पोस्ट्स

मे १८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

इमेज
  पवनचक्की गोळीबार प्रकरण:सुरक्षा रक्षकासह चोरट्यांवर गुन्हा बीड, प्रतिनिधी : तालुक्यातील लिंबागणेशजवळील पवनचक्कीचे काम करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या १५ चोरट्यांविरोधात सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे. तर बचावासाठी केलेल्या गोळीबारात चोरटा मृत झाल्याने सुरक्षा रक्षकावरही गुन्हा दाखल झाला आहे. नेकनूर पोलिसांत हे गुन्हे नोंद झाले असून रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.        लिंबागणेशजवळील पवनचक्कीचे काम ओटी पाॅवर ही कंपनी करत आहे. याच ठिकाणी २३ मे रोजी पहाटे १ वाजता चोरांची टोळी आली. त्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकासह इतरांवर लोखंडी रॉड, दगडफेक करून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुपरवायझर संजय गित्ते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच ठिकाणी रूपसिंग सरदारसिंग टाक (रा.पाटोदा) या सुरक्षा रक्षकाने चोरांच्या दिशेने गोळीबार केला होता. यात राजू उर्फ चिचा विष्णू काळे (वय २३ रा. तुळजापूर, जि.धाराशिव) याला पाठीमागून गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चिचाच्य...

नारळाचे झाड लावण्याचा उपक्रमात सहभागी न झाल्याचे कारण

इमेज
गावातील वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले नाही :घरावर दगडफेक व कुटुंबाला जमावाकडून मारहाण  नारळाचे झाड लावण्याचा उपक्रमात सहभागी न झाल्याचे कारण बीड , प्रतिनिधी: गाव स्वच्छता व गावात नारळांचे झाडे लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला नाही म्हणून घरावर दडगफेक करुन कुटूंबियांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडीत घडली. जखमी तांदळे कुटूंबियांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरावर दगडफेक करुन मारहाण केल्याचा आरोप कुंडलिक तांदळे यांनी केला आहे.  आपण नातेवाईकांच्या लग्नासाठी नेकनूरला गेल्याने मोहिमेत सहभागी झालो नाही. रात्री आपल्याला दंड मागण्यात आला. आपण नातेवाईकांचे लग्न असल्याचे सांगीतल्यांनतर लई माज आलाय असे म्हणून घरावर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्याचा आरोपही कुंडलिक तांदळे यांनी केला. यामध्ये कुंडलिक साहेबराव तांदळे, श्रीराम कुंडलिक तांदळे (वय ५५), प्रयागा श्रीराम तांदळे (वय ५०), संगीता कुंडलिक तांदळे (वय ३१), सरस्वती साहेबराव तांदळे (वय ७५) जखमी झाले असून त्यांच्यावर जि...

पशुसंवर्धन विभाग पहिल्या पाचमध्ये

इमेज
पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला 'कृषी'चा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील - ना. पंकजा मुंडे पुण्यात सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलसह विविध प्रयोगशाळेचे ना. अजित पवार व ना. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात उद्घाटन पुणे ।दिनांक २४।  मानवाचे व पशुंचे नाते अनादी काळापासूनचे आहे. मानवाच्या प्रगतीत पशुधनाचा वाटाही मोलाचा आहे. राज्याच्या विकासात्मक स्थित्यतरांमध्ये पशुसंवर्धनाचे योगदानही नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक व गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला 'कृषी'चा दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना.  पंकजा  मुंडे यांनी केले.        राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत, बीएसएल-3 व बीएसएल-२ प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भिय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल, औंध या संस्थांचे उद्घाटन उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  ...

वैष्णवीच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल

इमेज
ना.पंकजा मुंडे यांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची घेतली भेट ; परिवाराचे सांत्वन करत दिला धीर वैष्णवीच्या जगण्याचा हक्क  हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल पुणे ।दिनांक २४। वैष्णवी हगवणे वर मोठा अन्याय झाला आहे, ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी येथे सांगितलं.       ना. पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात वैष्णवीच्या माहेरी जावून तिचे वडिल अनिल कसपटे व कुटुंबियांची भेट घेतली ,त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना धीर दिला, त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. यासंदर्भात बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीच्या परिवाराला आज भेटले, त्यांचं म्हणण ऐकून घेतलं, त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी वर ज्या प्रकारे अन्याय झाला आणि तिचे प्राण गेले ते ऐकून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस देखील सुन्न झाला. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला लाडाने वाढवितात, तिच्या विवाहासाठी सर्वस्व पणाला लावतात, तिच्या सुखासाठी प्रयत्न करतात, पण अशा पध्दतीने मुल...
इमेज
अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह व अत्याचार;  परळीत आणखी एक पोक्सोचा गुन्हा दाखल   परळी / प्रतिनिधी..            परळी शहरातील इंद्रानगर भागात वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने विवाह करत अत्याचार केल्याची आणखी एक घटना समोर आली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय युवकाविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               पोलीस सूत्रांकडून मिळाल्याने माहितीनुसार शहरातील इंद्रानगर भागात राहत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस माणिक नगर भागात वास्तव्यास असलेल्या 22 वर्षीय युवकाने दि 17 ऑक्टोबर 24 रोजी आर्या हॉटेल समोरून उचलून नेत पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिच्या सोबत नागसेन नगर येथे लग्न केले. दि. 25/10/2024 रोजी ते दि.04/05/2025 या काळात तिच्याशी अनेकदा शारिरीक संबंध करून गर्भवती केले व शिवीगाळ करून मारहाण केली.त्रास असाह्य झाल्याने पीडित अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि 23  रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प...
इमेज
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा मृत्यू, कोयाळ गाव हळहळलं  धारूर (बीड) : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. मुंडे कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. सर्पदंश झाल्यानंतर दोघांची प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी सर्वत्र हळहळ निर्माण करणारा आहे.

बघा : कधीपासून कधीपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार बंद?

इमेज
२६ तारखेपासून तब्बल एक महिना परळीच्या उड्डाण पुलावरुन 'नो एण्ट्री' ! परळीत यायचंय तर पर्यायी रस्ते शोधा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंगस्थान असलेल्या परळी वैजनाथ शहरात प्रवेश करायचा झाल्यास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्याशिवाय गत्यंतरच नाही. मात्र आता तब्बल एक महिना परळी शहरातील मुख्य प्रवेशद्वारावरुन तुम्हाला वाहन घेऊन एन्ट्री करता येणार नाही. परळी शहरात यायचेच असेल तर परळी शहराच्या बाजूचे पर्यायी रस्ते व बायपास रस्त्याचा उपयोग करावा लागणार आहे. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली आहे.       परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरुस्ती करण्याकरिता पुलावरील वाहतूक एक महिना चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी जा.क्र.रा.म.उ. बि.ला/तां. शा/२०२/२०२५ दि.२९/ ०४/२०२५पत्र निर्गमित केले आहे....
इमेज
अल्पवयीन मुलीच्या बळजबरीने खांद्यावर हात टाकून फोटो काढले, नातेवाईकांना पाठवले: एकाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     दैठणाघाट या गावातीलच एका अल्पवयीन मुलीस वारंवार पाठलाग करुन त्रास दिला.बळजबरीने या अल्पवयीन मुलीच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढले तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने ते फोटो नातेवाईकांना पाठवले.या प्रकरणात एकाविरुद्ध विनयभंग, बदनामी केली म्हणुन पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील आरोपी युवकाने गावातीलच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला वारंवार त्रास दिला.तीचा वारंवार पाठलाग करुन जबरदस्तीने पिडीत मुलीच्या खांद्यावर हात टाकून तिच्या सोबत फोटो काढुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तिचा विनयभंग केला.या मुलीची व तीच्या आईवडीलांची बदनामी व्हावी या उद्देशाने हा फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठवुन हीच्या सोबत माझे 2 वर्षापासुन लफडं आहे.मी हीचे 8 वेळेस लग्न मोडले आहे असे खोटे सांगून बदनामी केली म्हणुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुरनं 225/ 20...
इमेज
  परळी शहरात प्रभागनिहाय नालेसफाई व स्वच्छता करून न.प.मार्फत हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी-चेतन सौंदळे परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी) मोसमा अाधीच्या पावसानेच परळी शहरातील नाल्या व गटारीतील पाणी रस्त्यावर येवून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांना अनेक प्रभागात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नगर परीषदे मार्फत तात्काळ प्रभागनिहाय नालेसफाई व  स्वच्छता मोहिमेद्वारे गटारी सांडपाणी वाहिन्यांचे प्रवाहीकरण तसेच नागरिकांच्या अडचणी व तक्रारीचे निवारण हेल्पलाईन क्रमांकाद्वारे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी परळी नगर परीषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.   याबाबत नगरपालिका प्रशासनाच्यावतीने अधिक्षक श्री.संतोष रोडे यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.  निवेदनात परळी शहरातील ओढे,मोठया नाल्या व नदीकाठी राहणा-या तसेच शहरी वस्तीभागातील सर्व प्रभागात तात्काळ नालेसफाई व स्वच्छता मोहिम राबवून नागरिकांच्या मुलभूत गरजांकरिता यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता,पिण्...
इमेज
  शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर ;41 दात्यांचे रक्तदान  परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)           येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास युवक,महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.              शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याशी श्री शनी मंदिरात गेल्या १३ वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त शुक्रवारी (ता.२३) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यात युवक, महिला, पुरुष यांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेकांनी सपत्नीक आपले रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तृत्व पारपाडले. या रक्तदान शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी आंबेजोगाई येथील सहकार्य लाभले. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन श्री श...
इमेज
गावातून घर उठवून लावण्याची धमकी देत वीटा व काठ्यांनी मारहाण; पाच जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गैरकायद्याची मंडळी जमवून मोटारसायकलला कट का मारला या कारणावरुन नागापुर कॅम्प येथे एका तरुणावर हल्ला करीत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच वीटा व काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत परळी ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील फिर्यादी रोहीत उमाकांत बनसोडे वय 20  रा. नागापुर कॅम्प ता. परळी वै. यास त्याच गावातील आरोपी 1) धनराज बंडु सोळके, 2) राम सुंदर सोळके, 3) कृष्णा सोळंके, 4) सुनिल सोळंके, 5) उध्दव सोळंके यांनी नागनाथ मंदिर समोर मोटार सायकलला कट मारण्याच्या कारणावरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, वीटांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी व साक्षीदारांना गावातून उठवुन लावण्याचीधमकी दिली. अशा अशयाच्या फिर्यादीवरून पाच आरोपीं विरुद्ध गुरनं 227/2025 कलम 118(...

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खैर नाही !

इमेज
  मंत्री पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ टाकला ;एकाविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ तयार करुन व्हायरल केल्याप्रकरणी सिरसाळा येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा येथील आरोपी  मतिन मणियार याने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा भाषणाचा व्हिडिओ व त्यामध्ये चारही कोपर्‍यात अश्लील फोटो लावून तो व्हिडिओ ' ग्रामपंचायत सिरसाळा' या वाॅटस्अँप ग्रुपमध्ये प्रसारी केला.याप्रकरणी नसीब रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 138/2025 कलम- 67(A) माहीती तंत्रज्ञा अधिनीयम सह कलम 296 भान्यासं 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि उस्मान शेख पो. स्टे. सायबर बीड हे करीत आहेत.

खड्ड्यात गेली जनभावना-असे वागू नये!

इमेज
परळीतील हा खड्डा बनतोय 'मौत का कुंवा' : किर्तीनगर रस्त्यावरील धोकादायक खड्डा; नगर परिषदेची 'अपकिर्ती'! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी नगर परिषदेच्या अत्यंत जन सुलभ कार्याची महती आहे. आपल्या सुनियोजित  नियोजनशून्य कारभरासाठीची नगर परिषदेची कीर्ती सर्वश्रुत आहे. एका बाजूला पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब परळी शहरात सुरू असताना दुसऱ्या बाजूला अनेक भागांमध्ये पडलेल्या खड्ड्यांनी डोके वर काढत नागरिकांची डोकेदुखी वाढवलेली आहे. अशाच प्रकारचा एक खड्डा मौत का कुवा बनलाअसुन या खड्ड्याने जीवघेणा धोका निर्माण केला आहे. निदान या खड्ड्याची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे.कीर्तीनगर मधील रस्त्यावर धोकादायक पडलेला हा खड्डा नगरपरिषदेला दिसत नाही का? अशी होणारी अपकीर्ती थांबवावी अशी अपेक्षा आहे.       परळी नगर परिषदेच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे. नगर परिषदेच्या अनेक विभागांना जबाबदाऱ्या दिलेल्या असल्या तरी या विभागातील सर्व संबंधितांना अन्य अति महत्वाच्या व्यापातून नागरि समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हे सर्वांना माहीत आहे. वाण धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही...
इमेज
पंकजा मुंडेंचा आणखी एक धडाकेबाज निर्णय:सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातीर्लणय: ३११ पदे भरण्याचा निर्णय पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.           पशुसंवर्धन विभाग सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या ही पदे भरण्याचा निर्णय घेतला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.       पशुसंवर्धन विभागाचे काम...

महापुरुषांच्या डीजे मुक्तजयंतीचा संकल्प

इमेज
महापुरुषांच्या जयंती उत्सवात माणूस जोडण्याचे प्रयत्न व्हावेत ; मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ परळी / प्रतिनिधी...      महापुरुषांच्या जयंती मध्ये डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नाचून तरुणाई बिघडवण्यापेक्षा वैचारिक आणि अध्यात्मिक विचार मंथनातून नवी पिढी घडवण्याचा संकल्प सिरसाळा पंचक्रोशीच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी त्रिजन्मशताब्दी सोहळ्यात करण्यात आला. जात-धर्माच्या पलिकडे जाऊन माणूस घडविण्याचा प्रयत्न अशा जयंती महोत्सवातून व्हावा असा आशावादही यावेळी सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.                    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सिरसाळा पंचक्रोशीच्या वतीने पंचदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा बुधवारी रेणुका माता मंदिर, सिरसाळा येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे तर उद्घाटक म्हणून शेतकरी...
इमेज
  महावितरण सहाय्यक अभियंता पदावर अमृता लखापती रूजू, तेली समाजाच्या वतीने स्वागत  परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या येथील उपविभागीय कार्यालयात नुकत्याच अमृता संजय लखापती सहाय्यक अभियंता (वर्ग २) पदावर रुजू झाल्या आहेत. प्रभारी उपकार्यकारी अभियंता अभिजीत राठोड यांनी त्यांना रुजू करून घेतले. याबदल तेली समाजाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.      अमृता लखापती यांचे उपविभागात आगमन झाल्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. कनिष्ठ अभियंता रूपाली घोडगे, सहाय्यक लेखापाल संतोष आलापुरे आणि लिपिक वीरेंद्र शिंपी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता अभिजीत राठोड यांनी अमृता लखापती यांना शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर बुधवारी (दि.२१) तेली समाजाच्या वतीने अमृता लखापती यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी कोलूघाणा सोसायटीचे उपाध्यक्ष सुर्यकांत व्यवहारे, संचालक संगमेश्वर फुटके,प्रा मधुकर शिंदे, छगन आप्पा क्षीरसागर, प्रा प्रविण फुटके,...

परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

इमेज
  शिवराज दिवटेला मारहाण होण्यापूर्वी माझ्या मुलाला जलालपुरात अमानुष मारहाण - समाधान मुंडेच्या आईने दाखल केला गुन्हा परळी वैजनाथ। प्रतिनिधी...     रत्नेश्वराच्या डोंगरात झालेली मारहाणीची घटना ही लहान लहान मुलांमधील आहे. मारहाणीची घटना ही वाटईटच आहे.परंतु व्हिडिओ व्हायरल झाला,अनेकांनी हे प्रकरण उचलून धरले.माझ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु या मारहाणीच्या घटनेच्या आधी माझा मुलगा समाधान यास कळत्या सवरत्या मोठ्या वयाच्या लोकांनी रिंगण करुन एकट्याला जनावरासारखे मारले आहे याचाही न्याय झाला पाहिजे अशी मागणी करत समाधान मुंडे याच्या आईने परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.       शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील एक आरोपी समाधान मुंडेंची आई छाया श्रीकृष्ण मुंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भागवत साबळे, सुरेश साबळे रा.जलालपुर व त्याचे ईतर सात ते आठ अनोळखी लोकांनी त्याची मोटार सायकल आडवुन त्याला खाली पाडून जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्याचे केस धरुन हातातील काठीने, बेल्टने, लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन जखमी केले अशा फिर्यादीवर...

परळी वैजनाथ ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल!

इमेज
मजूराच्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण परळी वैजनाथ: प्रतिनिधी..      तालुक्यातील पांगरी ता. परळी वै येथे राहणाऱ्या एका मजुराच्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण  झाल्याप्रकरणी परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, कैलास वैजनाथ आरगडे रा. ताडपांगरी ता. जि. परभणी  ह.मु. पांगरी ता. परळी वै. येथे मजूर म्हणून काम करतात. त्यांची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे.तीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन घेऊन गेला आहे अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन- 219/2025 कलम 137 (2), BNS  प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.
इमेज
आणखी एका व्हायरल व्हीडीओ प्रकरणी परळीत गुन्हा दाखल परळी वैजनाथ:शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरण घडल्यानंतर जुन्या मारहाणीचे  काही व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील एक आरोपी समाधान मुंडे याला १०ते १२ जणांनी मारहाण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता .याप्रकरणी त्याच्या आईच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातही २५.०७.२०२४ रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणी  व्हायरल व्हीडीओच्या अनुषंगाने योगीराज अशोक गिते रा. नंदागौळ ता. परळी वै. याच्या फिर्यादीवरून रस्त्यात आडवुन मोटारसायकलवर बळजबरीने बसउन विठ्ठल टेकडी येथे घेऊन जाऊन कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्याने माराहन करुन जखमी केले व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व सदर घटनेची मोबाईल मध्ये व्हीडीओ शुटींग केली. म्हणून १) सचिन विष्णु मुंडे २) अदित्य बाबासाहेब गित्ते ३) सुमीत ऊर्फ बबलु बालाजी गित्ते सर्व रा.नंदागौळ ता. परळी वै. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
इमेज
  प्रा. डॉ. काकासाहेब पोकळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित  परळी (वै.) - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील  राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. काकासाहेब पोकळे यांना नुकतेच राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      सदरील पुरस्कार डॉ. पोकळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला.          डॉ. काकासाहेब पोकळे यांच्या ह्या उपलब्धीबद्दल  संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, सहसचिव डॉ.योगेश  क्षीरसागर, सदस्य  डॉ. सारिका  क्षीरसागर तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. टी. देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. सिद्धार्थ जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
इमेज
  जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत भूरटी चोरी  परळी प्रतिनिधी.......       येथील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या प्रशालेत शाळेच्या छतावरील पाण्याच्या टाक्याची लोखंडी पाईपलाईन चोरीला गेल्याची घटना दिनांक 19 रोजी घडली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.      गणेशपार रोडवर जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मागे असणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक कन्या प्रशालेच्या छतावर पाण्याच्या सहा टाक्या आहेत. या टाक्याचे लोखंडी पाईप लाईन द्वारे पाणी शाळेतील पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी व  स्वच्छता गृहासाठी वापरले जाते. ही लोखंडी पाईप लाईन अज्ञात चोरट्याने कट्टर च्या माध्यमातून कापून नेली आहे.    याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पाईपलाईन चोरीला गेल्यामुळे शाळेतील पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शुक्रवारी रक्तदान शिबीर !

इमेज
  श्रीशनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न, अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्यास सुरुवात  परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)          भजनाच्या तालावर पावले खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात जय शनैश्वर घ्या टोप्या परिधान केलेल्या व दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही सोमवारी (ता.१९) श्री शनैश्वर जन्मोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली.      येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षापासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली. नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, ए...
इमेज
आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन जातीय रंग देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत बीड : जिल्ह्यातील सामाजीक सलोखा आबाधीत राखण्याची जबाबदारी प्रशासना बरोबरच जिल्ह्यातील नागरीकांचीही आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात सोशल मिडीयाचा वापर हा प्रत्येकाने जबाबदारीने करणे अपेक्षीत आहे. असे निदर्शनास आले आहे की, बीड जिल्ह्यात काही नागरीकांकडून आक्षेपार्ह व्हीडीओ किंवा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत. सदर आक्षेपार्ह व्हीडीओ किंवा फोटोची खात्री न करता काही समाजकंटकांकडून ते व्हायरल करुन त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजीक सलोख्याला तडा जात आहे. सोशल मिडीयावर पोस्ट होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टची प्रथम खात्री होणे गरजेचे आहे. तसेच अशा आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ व्हायरल न करता त्याबाबत लगतच्या पोलीस स्टेशनला जाऊन नागरीकांनी त्या व्हायरल व्हीडीओ/फोटोची खात्री त्याची कायदेशीर सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह व्हीडीओ/फोटो/पोस्ट वर सायबर पोलीस स्टेशनकडुन बारकाईने ...

अभिष्टचिंतन लेख:✍️ बालाजी ढगे

इमेज
  निर्भिड आणि सामाजिक जाणीव असलेला आदर्श पत्रकार : संतोष जुजगर         लोकशाही चा चौथ स्तंभ पत्रकारिता क्षेत्रात कोहिनूर हिरा. संतोषभाऊ जुजगर यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य ते सातत्याने आपल्या लेखनाच्या माध्यमातून करतात हे त्यांच्या   निष्पक्ष पत्रकारितेचे प्रतीक आहे  संतोषभाऊ जुजगर हे सत्य आणि निर्भिड पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.   *गावपातळीवरील समस्यांना वाचा  फोडणे:- त्यांनी स्थानिक जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला.सत्याचा पाठपुरावा सत्य मांडणे ही त्यांची खास शैली असून, त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना उजेडात आणले आहे.                    *नवीन पत्रकारांसाठी प्रेरणा:- त्यांनी अनेक नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करून योग्य दिशा दिली.   संतोषभाऊ जुजगर हे केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय असतात   विविध सामाजिक उपक्रमां...
इमेज
साखरपुड्यातच संपन्न झाला दोन अभियंत्याचा विवाह सोहळा शिंदे व कांदळकर परिवाराचा आदर्श, गौरवास्पद उपक्रम अंबाजोगाई -/वसुदेव शिंदे साखरपुड्यातच दोन अभियंत्यांचा शुभ विवाह सोहळा पुणे जिल्हयातील क्षेत्र आळंदी येथे मोठ्या थाटामाटात नुकताच संपन्न झाला. हा आदर्श दाखविणाऱ्या शिंदे कांदळकर या दोन्ही परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या बाबतची माहिती अशी की पुणे येथील नारायणराव कांदळकर यांची अभियंता असलेली कन्या मनिषा व बिड जिल्यातील केज तालुक्यातील मौजे होळ येथील रहिवासी असलेले संदिपान (काकाजी) नानाभाऊ शिंदे यांचे अभियंता असलेले तृतीय पुत्र रामेश्वर यांचा साखरपुडा नुकताच आळंदी येथे निश्चित करण्यात आला होता. त्यातच दोन्ही कुटुंबातील सदस्य व इतर नातेवाईक साखरपुडा आणि विवाह एकाच वेळी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि साखर पुड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याआधी साखरपुडा करण्याची पद्धत आहे ज्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांना स्वीकारतात आणि विवाहबंधनात बांधले जातात. साखरपुडा आणि विवाहाचा सोहळा एकाच वेळी करणे हा दुग्ध शर्करा योग असून हा सोहळा दोन्ही ...
इमेज
  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या परळी शहराध्यक्ष पदी सुमित गिरी यांची नियुक्ती नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने बीड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील केज, माजलगांव, अंबाजोगाई, माजलगाव, कार्यकारणी पुर्ण झालेली असून बीड, आष्टी, गेवराई, नेकनूर तालुक्यांची घोषणा लवकरच होणार होईल. परळी शहराध्यक्ष पदी सुमित गिरी तरुण युवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील वृत्तपत्र व पत्रकार क्षेत्रात कार्य करत असतांना असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. सुमित गिरी यांचे गेली दोन वर्षापासून पत्रकार म्हणून दैनिक बीडसत्ता वृत्तपत्रातून परळी तालुका प्रतिनिधी पदावर काम करत आहे. त्यांने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता राजकीय, वृत्तपत्रांच्या बातम्या देणे. परळी शहर अतिसंवेदनशील शहर व तालुका राज्यातल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना माहिती झाली आहे. परळी तालुका अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, अन्य सभासदांशी चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच बीड जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना किंवा पदाधिकारी यांना विविध प्रकारची माहिती व संपर्क करून  शहरातील निर...

आढावा बैठकीत ना पंकजा. मुंडे यांनी केल्या सूचना

इमेज
  भाविकांना सुलभ सोयी-सुविधा आणि वैद्यनाथ मंदिरचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकासकामे व्हावी ! तीर्थक्षेत्र विकास  योजना विकास कामांच्या आढावा बैठकीत ना पंकजा मुंडे यांनी केल्या सूचना  परळी वैजनाथ। प्रतिनिधी     राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर असुन त्यांच्या समवेत राज्याच्या पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या उपस्थित होत्या. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ना पंकजाताई मुंडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.         उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीक्षेत्र परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेण्यात आला. या बैठकीला पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते....

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश

इमेज
  परळीतील जुन्या थर्मलच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच नवीन संच उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना निधीची कमतरता भासणार नाही कामे दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करा अजित पवारांचे निर्देश परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक ९ ची उभारणी करणे, राख प्रदूषण नियंत्रण उपाययोजना जुन्या विश्राम गृहाचे नूतनीकरण, संच क्रमांक ६ ते ८ साठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत आदी मागण्याना सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवार यांनी याबाबत चे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने मागणी केली होती, त्यानुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज संबंधित अधिकारी यांनी अजित पवार यांच...
इमेज
  परळी वैजनाथ - गंगाखेड महामार्गावरील रस्त्याच्या पुलाचे काम ३ वर्षांपासून रखडलेलेच, नागरिकांना सोसावा लागतोय त्रास परळी/ प्रतिनिधी          परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून रखडले असून  फक्त ५ फुटांच्या रस्त्याच्या वादांमुळे हे काम रखडले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.            परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू असून संपूर्ण रस्ता पुर्ण झाला आहे मात्र या रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावरील फक्त पाच फुटांच्या जागेसाठी हे काम रखडले आहे. या रस्त्याच्या जागेचा जमीनमालक प्रदिप तातेड व  रेखा फड या दोघांमध्ये जागेचा वाद सूरु असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वादामुळे पुलाचे काम रखडले आहे. काम रखडल्याने या रस्त्यावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून राजकीय प्रस्थामुळे या वादाकडे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महामार...
इमेज
प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  परळी वै.:- यावर्षी इयत्ता दहावी मध्ये भरघोस यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा परळी येथील प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.  कु. अक्षरा सुनील घुले ९६% श्वेता विजय सावंत ९४% गौरी आदिनाथ मुंडिक ९४% अक्षरा रवींद्र दहिवाळ ८७% मनोज भागवत मुंडिक ९२% यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सचिन शेठ टाक श्री रमेश जी मुंडीक धारासुरकर ॲड अशोक शहाणे प्राध्यापक डहाळे सर श्री दिलीप बुरांडे युवा नेते विजय दहिवाळ श्री तेजस टाक भागवत मुडीक श्री आदिनाथ मुंडिक श्री रविंद्र दहिवाळ श्री स्वप्निल दहिवाळ श्री सुनील घुले श्री विजय सावंत श्री उमेश देवकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री रमेश जी मुंडीक यांनी आभार मानले.