पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प

पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प चाकरवाडी - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती.. बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ...