पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प
पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे
पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प
चाकरवाडी - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती..
बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
या अभंगावर चिंतन मांडले पुढे बोलताना महाराज म्हणाले..रौप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात इंद्राला लाजवेल अशी व्यवस्था केली. स्वर्ग आम्ही पाहिलेला नाही. मात्र आज श्रीक्षेत्र चाकरवाडीत साक्षात स्वर्ग अवतरला आहे. या ज्ञानगंगा मध्ये नाहून निघण्याच्या संताच्या आशीर्वादातून परम भाग्य मिळाले..
हा अभंग सूत्रात्मक आहे. सूत्र छोटे असते मात्र यामध्ये खूप मोठा गहन अर्थ दडलेला असतो..वेदाची महावाक्य छोटी आहे. त्यात आध्यात्मिक हित दडलेले आहे.माणसाच्या आदर्श जीवनाची सूत्र संत साहित्यात आहे.
काहीवेळा काम शिल्लक राहते आयुष्य संपते, तर काहीवेळा काम संपून जाते आयुष्य शिल्लक राहते.. संत नामदेव महाराज यांनी अभंग रचनेची प्रार्थना केली. पण आयुष्य संपले. म्हणून पुन्हा जगतगुरु तुका अवतार नामयाचा..तुकाराम महाराज पुन्हा अभंग रचना करताना पहिला अभंगहा लिहिला या अभंगात मंगल केलेले. मंगलाचे विविध प्रकार आहेत यामध्ये आशीर्वादात्मक वस्तू निर्देशनात्मक आणि नमस्कारात्मक या अभंगात वस्तू निर्देशनात्मक आणि आशीर्वादात्मक मंगल आहे..वारकरी संप्रदायाने जातीयता निर्मूलन करण्याचे काम जोग महाराज यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा