पोस्ट्स

जून ८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  जालन्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाला ना. पंकजा मुंडे यांची भेट स्मारकाच्या बांधकामासाठी निधी देण्याची केली घोषणा जालना ।दिनांक १४। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शहरात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाला राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. स्मारकाला निधी देण्याची घोषणा करतानाच याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी स्मारक समितीला दिली.   ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या २४ फुट उंचीच्या  देशातील सर्वात उंच ‘हिंदूधर्मरक्षिका महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची पाहणी केली.हिंदू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे देशातील सर्वात उंच अहिल्यादेवी स्मारक ठरणार आहे.स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला व इंदूर राजवाडा यांच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी २८ फूट उंच व ५६ फूट रुंद दगडी भिंत उभारली जाण...

२२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन"

इमेज
ना. पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल २२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन" म्हणून साजरा होणार मुंबई, । दिनांक १४ । राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे.  यापूर्वीच देशी गायीस "राज्यमाता–गोमाता" म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अ...

समृद्धी महामार्गावर समृद्ध करणारी जनभावना...!

इमेज
"मुंडे साहेबांमुळेच प्रगती झाली"... समृद्धी महामार्गावर हळवा क्षण; पंकजाताईंना आला भावनिक अनुभव! परळी वैजनाथ| प्रतिनिधी        वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी आयुष्यभर झगडणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती आजही जनमानसात किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचा छोटासा पण अतिशय भावनिक करणारा अनुभव नुकताच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला.        समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना, बाजुच्या लेनमधून धावणाऱ्या दुसर्‍या एका गाडीतून अचानक एका महिलेनं हातात कागद घेत तो पंकजाताईंना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या कागदावर लिहिलं होतं – "आम्ही मुंडे साहेबांमुळेच इंजिनिअर झालो... प्रगती झाली. Thank you!" हा प्रसंग पाहून क्षणभर पंकजाताईंनाही भावनिक आठवणींनी ओथंबून टाकलं. “मेसेज मुंडे साहेबांसाठी होता. समृद्धी मार्गाच्या वेगासही तो क्षणभर थांबवून गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंकजाताईंनी या हृदयस्पर्शी प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत तो अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे...
इमेज
लग्न लागले नवरदेव पळून गेला,लगेच दुसर्‍याशी लग्न: अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह;गुन्हा दाखल बीड/ प्रतिनिधी...        लग्न लागले नवरदेव पळून गेला म्हणून लगेचच दुसर्‍याशी लग्न लावून देण्यात आले.अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह झाल्याचा प्रकार समोर आला असुन याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.    एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे पहिला नवरदेव लग्न लागल्यानंतर मंडपातून पळून जाताच दुसऱ्या सोबत विवाह लावल्याचा खळबळ जनक प्रकार बीड शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आला.बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला. या 32 वर्षीय इसमाला दोन पत्नी आहेत. दोघीही सध्या नांदत नसल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासना...
इमेज
बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावतीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज विष प्राषाण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं. तर काही आंदोलकांनी थेट तहसीलदारांना अडवल्याचा प्रकार बघायला मिळाला होता. यानंतर अखेर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करुन दिली. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकरी कर्जमाफीसाठी आपण समिती नेमू. त्या समितीचा अहवाल समोर आल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ आणि या...

पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची कामे मार्गी लावण्यात धनंजय मुंडे ४ तास रमले

इमेज
  धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी भवन भेटीस तुफान गर्दी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची कामे मार्गी लावण्यात धनंजय मुंडे ४ तास रमले बीड (दि. १३) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आ  धनंजय मुंडे आता पुन्हा एकदा कामकाजात कमालीचे सक्रिय झाले असून आज त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जनता संवाद उपक्रमास उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व कामे समजून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भवनचा संपूर्ण परिसर कार्यकर्ते व नागरिकांनी तुडुंब भरून गेला होता.  पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर आलेल्या नागरिकांची कामे मार्गी लावण्यामध्ये धनंजय मुंडे हे तब्बल चार तास रमले होते.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर  चव्हाण, माजी आमदार संजय  दौंड, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, समता परिषदेचे ॲड सुभाष राऊत, डॉ योगेश क्षीरसागर, बबन गवते, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, मोईन मास्टर, अविनाश नाईकवाडे यांसह विविध आघाडी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी...
इमेज
धनंजय मुंडे यांनी घेतली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा बीड (दि. १३) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे, प्रस्ताव यांचा विविध महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये परळी मतदान संघातील तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.  शिरसाळा येथील मंजूर एमआयडीसी मधील उर्वरित जागेची अधिकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा करणे याबाबतही यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर बसस्थानकाचे काम, कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याला निधी, धर्मापुरी किल्ल्याचे काम यांसह जिल्हा स्तरावर प्रलंबित असणारे किंवा जिल्हा स्तरावरून प्रस्तावित करावयाच्या विविध विकासकामांच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सूचना केल्या.  यावेळी माजी आ. संजय  दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, अविनाश नाईकवाडे, जिल्हा नियोजन अ...
इमेज
  शिवमहापुराण कथेला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी केज :- चाकरवाडी येथे आयोजीत  प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी जात असलेल्या एका ५५ वर्षिय  महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची केज येथील बस स्टँड वरून चोरी झाली आहे.       धारूर येथील गंगाबाई सुग्रीव मुंडे वय (५५ वर्षे) या दि. ८ जून रोजी सकाळी १०:३० वा. चे सुमारास उषाबाई व सुनिता गायकवाड यांच्या सोबत शिवपुराण कथा ऐकण्यासाठी चाकरवाडी येथे जाण्या करीता केज येथील बसस्थानका मधून दुपारी १२:३० वा. चे सुमारास चाकरवाडीकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील ७३ हजार ५०० रु. किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरले. या प्रकरणी दि. ११ जून रोजी गंगाबाई मुंडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३०३/२०२५, भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने हे तपास करीत आहेत. ■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_ ■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला...
इमेज
मित्रासोबत चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता केज :- कृषी केंद्रावर काम करीत असलेला ३२ वर्षीय इसम त्याच्या मित्राच्या सोबत चाकरवाडीला गेला होता. तो परत घरी आला नाही. म्हणून त्याच्या पत्नीने तिचा नवरा हरवला असल्याची तक्रार दाखल केली आहे. या बाबतची माहिती अशी की, नांदुरघाट ता. केज येथे राहत असलेले विलास मदन पाटोळे वय (३२ वर्ष) हे नांदूर फाटा येथील शिवप्रसाद कृषी सेवा केंद्रावर काम करतात. दि. १२ जून रोजी विलास पाटोळे हे कृषी सेवा केंद्रावरून काम करून सायंकाळी घरी आले आणि जेवण करून त्यांच्या पत्नीकडे फायन्सचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर मित्रा सोबत चाकरवाडी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या २५ व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित प्रदीप शर्मा यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाला जात आहे असे सांगून गेले. त्या नंतर रात्री ते आले नाहीत. त्यांचा फोन बंद आहे.त्यामुळे त्याची पत्नी सौ. ज्याती विलास पाटोळे हिने केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा हरवल्याची तक्रार दिली आहे.या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. ■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_ चोरी_
इमेज
सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या हगवणे प्रकरणाची पुनरावृत्तीच वाटावी अशा प्रकारची घटना परळीतही समोर आली आहे. परळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी आता पीडित सुनेने पती व सासरच्या नातेवाईकां विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन त्याप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील जयनगरमधील रहिवाशी पिडित विवाहितेने परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्याप्रमाणे तिचा लग्नापासून 2008 ते 2022 दरम्यान माहेरहून पैसे घेवुन ये या कारणांवरुन वेळोवेळी शारिरीक मानसिक छळ केला गेला.तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध वगैरे सततचा त्रास दिला.याबाबत विरोध केला असता पतीने गळा दाबून जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न केला.सासऱ्याकडे याबाबत सांगायला गेलं तर सासऱ्याने त्रास देत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. सासरच्या मंडळींकडून मोठमोठ्या रकमेची मागणी व अर्थ...
इमेज
  चाकरवाडी येथून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात –पाच जण जखमी : भाविक परळी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती चाकरवाडी | प्रतिनिधी चाकरवाडी येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन काही जण जखमी झाल्याची घटना आज (१२ जून) रात्री घडली. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलासह एकूण पाच जण जखमी झाले असुन, सध्या त्यांच्यावर नेकनुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.      सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र जखमींना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व प्रवासी परळी तालुक्यातील असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. जखमींना तात्काळ  नेकनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा

इमेज
कर्जमाफी करिता किसान सभेचे तीव्र निदर्शने आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा माजलगाव : प्रतिनिधी     अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असताना बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून या खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल केले असून खरिपाची पेरणी कशी करावी या विदारक मानसिकतेत बोगस व महागडी खते, बी-बियाणे याचा खर्च कसा करावा या चिंतेने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत तातडीने बळीराजाला मदत करावी यासाठी बीड जिल्हा किसान सभेने गुरुवार (दि 12 ) रोजी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आ.बच्चु कडू याच्या उपोषणाला पाठींबा देत सरकारचा निषेध केला. सरकारी धोरणांमुळे शेतकरी कायम अडचणीत आलेला असून तो कर्जबाजारी झालेला आहे. या कर्जाच्या विळख्यातून त्याला बाहेर काढण्याचे आश्वासन राज्य सरकार मध्ये बसलेल्या सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. मात्र निवडून येताच 'आम्ही असे बोललोच नाही', 'बोललो असलो तरी आम्ही मुदत दिलेली नाही' अशी सारवासारव...

शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची एक प्रातिनिधिक भावना...

इमेज
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात धनंजय मुंडे यांना मानाचं पान:परंतु त्यांचे भाषण ऐकता न आल्याची कार्यकर्त्यांना हूरहूर ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. या सोहळ्यात धनंजय मुंडे यांना अगदी मानाचे पान दिले गेले मात्र, या कार्यक्रमात परळीचे भूमिपुत्र,एक उत्तुंग शैलीचा वक्ता, लोकप्रिय नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे  यांचे भाषण कार्यकर्त्यांना ऐकता न आल्याची हूरहूर त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे. "मंत्रीपदापेक्षाही पक्षशिस्त अधिक महत्त्वाची" मानणारे नेते म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमात भाषण केले नाही. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे या सोहळ्यात कौतुक केले, त्यातच  अजित पवार, प्रफुल्ल पटेल, आणि सुनील तटकरे हे प्रमुख नेते भाषणसाठी धनंजय मुंडे यांना सतत खुणावतांना दिसले.हे अनेक कार्यकर्त्यांनी पाहिले आणि अनुभवले. मात्र धनंजय मुंडे या...
इमेज
  श्रीगुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे वैद्यनाथ दर्शन व बेलवाडी मंदिरास भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –श्री१०८ गुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज, मठ संस्थान खरोळा (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी मंगळवारी परळी वैजनाथ येथे सदिच्छा भेट दिली.  द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर श्रीगुरु महाराजांनी बेलवाडी येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर संस्थान येथे भेट दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री दत्तात्रयआप्पा ईटके गुरुजी यांनी महाराजांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले व त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी महाराजांनी संत गुरलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे झालेल्या नवीन बांधकामाचे पाहणी करून समाधान व्यक्त केले या प्रसंगी समाजातील मान्यवर    माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे, महादेव ईटके, दयानंद स्वामी, विकास हालगे, श्याम बुद्रे, रमेश चौंडे, संजय खाकरे, नितीन समशेटी, सुशील हरंगुळे, प्रकाश खोत, शिवकुमार चौंडे, दत्तात्रय गोपनपाळे, दीपक स्वामी, फुलारी आप्पा, गणेश स्वामी, व योगेश स्वामी ...
इमेज
पंकजा मुंडे यांच्या रामटेक शासकीय निवासस्थानी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट मुंबई।प्रतिनिधी....    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या  मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रथमच सदिच्छा भेट दिली. या औपचारिक भेटीचे स्वरूप अत्यंत मनमोकळे आणि आत्मीयतेचे ठरले.          यावेळी पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. भेटीदरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि उदयनराजे भोसले यांच्यातील जुने राजकीय व कौटुंबिक संबंध, आठवणींमधून उजळत गेले. या चर्चेतून दोन्ही कुटुंबांमधील स्नेहबंध पुन्हा दृढ झाल्याचे जाणवले.या प्रसंगी आ. सीमाताई हिरे तसेच इतर शिष्टमंडळही उपस्थित होते. या भेटीमुळे केवळ औपचारिकतेपेक्षा एक विशिष्ट आत्मीयता आणि भावनिक संवादाचा क्षण उपस्थित झाला.
इमेज
  प्रभू वैद्यनाथ देवस्थानाच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण — पुजाऱ्यांचे बुधवारपासून उपोषण परळी वैजनाथ (ता.११ जून २०२५) — भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र प्रभू वैद्यनाथ देवस्थानाच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण होत असुन, गेल्या अनेक महिन्यांपासून या अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने अखेर देवस्थानचे पुजारी मैदानात उतरले आहेत. बुधवार दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात समस्त पुजारीवर्गाने जाहिर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.          या संदर्भात  उच्च न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेश देऊन परळी तहसील मंडळ अधिकारी यांना संबंधित जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने या आदेशानुसार दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असुन अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असुनही अद्याप शासन किंवा संबंधित प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या निष्क्रियतेचा निषेध म्हणून प्रभू वैद्यनाथ देवस्थानचे सर्व पु...

स्वच्छतेकडे गंभीर दुर्लक्ष- नागरीकांच्या आरोग्याला धोका!

इमेज
परळी शहरात व्हायरल आजारांचा प्रकोप; सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी परळी वैजनाथ/ प्रतिनिधी      परळी शहरात सध्या व्हायरल आजारांचा प्रकोप वाढत असून, स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.जुलाब, उलटी,  ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, आणि थकवा अशी लक्षणे घेऊन अनेक नागरिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात सुमारे ५०० हून अधिक रुग्णांनी विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य आजारासंदर्भात उपचार घेतले आहेत. काही रुग्णांना डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या तापाच्या प्रकारांचीही लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.स्थानिक  रुग्णालयांच्या अनेक डाॅक्टरांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी हवामानात होणाऱ्या बदलामुळे अशा आजारांमध्ये वाढ होते. सध्या तापाचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.” शहरातील अनेक औषध दुकानांमध्ये जुलाब, उलटी, ताप व सर्दीच्या औषधांची मागणी वाढली आहे. तसेच, विविध आरोग्य ...
इमेज
विहिरीवर पोहायला गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू केज :- केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पोहायला गेलेली ९ वर्ष वयाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे.      दि.९ जून रोजी दुपारी भरत साधु मोरे यांची मुलगी कु. अंजली भरत मोरे ही ९ वर्षाची मुलगी जवळच असलेल्या विहिरीत पोहायला गेली असता पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहिरी काठोकाठ भरलेली असताना प्रेत वर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या विहिरीवर पाण्याच्या मोटारी लावून पाणी कमी झाल्या नंतर रात्री ९:०० वा. च्या सुमारास प्रेत पाण्यभर काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव यांनी विहिरीत बुडून मृत्य झालेल्या कु. अंजली मोरे हिचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीत तपासणी व शव विच्छेदनासाठी आणले आहे.

ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ !

इमेज
  केज- कळंब रस्त्यावर दी बार्निंग बसचा थरार ! ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ ! केज :- :- आगीत भस्मात झालेल्या एसटी बसने प्रवास करीत असलेली एक वृध्द महिला ही ड्रायव्हर केबिनचा जवळ बसलेली असताना अचानक बसने पेट घेतला. त्यावेळी आगीच्या ज्वाळा त्या वृद्ध महिलेच्या पाठीला चटका बसताच ती मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांचे लक्ष गेले. त्या नंतर चालकाने बस बाजूला घेऊन थांबविली. वाहकाने सुद्धा संकटकालीन दरवाजा उघडला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ९ जून रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास कळंब आगाराची केज- कळंब (एम एच- ११/बी एल- ९३७५) ही कळंब आगाराची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असताना केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटी जवळ असलेल्या शेख फरीद बाबा दर्ग्या जवळ या बसच्या ड्रायव्हर केबिनच्या पाठीमागे खाली बसलेली एक वृध्द महिला तिच्या पाठीला आगीचा चटका बसताच मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालकाने पाहिले असता गाडीच्या बॉनेटने अचानक पेट घेतला असल्याचे निदर्शनास आले. अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून एसटी बस चालक अनिल बारकुल आणि वाहक भांगे यांनी बस रस्त्य...
इमेज
नांदुरवेस परिसरातील गटार व रस्त्याची कामे तातडीने पुर्ण व्हावीत – मा.नगरसेवक अनिल अष्टेकर परळी वैजनाथ – प्रभाग क्र. 15 चे मा. नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या मागणीनुसार नांदुरवेस परिसरातील रस्ते, गटार व सरस्वती नदी स्वच्छतेच्या कामाची नगरपरिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी पाहणी केली.    पावसाळ्यात साचणाऱ्या घाण पाण्याच्या समस्येवर चर्चा झाली. रस्ते व गटार खोदून उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली.मुख्याधिकारी कांबळे यांनी स्वच्छता निरीक्षकांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.नगरसेवक अष्टेकर यांनी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मा. नगरसेवक रमेश चौंडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.        नांदुरवेस भागातील लादण्या व रस्त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात घाण पाणी साचते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्ता व गटार किमान दोन फूट खोदून काम करावे, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे  करण्यात आली.यावेळी नगरपरिषदचे विक्रम स्वामी, शिवसेनेचे सचिन स्वामी, युवा नेते चंद्रप्रकाश हालगे व लहु ह...
इमेज
वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात विसरलेली बॅग केली परत – प्रामाणिकपणाचा उत्तम प्रत्यय परळी वैजनाथ – वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सुनिता जाधव आणि अनिता जाधव या भाविकांची हॅन्डबॅग मंदिराच्या गाभाऱ्यात विसरली होती. बॅगमध्ये रोख पाच हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन होता. गाभाऱ्यात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी बबली वाघमारे यांनी ही बॅग आढळल्यावर तात्काळ ती मंदिरातील पोलीस चौकीत जमा केली. पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि. राजाराम शेळके यांनी तत्परतेने शोध घेऊन संबंधित भाविकांशी संपर्क साधला व त्यांना बॅग परत केली. या प्रामाणिक व तत्पर कृतीमुळे भाविकांनी पोलीस विभागाचे आभार मानले असून, बबली वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे. ही घटना भाविकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी असून, प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श ठरली आहे.
इमेज
आषाढी वारी परळीत येणार्‍या दिंड्या : वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय:उपविभागीय अधिकाऱ्यांचा केला सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त पंचम ज्योतिर्लिंग श्री वैजनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या संतांच्या पालख्यांना अडथळा येऊ नये म्हणून परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याचा सकारात्मक निर्णय घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांचा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उड्डाणपुलाचे काम दिनांक 26 मे 2025 पासून सुरू करण्यात आले होते. हे काम पालखी मार्गावरच असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. उपविभागीय अधिकारी श्री. लाटकर यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत नगरपरिषद परळी येथे विशेष बैठक घेऊन काम तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संत...

सचोटी,निष्ठा व सरळमार्गी व्यवसायाचे तत्व जपणारे व संस्कारात करणारे व्यक्तिमत्व हरवले!

इमेज
  उदगीरकर परिवाराचा खऱ्या अर्थाने आधारवड कोसळला! अ ण्णा म्हणून ज्यांना उदगीरकर परिवार संबंधतो ते श्री शंकर वैजनाथअप्पा उदगीरकर हे माझे मोठे मामा. त्यांना स्वतःला धरून पाच भाऊ आणि चार बहिणी. ते शालेय वयात असताना घरची परिस्थिती जेमतेम होती. जेव्हा वडिलोपार्जित व्यवसायात म्हणजे खाद्य तेल व पेंडीचे उत्पादनात लक्ष घातले तेव्हा त्यांच्या बुद्धीची चुणूक दिसून आली. त्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे अगदी काही वर्षांतच भरारी घेतली आणि परळी शहरात या व्यवसायातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून नाव कमावले.  निश्चितच त्यांच्या सर्व बंधूंनी या यशात त्यांच्या मेहनतीचे योगदान दिले; परंतु सर्वांनीच अण्णा जे सांगतील तसेच केले आणि अण्णांनी घालून दिलेल्या तत्त्वांनी, मार्गाने जाणे पसंद केले. त्यांच्यासह चार भावांच्या मुला-मुलीची लग्न होईपर्यंत हा परिवार एकत्र नांदत होता आणि ती संख्या जवळपास पन्नास सदस्यांची होती! आज चारपेक्षा अधिक सदस्य एकत्र राहू शकत नाहीत; त्याकाळी अण्णांनी ते कसे शक्य करून दाखवले याचे नवल वाटते!  मी जेव्हा सातवी आठवीत शिकत होतो तेव्हा दिवाळी साजरी करण्यासाठी आईसोबत मामाच्या घरी...

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प

इमेज
  पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प चाकरवाडी  - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती.. बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या  समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ...

दु:खद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  तेल,पेंडींचे व्यापारी शंकरआप्पा उदगीरकर यांचे  निधन परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)           शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी रविवारी (ता.०८) दुपारी ५ च्या दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (ता.०९) सकाळी ११ वाजता विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.           शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शंकरआप्पा उदगीरकर हे शहरातील विविध धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत असत. श्री शनैश्वर देवस्थान कमिटीचे सचिव, विश्वस्त श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी, संस्थापक अध्यक्ष श्री कोलूघाणा तेली सहकारी संघ, माजी संचालक जवाहर एज्युकेशन सोसायटी अशा विविध संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यातच वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर येथील विरशैव स्मशानभूमीत सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्का...

नात्याला काळीमा फासणारी घटना.....!

इमेज
बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी.. आपण दोघे नवरा-बायको सारखे राहू असे म्हणून जन्मदाता बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रामनगर ता-परळी या ठिकाणी घडली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील बोंदरगाव ता-सोनपेठ येथील तारडे याचा परिवार मजुरी कामानिमित्त परळी तालुक्यातील राम नगर या ठिकाणी राहत असून दि २ जून रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास आरोपी नात्याने वडील असलेल्या मनोहर निवृत्ती तारडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात-पाय टाकून तीस लज्जा वाटेल अशा प्रकारचे वर्तन करत आपण दोघे नवरा-बायको प्रमाणे घरात राहू असे सांगू लागला. दरम्यान घडलेला प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि ६ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन २५१/२०२५ कलम ७४ भारतीय न्याय संहिता व ८, १२ बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक करू...