पोस्ट्स

जुलै ६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहा महिन्यांनंतर धनंजय मुंडे सभागृहात बोलले; अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी!

इमेज
परळी वैद्यनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संचांच्या जागेत उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प नवीन नववा संच उभारण्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठी लवकरच व्यापक बैठक धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानसभेत घोषणा मुंबई (दि. ०८) - आज विधानसभेत आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर याच औष्णिक विद्युत केंद्रात शिल्लक असलेल्या जागेत नवीन नवव्या संचाची उभारणी करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यावर आज चर्चा झाली असली तरी या संदर्भात एक व्यापक बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासनही श्री फडणवीस यांनी दिले आहे.  परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात निष्कासित करण्यात आलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेवर अधिक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे हरित ऊ...