नात्याला काळीमा फासणारी घटना.....!
बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी..
आपण दोघे नवरा-बायको सारखे राहू असे म्हणून जन्मदाता बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रामनगर ता-परळी या ठिकाणी घडली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील बोंदरगाव ता-सोनपेठ येथील तारडे याचा परिवार मजुरी कामानिमित्त परळी तालुक्यातील राम नगर या ठिकाणी राहत असून दि २ जून रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास आरोपी नात्याने वडील असलेल्या मनोहर निवृत्ती तारडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात-पाय टाकून तीस लज्जा वाटेल अशा प्रकारचे वर्तन करत आपण दोघे नवरा-बायको प्रमाणे घरात राहू असे सांगू लागला. दरम्यान घडलेला प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि ६ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन २५१/२०२५ कलम ७४ भारतीय न्याय संहिता व ८, १२ बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अधिक तपास पिंक पथकाचे सपोनि जाधवर हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा