पोस्ट्स

जून १५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
आश्वासनाची पूर्ती ; ना.पंकजा मुंडेंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे चौपदरीकरण होणार ; भरीव निधीची तरतूद  मुंबई।दिनांक २१। परळी मतदारसंघातील बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्ता रुंदीकरणाला आता गती येणार असून यासाठी भरीव निधीची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे, या कामासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.    विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना ना. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत  बर्दापुर ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली होती, हा रस्ता अरूंद असल्याने यावर वारंवार अपघात झाले होते, त्यामुळे ही मागणी पुढे आली होती, यावर गडकरी यांनी रस्त्यासाठी लवकरच निधी देऊन काम सुरू करू असे आश्वासन दिलं होते. याच मागणीसाठी ना.पंकजाताईंनी गडकरी यांची दिल्ली येथे भेटही घेतली होती. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या २०२५-२६ च्या वा...
इमेज
काव्या महिला कॉलेजच्या वतीने संत गजानन महाराज दिंडीस फराळ वाटप! अंबाजोगाई प्रतिनिधी :- आज अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांची पालखीचे आगमन झालं असता काव्या महिला महाविद्यालय तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.      अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले असता कॉलेजच्या मुलींनी व महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला काव्या महिला  महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयंत करपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा लोमटे मॅडम,फॅशन डिजाईन प्राध्यापिका शीला गायकवाड मॅडम ,आदमाने मॅडम पूजा नरवाडे मॅडम ,प्रा शिशिकात राडे ,प्रा मुकुंद काळे आतीश आदोडे ,विकास वाघमारे सर सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्व दिंडीतील वारकरी यांना फराळ वाटप केला.
इमेज
  श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत भक्तीमय वातावरणात स्वागत ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषाने शहर दुमदुमले अंबाजोगाई(वसुदेव शिंदे)  श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी दुपारी अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या अंबाजोगाई शहरात आगमन झाले.  शहरातील महिला,पुरुष भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम च्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषात एका पाठोपाठ सुंदर चालीवर भजने म्हटली जातात  प्रस्थानाच्या मार्गावर शहरांमध्ये विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा करण्यात आली पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठी अध्यात्मिक परंपरा असून या पालखी सोहळ्यात शेगाव येथून अश्व आणि मोठ्या संख्येने वारकरी सहभागी असून यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत.  श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध...

अनुभूती वारीची.....!✍️ संतोष कुलकर्णी

इमेज
  वारीची नादमय झुळूक – परळी ते अंबाजोगाई पहाटे पाच वाजता परळी मधून श्री गजानन महाराजांची पालखी अर्थात दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करणार होती.आम्ही सगळे पहाटे परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिराच्या प्रांगणामध्ये जमा झालो होतो.शहरातील हजारो महिला भगिनी ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत होते.पालखी अंबाजोगाई च्या दिशेने रवाना होण्याचा क्षण म्हणजे नव्या मुक्कामाच्या दिशेने पडलेले पाऊल.........परळी ते अंबाजोगाई हा 24 किलोमीटरचा प्रवास कसा होणार. हे सुरुवातीला मला वाटत होते.परंतु वारकरी बंधू-भगिनींच्या समवेत हा घाट चढून जाताना शहरात कधी पोहोचलो हे कळालेच नाही. परळी शहरालगत असणाऱ्या बालाघाट डोंगरांच्या घाटातून उतरती होती ती एक केवळ यात्रा नव्हे… ती होती एका विश्वासाची, भक्तीची, परंपरेची आणि नादमयतेची नदी ! परळीच्या उंच टेकाडांवरून जेव्हा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करत होती, तेव्हा अवघं वातावरणच भारलेलं होतं.दररोजच्या संसारातील ,ताणतणाव कधीच विसरून गेले होते.ऐकू येत होता फक्त श्री गजाननाचा जयघोष.या वारीमध्ये मी तादात्म्य होणं काय...
इमेज
  काळाचा दुर्दैवी घाला: सर्पदंशाने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू  परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)      तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सार्थक शिवाजी पोईनकर या अडीच वर्षीय मुलाचा घरातच सर्पदंशाने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी घडली आहे. यामुळे अतिशय गरीब कुटुंबावर काळाने घाला घातला.               तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी पोईनकर अतिशय गरीब कुटुंबातील असून घरात अडीच वर्षांचा मुलगा सार्थक एकटाच खेळत असताना अचानक कुठून तरी आलेल्या सापाने दंश केला. साप एवढा जहरीला होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला. साप चावल्यानंतर  तो अडगळीला पडलेल्या जुन्या पेटीत जावून बसला. सार्थकला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता. सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तोपर्यंत या मुलाला नेमके काय झाले ते कळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरातील सदस्यांनी घरात इतरत्र पाहिल्यास त्यांना अडगळीला पडलेल्या पेटीत हा साप आढळून आला. एका गरीब घरातील हसण्या खेळत्या अडीच वर्षांच्या म...
इमेज
आर्य समाज मंदिर दयानंद व्यायामशाळा येथे योगदिन साजरा  परळी -वै (प्रतीनिधी) 11वा जागतिक योग दिन आर्य समाज मंदिर दयानंद व्यायाम शाळा येथे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगासनास मान्यता देणारा दिवस आहे 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.  शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो व या दिवसाच्या माध्यमातून योगासनाचे फायदे सांगितले जातात योग दिनाच्या सुरुवात आंतरराष्ट्रीय संतुलन आणि शांती यासाठी आज दिवस प्रोत्साहन  देण्यासाठी करण्यात आज साजरा करण्यात आला. समाजात एकता शांतता आणि सौहार्दता वाढविण्यासाठी जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगभरात विविध स्तरावर याचा सराव म्हणजेच योगासनाचा सराव दैनंदिन जीवनामध्ये विविध वयातील लोक करत आहेत आणि याची लोकप्रियता दिवसेंदिवस बाल वया पासून प्रौढ वयापर्यंत च्या सर्व व्यक्तींमध्ये आणि सार्वत्रिक याची लोकप्रियता वाढतच जात आहे याचे सर्व आव्हान ओळखून भारताच्या पंतप्रधानांनी याची संयुक्त राष्ट्र संघ...
इमेज
अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदते !  "वैद्यनाथ" मधील योगदिनी डॉ. नयनकुमार आचार्य यांचे विचार     परळी वैजनाथ- (दि.२१)  सद्य परिस्थितीत वाढत्या शारीरिक, मानसिक विकारांना दूर करण्यासाठी "योग" हा मौलिक उपाय असून अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदू शकते, असे प्रतिपादन योग अभ्यासक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले.            येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (२१) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित योगासन, प्राणायाम व ध्यान शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर यांनी केले.               या शिबिरात श्री आचार्य यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, विविध आसने , भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम व ध्यानमुद्रा आदींचे प्रशिक्षण दिले. तसेच योगाच्या यम, नियम, ...
इमेज
नगर परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा परळीतील प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-      शहरातील  जिजामाता गार्डन येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन नगर परिषद परळी वैजनाथ व पतंजली योग समिती आणि जिजामाता महिला समूह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.          कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर परळीचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग साधना केली.  योग दिनानिमित्ताने नागरिकांसाठी योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा व जीवनशैली सुधारण्याचे प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले. स्थानिक योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन करत योगाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमात शेकडो नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सहभागींच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून येत होता. योग हा केवळ...
इमेज
  परळी वैजनाथ नगर परिषदेचा नेहमीप्रमाणेच अंध:कारमय कारभार ! गजानन महाराज पालखी सोहळा अंधारातच मार्गस्थ, भक्तगणांमध्ये संतापाचा सूर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –        संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक या मार्गावर आज (२१ जून) पहाटे ५ वाजता पालखी मार्गस्थ झाली. मात्र, यावेळी संपूर्ण पालखी मार्गावरील पथदिवे बंद होते. परिणामी, पालखी अंधारात मार्गस्थ होण्याची नामुष्की पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ओढवली. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भाविकांनी पहाटे लवकर उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, शहरातील मुख्य पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी, पालखी अंधारात पुढे जावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रकाशव्यवस्था अत्यंत आवश्यक असते. तरीदेखील प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता निष्काळजीपणाच ...
इमेज
एनडीए मध्ये कार्यरत असलेले देशमुख मुकुंद याचा छात्र सेनेच्या वतीने गौरव छत्रसेनानींनी सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे-मेजर एस पी कुलकर्णी  अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) - योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित एनसीसी विभागाच्या वतीने मोहा येथील तरुण देशमुख मुकुंद याची सैन्य दलात अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल एनसीसी विभागाच्या वतीने सत्कार व गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उप प्राचार्य प्राध्यापक आर व्हि कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक नारायण गोळेगावकर व मेजर एस पी कुलकर्णी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार थोरात यांनी तर सूत्रसंचालन लेफ्टनंट पदाची शिंपले केले आभार क्रेडट हर्षद लाड यांनी केले यावेळी प्राध्यापक मस्के ,लेफ्टनंट साधनाचा चामले व राजू साळवी यांची उपस्थिती होती  देशमुख म्हणाले की मुलांनी ध्येय आहे नेहमी उच्च ठेवावे मी ठरवले की मला सैन्यात अधिकारी व्हायचे आहे त्यासाठी मी त्या वेळेपासून खूप प्रयत्न प्रचंड परिश्रम शिस्त व इंग्रजीवर प्रभुत्व ठेवण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्न साकार केले मी आज एन डी ए मध्ये प्रशिक्षण ...

पोलीसांची धडक कारवाई!

इमेज
सिरसाळा परिसरात लाखोंचा गुटखा जप्त;एक गजाआड परळी / प्रतिनिधी....         परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत मौजे हिवरा शिवारात हिवरा गावात जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी पाटीजवळ राज्यात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.         पोलीस सूत्राकडून प्राप्त माहीतीनुसार सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत हिवरा शिवारात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका चारचाकी गाडीतून वाहतूक होणार आल्याच्या खबरीवरून ग्रामीण पोलिसांना गुरुवार दि 19 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कारवाई करत लाखोंचा गुटखा जप्त केला ज्यामध्ये 3 लाख रुपयांचा गुटखा आणि एक चारचाकी वाहन पोलिसानी जप्त करत एकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी ठाण्याचे कर्मचारी योगेश समुद्रे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 170/2025 कलम 123,223,274,275,3 (5) भा. न्या. संहिता अनव्ये1) बळीराम रामचंद्र नवले वय 31 वर्षे रा. फुलारवाडी ता. पाथरी जि. परभणी 2) शकील अन्सारी रा. पाथरी 3) गफार मगदुम शेख 4) अजीज उर्फ अजीम हैदर कुरेशी दोन्ही रा....
इमेज
श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोडवर नवीन कोनिकल पोल (पथदिवे) बसवा-बाळू फुले  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..     परळीतील मुख्य रस्ता श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोडवर नवीन कोनिकल पोल (पथदिवे) बसवा अशी मागणी एका निवेदनाद्वारे  बाळू फुले यांनी केली आहे.        नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोड वर नवीन कोनिकल पोल (पथदिवे ) प्लॅन मध्ये मुख्य रस्ता असताना सुद्धा श्री संत सावतामाळी प्रवेश कमान पर्यंतच कोनिकल पोल बसवण्यात आले आहेत तरी  मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून संबधितांना लवकरात लवकर सूचना देत गणेशपार भाग न वगळता श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोड वर नवीन कोनिकल पोल बसवून द्यावेत. अन्यथा समस्त गणेशपार भागातील नागरिकांना सोबत घेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

उबाठा शिवसेनेचा परळीत उपक्रम!

इमेज
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रमेश चौंडे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप परळी(प्रतिनिधी)  हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक रमेश चौंडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  मराठी माणसांचे प्रश्न हाती घेत स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा गुरुवार दि.१९ जुन रोजी ५९ वर्धापन दिन साजरा केला जातो.माजी नगरसेवक रमेश चौंडे यांनी गावभागातील सर्वात जुन्या असलेल्या नुतन केंद्रीय प्राथमिक शाळा व ज्ञानबोधीनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना रमेश चौंडे यांनी शिवसेनेची स्थापना,ध्येय धोरणे याविषयी माहिती सांगुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणापेक्षा समाजकारणावर आम्ही भर देत आलो आहोत. या कार्यक्रमास नुतन केंद्रीय शाळेतील शाळेतील शिक्षक मुज्जमील सर,सुवर्णकार मॅडम,ज्ञानबोधीनी विद्यालयाचे शिक्षक धुमाळ सर,क्ष...
इमेज
आरोग्याची वारी पंढरी दारी- आरोग्य विभागाचा सुत्य उपक्रम संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी आगमन निमित्ताने उपक्रम परळी / प्रतिनिधी आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक महान आणि पवित्र परंपरा आहे, ज्यात लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी चालत जातात. या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरवर्षी राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्था महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरवत असतात.आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रम: राज्य सरकारने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत परळी तालुका आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा आणि आरोग्य तपासणी आदी सुविधा पुरवल्या जात आहेत।  संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या परळी वैद्यनाथ या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत आरोग्य विभागाचे हजारो कर्मचारी, डॉक्टर्स आणि स्वयंसेवक सर्वच पालखी सेवेकरी यांच्यासाठी अतोनात प्रयत्नशील असतात.  शासकीय रुग्णालयातील कर्मचारी हे देखील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करतात आणि आवश्यक उपचार देतात ज्यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी, विशेष...
इमेज
  कन्या शाळा रोड ते बरकत नगर रोड वर  कोणिकल पोल उभरावे-श्रीनिवास राऊत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       कन्या शाळा रोड ते बरकत नगर रोड वर  कोणिकल विधुत पोल उभरावे. अशी विनंती या निवेदना मार्फत करण्यात येत आहे.       कन्या शाळे पासून ते बरकत नगर रोड वर पद्मावती गल्ली, आनंद नगर, इंद्रा नगर, कृष्णा नगर, कीर्ती नगर, गंगासागर येथील लोकांनाची ये जा करण्याची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे, त्या मुळे हा रोड खूप वरदाळीचा असल्या मुळे या रोड ला रात्रीच्या वेळी खूप अपघात ही होत असतात. त्याच प्रमाणे या रोड वर डॉ देशपांडे यांचे बाल रुग्णालय ही आहे त्या मुळे ही परळी सह तालुक्यातील लोकांची संख्या ही खूप  मोठ्या प्रमाणत आहे. त्याच प्रमाणे या रोड वर 2 महाविद्यालय, आणि शाळा ही आहेत. तरी या परिस्थिती मध्ये नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरय  लक्षात घेऊन या परिसरात लवकरात लवकर नवीन पद्धतीचे कोणिकल पोल  बसवावे  अशी मागणी श्रीनिवास राऊत यांनी केली आहे.
इमेज
  अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक परंपरेने समृद्ध असलेले एकमेव शहर होय-राजकिशोर(पापा) मोदी अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-   श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथील मोदी लर्निंग सेंटरमध्ये दिनांक 18 जून  रोजी झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या अंबाजोगाई शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.  अंबाजोगाई हे शैक्षणिक परंपरेने समृद्ध असलेले शहर असून, येथून नेहमीच मेहनती, हुशार आणि प्रेरणादायी विद्यार्थी घडले आहेत. या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत दिसून येते. न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता इतर शाळांमधील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. हीच खऱ्या अर्थाने शैक्षणिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव दर्शवणारी गोष्ट आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव करताना आम्हांला अतिशय आनंद झाला आसल्याचे मा. नग...

आत्महत्या करण्यापूर्वी शाखा व्यवस्थापकांना मेसेज

इमेज
मल्टीस्टेट शाखेच्या दारातच ठेवीदाराची गळफास लावून आत्महत्या !   गेवराई,प्रतिनिधी...      येथील छत्रपती मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेवीच्या रुपात ठेवलेली रक्कम मिळत नसल्याने एका ४६ वर्षीय व्यक्तीने शाखेच्या दारातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश आसाराम जाधय (वय 46, रा.खळेगाव ह.मु.गणेश नगर, गेवराई) असे आत्महत्या केलेल्या ठेवीदार व्यक्तीचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीत कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी म्हटले आहे की, मी व माझे पती सुरेश आत्माराम जाधव यांच्यासह राहत असुन शेतीचा व्यवसाय करून पोट भरते. मला एक मुलगी साक्षी (वय 21) व एक मुलगा शुभम (वय 18) असे दोन मुले असून ते दोघेही शिक्षण घेत आहेत. आम्ही आमच्या शेती व्यवसायाच्या बचतीतून मुलांच्या शिक्षणासाठी सन 2020 पासून एकुण 11 लाख 50 हजार मुदत ठेव हि छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठेवलेले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून आम्ही त्यांना वारंवार आमचे ठेव ठेवलेले पैसे परत द्या असे म्हणत होतो. परंतु ते आम्हाला ...

अध्यात्मिक संशोधनातून सरस्वती नदीची माहिती काय ?

इमेज
कांतीपुरीची ऐतिहासिक कथा: परळी वैजनाथ येथील प्राचीन "पुण्यसलीला सरस्वती" नदी ! श्रद्धा आणि अश्रद्धा, स्वीकार आणि नकार, वाचन, मनन चिंतन किंवा नुसतेच वाक् ताडन यांच्या हिंदोळ्यावर झुलनारे सरस्वतीचे आदिम अस्तित्व न्याहाळत असतांना पुरातत्त्वशास्त्र या अभ्यासविषयामुळे सर्वसामान्यांपासून अज्ञात असलेले सरस्वतीचे अनेक संदर्भही नजरेसमोर येत गेले. आणि या विषयावर सर्वसामान्य वाचकांसाठी काही लिहावे हा विचार दृढ होत गेला. संशोधनाच्या क्षेत्रात अंतीम आणि चिरंतन असं काही नसतंच. संशोधनातून समोर येणाऱ्या सत्यास वस्तुनिष्ठपणे तोलून स्वीकारणे एवढेच आपण करू शकतो.कारण धारणांचे धागे फार अदृश्य असतात. मुळात सरस्वती ही एक नदी प्रबळ सप्तसरितापैकी एक. प्राचीन. मानवसमूहास ती उपकारक ठरली म्हणून त्यांनी तिच्या स्तुतीपर ऋचा रचल्यात. त्यातून ती एक नदीदेवता झाली. नदी म्हणजे लोकमाताच. म्हणून नदीतमें-अंबीतमे - देवीतमे असा तिचा प्रवास होत गेला.  सरस्वती हे नाव उच्चारताच भारतीय माणसाच्या मनःचक्षूसमोर सर्वप्रथम उभी राहते ते एका विद्येची देवता मानली जाणाऱ्या देवतेचे रूप. आणखी थोडे खोलात शिरल्यास हे नाव भारतातील...
इमेज
बीड जिल्ह्यातील बालविवाह थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्धार बीड : जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांमार्फत संयुक्त आणि बहुआयामी उपाययोजना हाती घेतल्या असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिक्षण विभागाचे उपक्रम : जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये दर सोमवारी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली जाते. पथनाट्य, निबंध व रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे जनजागृती. वी ते बारावीपर्यंतच्या मुली १५ दिवसांपेक्षा अधिक शाळेत अनुपस्थित राहिल्यास, मुख्याध्यापकांनी ऑनलाइन माहिती भरून पाठपुरावा करण्याची जबाबदारी. महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न : DTF (District Task Force) बैठकीचे आयोजन दर तीन महिन्यांऐवजी आता दर महिन्याला. गेल्या वर्षी रोखण्यात आलेल्या २४५ बालविवाह प्रकरणांचे सामाजिक व आर्थिक विश्लेषण. बालविवाह रोखणाऱ्या ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते. शिक्षण पूर्ण करणाऱ्या बालविवाह थांबवलेल्या मुलींना सन्मान व पारितोषिके...
इमेज
  जिल्हाधिकाऱ्यांच्या "जनता दरबार" उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — 280 अर्ज निकाली, 234 प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही सुरू बीड : बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यातून तीन दिवस जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2 या वेळेत हा दरबार भरतो असून, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही केली जाते. सदर उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकूण 534 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 280 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित 234 प्रकरणांवर कार्यवाही सुरू असून, संबंधित विभागांना त्वरीत निकाल लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जांची माहिती व कार्यवाहीची स्थिती नोंदवण्यासाठी गुगल शीटद्वारे संकलन करण्यात येत आहे. _तालुकास्तरावरील समस्यांमुळे जिल्हा कार्यालयात गर्दी_ जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या तक्रारी प्रामुख्याने तालुकास्तरावरील असल्याचे निदर्शनास आले आहे. उपविभागीय व तहसील कार्यालयांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यामुळ...
इमेज
मुरूगानंथम एम यांची बदली रद्द:जितीन रहमान बीड जिल्हा परिषदेचे नवे मुख्यकार्यकारी अधिकारी मुंबई| प्रतिनिधी  — शासनाने श्री. जितीन रहमान, भाप्रसे यांची बदली करून त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे.      या आदेशानुसार, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावरील श्री. मुरूगानंथम एम., भाप्रसे यांच्या दिनांक १० जून २०२५ रोजीच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले असून, सदर पद वरिष्ठ समय श्रेणीत उन्नत करून श्री. रहमान यांना नेमण्यात आले आहे. श्री. रहमान सध्या वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या जागी श्री. पराग सोमण, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने श्री. रहमान यांना त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात नवे नेतृत्व लाभणार असून, जिल्ह्यातील विकास योजनांना नवे गतीमान मिळण्याची अपेक्षा ...
इमेज
प.पु. वामनानंद महाराज पुण्यतिथी निमित्त परळीत कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —          श्री चिन्मयामुर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती सद्गुरु परमपूज्य वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बडवे सभागृह, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे दि. 19 जून 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविक भक्तांच्या सहभागाने पुण्यतिथी  कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.00 वाजता तुकामाई पारायणाने होईल.त्यानंतर पंचपदी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.  आरती व महाप्रसादाच   सांगता होणार आहे. सर्व शिष्यवृंद, भक्तगण व भाविकांनी या पवित्र प्रसंगास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड सकल शिष्यवृंद परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
इमेज
  अल्पवयीन मुलीस विवस्त्र करत कुटुंबियांना मारहाण परळी तालुक्यातील घटना ;गुन्हा दाखल  परळी / प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचे कपडे फाडत कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना परळी तालुक्यात सारडगाव येथे समोर आली असून प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सारडगाव येथील भावकीतील वादातून सोमवार दि 16 रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास  गावातील सर्वे नंबर 409 मध्ये  यशवंत सोमाजी गवळी, श्रीराम सोमाजी गवळी, प्रशांत श्रीराम गवळी व ओमकेश श्रीराम गवळी (सर्व रा. सारडगाव ) यांनी संगनमत करून अंतोबा बाबू गवळी यांच्या शेतात जाऊन त्यांना फिर्यादी चा भाऊ सुधिर व आई रुक्मीण हिस शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने, लाथाबुक्यांने मारहाण करत अंतोबा गवळी यांची  पुतणी ही अल्पवयीन आहे हे माहित असुनही अरोपी ओमकेश याने तिच्या अंगावर बसुन तिचा पंजाबी टॉप फाडुन तिस उघडी करण्याचा प्रयत्न करत इतरांनी लाकडी दांड्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अंतोबा गवळी यांच्या ...
इमेज
दीर्घ सुट्टीतील प्रशिक्षणास विशेष रजा देण्यात यावी – मराठवाडा शिक्षक संघाची विभागीय उपसंचालक कार्यालयात मागणी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – राज्यभरात दीर्घ सुट्टीच्या कालावधीत घेण्यात आलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास विशेष रजा मिळावी, या मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने विभागीय उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून संघाच्यावतीने ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली की, दीर्घकालीन सुट्टीदरम्यान अनेक शिक्षक व सुलभकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या कालावधीत त्यांनी प्रशिक्षणासाठी सेवा बजावली असून, त्यांना न्याय देण्यासाठी विशेष रजा मंजूर करावी. ही मागणी करताना संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांनी नेतृत्व केले. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे निवेदन सादर करताना कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांत नाराजी व्यक्त करण्यात आली. या वेळी संघाचे पदाधिकारी नवनाथ मंत्री, अजय कदम, अशोक ढमढेरे, विलास चांदणे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, बाळू पवार, डॉ. पद्माकर पगार, संतोष सुरडकर, रावसाहे...
इमेज
एसपींच्या उपस्थितीत उद्या जनसंवाद बैठक - अंबाजोगाई उपविभागात नागरिकांसोबत संवाद साधण्याचा उपक्रम अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाई उपविभागात नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक विशेष जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास नवनीत काँवत (भा.पो.से), पोलीस अधिक्षक, बीड हे प्रमुख उपस्थित राहणार असून, श्रीमती चेतना तिडके (म.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीचे आयोजन उपविभाग अंबाजोगाईतील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले प्रश्न, अडचणी व सूचना थेट पोलिस अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इमेज
  परळी शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैद्यनाथ शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  शहरातील प्रसिद्ध व जुने व्यापारी शंकर अप्पा उदगीरकर यांचे नुकतेच निधन झाले होते, त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्यापारी भगवानराव डुबे यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दोन्ही कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव  धर्माधिकारी, जयपाल लाहोटी, चेतन सौंदळे, कुमार व्यवहारे, शंकर कापसे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
इमेज
  खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना परळी मतदारसंघात खत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - पेरणीच्या तोंडावर काही डीलर्स स्वतःकडे खताचा साठा असूनही तो लपवत असल्याचा व कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याच्या तक्रारी येत असून, कृषी विभागाकडूनही काही प्रमाणात खत येणे बाकी असून आवश्यक साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच स्थानिक डीलर्स कडे उपलब्ध असलेल्या साठ्याची आकडेवारी तात्काळ समोर आणावी, अशा सूचना आज माजी कृषमंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी खत व्यवस्थापन प्रमुख तसेच स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांना केल्या आहेत.  जून अखेर परळी मतदारसंघात आवश्यक असलेल्या युरियासह, डीएपी व अन्य आवश्यक खतांच्या साठ्यामध्ये जो फरक आहे, तो फरक रेक लावून तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत सूचना केल्या.  खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच प्रमुख मागण्या असलेली व नामांकित खते डावलून जाणी...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. जे. व्ही. जगतकर यांची नियुक्ती    परळीवैजनाथ, प्रतिनिधी... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. जे. व्ही जगतकर यांची नियुक्ती सेवाजेष्ठता नुसार संस्था व विद्यापीठाने केली आहे.       डॉ जे व्ही जगतकर यांना शिक्षण क्षेत्रातील व प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विविध परिषदा, शोध निबंधाचे वाचन त्यांनी केलेले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे व प्रदीर्घ अनुभवामुळे संस्थेने त्यांची प्राचार्य पदी नियुक्ती केलेली आहे.  या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  श्री धनंजय मुंडे , जवहार शिक्षण संस्थेचे सचिव  श्री दत्ताप्पा इटके यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. जे व्ही जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन हो...
इमेज
"हर घर नर्स, घर घर नर्स" या मोहिमेतून लाखो नर्सिंग कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी — अनिल जायभाये बीडकर यांची  माहिती मुंबई (प्रतिनिधी): देशातील तसेच परदेशातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी "हर घर नर्स, घर घर नर्स" ही भव्य मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जायभाये बीडकर यांनी दिली. या मोहिमेच्या अंतर्गत AIIMS, DMER, DHS सारखी शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम, ओल्ड एज होम, बेबी केअर सेंटर, होम केअर सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, अंगणवाड्या, शाळा (मराठी व इंग्रजी माध्यम), आदिवासी शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठे, बँका, मॉल्स, डि मार्ट, रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, तसेच विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये नर्सिंग स्टाफसाठी रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात अशा सर्व ठिकाणी एक नर्सिंग कर्मचारी असणे ब...
इमेज
"आज तू हवी होतीस.." या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जल्लोषात  पुणे  – डॉ. सदाशिव रोकडे लिखित "आज तू हवी होतीस.." या नव्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अखंडित कल्याणकारी ग्रुप व काकडे देशमुख संस्था आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात जल्लोषात पार पडला. कात्रज, पुणे येथे भरलेल्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तकासाठी प्रा. कल्याण राऊत यांनी प्रस्तावना लिहिली असून, मानवी भावभावनांचा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांमध्ये वेध घेणारा हा संग्रह रसिक वाचकांसाठी सादर करण्यात आला. प्रेम, विरह, मैत्री, निसर्ग, सामाजिक वास्तव, जीवनातील सुखदुःख, स्वप्नं आणि आत्मचिंतन अशा विविध विषयांवर आधारित या कवितांमधून मानवी जीवनाचे विविध पैलू शब्दबद्ध करण्यात आले आहेत. "आज तू हवी होतीस.." या संग्रहातील कविता केवळ भावनिक नात्यांचा आलेख नसून त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या, विचारांना चालना देणाऱ्या आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणाऱ्या आहेत. शब्दांचा गंध आणि भावनांचा गोडवा अनुभवण्यास मिळतो, असे मत यावेळी उपस...
इमेज
चि.रमण प्रदीप खाडे यांच्यावर वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड, सुरेश (नाना) फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडेच्या वाढदिवसाच्या निमित्त मित्रमंडळीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा व वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारांकडून साजरा करण्यात आला.दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व केक कापून तसेच प्रत्यक्ष भेटून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. दरम्यान आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या.             कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडे यांचा वाढदिवसनिमित्ताने अंबाजोगाई येथे आईसाहेब, फक्शन हॉल...

अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम

इमेज
पंतप्रधान मोदींमुळे 'सुशासन' ही देशाची संस्कृती बनली - ना. पंकजा मुंडे अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम : ना. पंकजाताईंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद अमरावती ।दिनांक १६। देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा गेल्या अकरा वर्षाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी याकाळात करण्यात आली असून सरकार म्हणजे सेवा या हेतूने काम केले जात आहे. मोदींमुळे सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे, असे सांगत त्यांच्या योजना सर्व सामन्यापर्यंत पोचवा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पुर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात भाजपातर्फे 'संकल्प से सिद्धी' हा उपक्रम राबविला जात आहे, याचाच एक भाग म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.   मोदी सरकारच्या लोक कल्याण कारी कामाचा लेखाजोखा मांडताना पंकजाताई पुढे ...