नेमकं आहे कुठे नगरपरिषद प्रशासन?- अश्विन मोगरकर

बदलत्या हवामानात डासांचा स्फोट, परळीतील नागरिक त्रस्त!

नगरपरिषदेच्या दिरंगाईचा धोका -आरोग्यावर; फवारणी कुठे?


परळी, ता. ८ जून २०२५ —

सध्या परळी शहरात डास व माश्यांचा प्रचंड प्रादुर्भाव पाहायला मिळत असून, त्यामुळे संपूर्ण शहरभर व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक झाला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक घरात एक तरी सदस्य आजारी पडलेला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला हे आजारपणाने त्रस्त झाले आहेत.


परळी शहरात मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून नदी-नाले व गटारांची सफाई नियमितपणे होणे अपेक्षित असताना, नगरपरिषदेने अद्याप कुठलीच ठोस पावले उचललेली नाहीत. परिणामी अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून, तिथे डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण तयार झाले आहे.

डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर:

      गणेशपार,भीमनगर,बंगला गल्ली, अंबेवेस, मोंढा,विद्यानगर या भागांतील रहिवाशांकडून सतत तक्रारी येत असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे तर दूरच, घरातही डासांपासून सुटका नाही. माश्यांमुळे अन्न दूषित होत असून, त्यामुळे पोटाचे आजार वाढले आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रांमध्ये जावे लागत असून, औषधांचा खर्च सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चटके देतोय.


नगरपरिषदेच्या उदासीनतेवर नागरिक संतप्त:

    नगरपरिषदेचा यामध्ये संपूर्ण हलगर्जीपणा दिसून येतो. अनेक प्रभागांमध्ये फवारणी झालीच नाही, किंवा ती इतकी अपुरी आहे की त्याचा काहीच परिणाम होत नाही. काही भागांत नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने औषध फवारणी करावी अशी वेळ आली आहे – हे खरंतर एक प्रशासनाची अपयशाची लक्षणीय उदाहरणं आहेत.

मागण्या:

तात्काळ शहरव्यापी फवारणी मोहीम राबवावी

नालेसफाई, गटारसफाईला गती द्यावी

आरोग्य विभागाचे आपत्कालीन पथक तैनात करावे

नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करावी

जनजागृती मोहीम चालवावी


नेमकं आहे कुठे नगरपरिषद प्रशासन?

शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी वेळेत पावले उचलणे गरजेचे आहे. परळी नगरपरिषदेला तात्काळ जागे होणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. नागरिक आता प्रश्न विचारत आहेत नेमकं आहे कुठे नगरपरिषद प्रशासन?

         — अश्विन मोगरकर, 

           भाजपनेते परळी वैजनाथ. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार