प्रगट व्हावी.
नाट्य संस्करामद्धे वाचिक अभिनयाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी आहेत.
* आपन श्वास घेतो त्यावेळी हवा श्वासावाटे आत घेणे ती शरीरात साठवणे,त्यासाठी दिर्घ श्वास घेउन हळू हळू तो सोडणे.
* ओंकार यामद्धे ॐ हा शब्द उच्चारायचा जितका जास्त वेळ ओंकार टिकत असेल तितका चांगला.
यामुळे स्वर लांम्बवने,आवाजात चढ़ उतार करने सुलभ जाते.
जिभेचे व्यायाम - # जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून नाकाच्या शेंडयाला लावण्याचा प्रयत्न करने.
# जीभ चक्राकार फिरवने.
# जीभ ओठांवरन फिरवने
# ल,ळ असलेले शब्द भरभर पण स्पष्टपणे म्हणणे.
आहार्य अभिनय
आहार्य अभिनय हे वास्तविक पाहायला गेले तर अभिनयाचे अंग नसून रंगभूषा आणि वेशभूषा यामधून प्रगट होते. उदा. - शंकराचा गेटअप.

||नाट्याभिनय: ||
नटाला आपल्या भूमिकेची अभिव्यक्ती रंगमंचावर करावी लागते. या रंगमंचावरील मर्यादा व अनुकूलता यांचा त्याच्या भूमिकाप्रकटनावर परिणाम होणे अटळ असते. आंगिक अभिनय दिसावा लागतो. वाचिक ऐकू यावा लागतो. प्रेक्षकांच्या दिसण्याऐकण्याची सुविधा अनेक भौतिक घटकांवर विसंबून असते. 

अभिनयाच्या स्वरूपातील नैसर्गिक आणि सांकेतिक हे दोन भेद मूलगामी आहेत. अगदी आरंभापासून तो आजपर्यंत त्यांचे अस्तित्व रंगभूमीच्या विकासाच्या सर्व अवस्थांतून दिसून येते. सर्व प्रकारच्या नाट्यप्रयोगांत या दोन्ही प्रकारच्या अभिनयाचा वापर करावा लागतो. सांकेतिक किंवा लाक्षणिक अभिनय प्रतीकात्मक असल्याने प्रेक्षक व नट यांमध्ये एकमेकांना संमत असलेले संकेत अस्तित्वात असतील, तरच तो अर्थवाहक होऊ शकतो. याच्या उलट नैसर्गिक अभिनय मानवी भावनांच्या सहजाविष्कारातून उद्भवणारा व अनुभवता येणारा असल्याने त्याचे आवाहन

श्रीगणेश, दशानन यांसारख्या पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करीत. आंगिक अभिनय हाच भूमिकाप्रकटनाचा खराखुरा पाया आहे. हालचाली, अंगविक्षेप, हावभाव आणि चेहऱ्यावरील विकारदर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार. त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी कित्येक वेळा त्यांस उपकरणाची जोड देणे आवश्यक असते. आंगिक अभिनयातील लय आणि ताल यांची स्वाभाविक परिणामकारकता प्रतीत करून देण्याऱ्यासाठी नर्तिकेने पायात बांधलेले घुंगरू अथवा घेतलेली ओढणी यांसारख्या उपकरणांचाही आंगिक अभिनयातच अंतर्भाव करावा लागेल. भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी आंगिक अभिनयाला शब्दांची जोड देणे क्रमप्राप्त असते. नटाने उच्चारलेला सार्थ किंवा ध्वनित शब्द म्हणजे वाचिक अभिनय. रंगाविष्कारकलेला काव्याची जोड मिळाल्यानंतर वाचिक अभिनयास  अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूमिकचे प्रकटन करण्यासाठी नट कोणत्यातरी आदर्शाची नक्कल करीत असला, तरी ती नक्कल मूळ आदर्शाचे केवळ बाह्यदर्शन घडवावे या हेतून केलेली नसते. त्या आदर्शाचे सत्त्व व वैशिष्ट्य यांचे नटाला जे दर्शन घडले असेल, त्याचा प्रत्यय प्रेक्षकाला देऊन आपली अनुभूती परिपूर्ण करावी आणि प्रेक्षकाला आपल्या अनुभूतीत सहभागी करावे, असे सर्जनशील प्रयोजन त्याला अभिनयाद्वारे साध्य करावयाचे असते. यामुळे त्याला झालेले मूळ आदर्शाचे सम्यक ज्ञान हेच त्याच्या निर्मितीचे खरेखुरे स्वारस्य असते. अशा प्रकारच्या स्वारस्यमूलक भूमिकानिर्मितीच्या प्रयत्‍नाला ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा आहे. रामाची भूमिका करणाऱ्या नटाने रामाचे बाह्य रूप अथवा त्याचें शब्द यांच्याच द्वारा प्रेक्षकांना केवळ रामाच्या भूमिकेचा परिचय व त्याच्या कृतीचे व उक्तीचे संवाहन करण्यात समाधान न मानता, रामाचे व्यक्तिमत्त्व स्वतः समजून, ते पाहणाऱ्याला समजेल व उमजेल अशा रीतीने अभिव्यक्त करणे व त्याची प्रेक्षकांनी प्रतीती देणे, हा सात्त्विक अभिनय होय. अभिनयाचा वापर प्रयोगीय कलांमध्ये होत असला, तरी प्रत्येक कलाप्रकाराच्या गरजा व मर्यादा यांनुसार त्या त्या कलाप्रकारातील अभिनयस्वरूपात फरक पडणे अटळ आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

■ दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश

गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)


            सूर्योदयापासून सुरू होणारा प्रत्येक दिवस मानवी सभ्यतेच्या महान गाथेतील एक सुवर्ण अध्याय म्हणून येतो. पण काही दिवस आपल्यातच इतके महत्त्वाचे संदेश घेऊन येतात की मानव समाज त्यांना युगानुयुगे विसरू शकत नाही. असे अविस्मरणीय दिवस सण किंवा उत्सव म्हणून साजरे केले जातात. विशेषत: सणांच्या संदर्भात भारत हा सर्वात समृद्ध देश आहे. सण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. ते जीवनावश्यक आणि पौष्टिक आहेत. कारण भारतीय सणांमध्ये ती ऊर्जा आहे, ज्यामध्ये कर्मकांडापासून वंचित राहिलेल्या मानव जातीला पुन्हा जिवंत करण्याची क्षमता ठेवते.


        कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा  'दीपावली उत्सव'या सांस्कृतिक उत्सवांच्या मालिकेत, मुकुटमणी स्थानावर आहे. या उत्सवाच्या नावावरूनच त्याचे तेज आणि दिव्यता दिसून येते. 'दीप' म्हणजे दिवा, 'अवली' म्हणजे पंक्ती. म्हणजेच दिव्यांची पंक्ती. या सणाच्या दिवशी, लखलखणारे दिवे एकच संदेश देतात – तुमच्या अंतरंगातील तमोगुण दूर करा. मिणमिणते दिवे आपल्याला अंतर्मनात ईश्वर-ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्यास सांगतात, अमावस्या कितीही अंधारलेली असो, अंतरंगात आमच्यासारखे प्रकाशमान व्हा.


       हा उत्सव भव्यतेचा उत्सव नाही. तो महान संदेशांचा वाहक आहे. दीपावली साजरी करण्यामागचे सर्वात लोकप्रिय कारण पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की हा मुख्यतः श्री राम-सीता अयोध्येत परतल्याचा आनंदाचा उत्सव आहे. त्रेतायुगातील हा संपूर्ण प्रसंग एक अलौकिक संदेश देऊन जातो. अध्यात्मिक दृष्टिकोनानुसार सीता हे आत्म्याचे प्रतीक आहे. मनाच्या रूपात रावणाचे शरीर म्हणून तो लंकेत कैद आहे. मनातील इच्छा आणि विकार हे आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. नाना प्रकारच्या यातना आणि प्रलोभने देऊन ते आत्म्याला सतत त्रास देत आहेत. अशा स्थितीत श्री हनुमान रामदूत म्हणून अशोक वाटिकेत पोहोचले, अशी महती आहे. हरणाच्या वेळी रावणाचा ऋषी वेश पाहून सीताजींची एकदा फसवणूक झाली होती. त्यामुळेच यावेळी त्यांचा हनुमानजींवर विश्वास बसला नाही. त्यांनी रामदूत असल्याचा पुरावा मागितला. हनुमानजींनी त्यांच्यासमोर भगवान श्रीरामाची मुहर पुरावा म्हणून मांडली. या रिंगणात सीताजींना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे पाहूनच त्यांनी हनुमानजींना रामाचे दूत म्हणून स्वीकारले. परमेश्वराच्या अलौकिक दर्शनाने निराश झालेल्या सीतेच्या मनात अढळ विश्वास निर्माण केला की तिला लवकरच परमेश्वराच्या भेटीचा आनंद मिळेल. हीच श्रद्धा, हे आश्वासन प्रत्येक युगात, प्रत्येक जीवाला स्वतःसाठी हवे असते. रामदूत हनुमान हे परिपूर्ण सतगुरूचे प्रतीक आहे. आपल्या आत्म्यालाही अशा सत्गुरूची नितांत गरज आहे, जेणेकरून मनाच्या रूपाने रावणाच्या राजवटीतून मुक्त व्हावे.


       ही कथा आणखी एका महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. सध्या सर्वत्र भगवे कपडे घातलेले प्रचारक दिसत आहेत. अशा स्थितीत सीताजींप्रमाणेच प्रत्येक साधकाला आपल्या सिद्धतेचा पुरावा त्यांच्याकडून मागावा लागतो. जे परिपूर्ण गुरू आहेत, ते ब्रह्मज्ञानाचा शिक्का पुरावा म्हणून देतील. या ज्ञानाद्वारे शिष्याला त्याच्या आत असलेल्या परम प्रकाशाचे (श्री राम) प्रत्यक्ष दर्शन होईल. किंबहुना हाच गुरूंच्या सत्यनिष्ठेचा पुरावा आहे. मग ज्याप्रमाणे सीताजींना आपल्या मुक्तीची पूर्ण खात्री झाली होती, त्याचप्रमाणे खर्‍या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याला पूर्ण खात्री होते. त्याच्याकडून भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर तोही मुक्तीच्या मार्गावर पूर्ण श्रद्धेने आणि भगवंताशी एकरूप होऊन पुढे जातो आणि निःसंशयपणे गंतव्यस्थान प्राप्त करतो. परिपूर्ण सतगुरूच्या सान्निध्यात, शिष्य स्वतःमध्ये अलौकिक दीपावली साजरी करतो. सत्गुरूंच्या कृपेने त्यांचे हृदय दिव्य दिव्यांनी, असंख्य दीपशिखांनी आणि सोनेरी प्रकाशाने भरलेले असते आणि हेच या प्रकाशोत्सवाचे सार्थक रूप आहे. दिव्य ज्योती जागृति संस्थेतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

     संकलन: संतोष जुजगर, परळी वैजनाथ. 

------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !