आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा

स्व.आर.टी. जिजा संयम आणि निष्ठेचे प्रतिक होते -पंकजा मुंडे

गंगापूजन कार्यक्रमात ना.पंकजा मुंडे यांनी दिला आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा

परळी वैजनाथ।दिनांक०८। 

माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या गोडजेवण कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

     ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, संयम, निष्ठा, प्रेम आणि जिव्हाळा म्हणजेच आर.टी. देशमुख जिजा होते.  त्यांच्या अचानक निधनाने मला मोठा धक्का बसला. ते केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर माझ्यासाठी एक भावनिक आधार होते. मी अनेक वेळा अडचणीत असताना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही चिंता दिसली नाही. अत्यंत शांत, संयमी आणि आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, ही खूप मोठी पोकळी आहे.

    यानिमित्त  हभप यशवंत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. त्यांनी ‘कर्तव्यनिष्ठ जीवनाची प्रेरणा’ या विषयावर भावस्पर्शी कीर्तन सादर केलं. कीर्तन श्रवण करताना पंकजाताईंच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व देशमुख यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !