दु:खद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!
तेल,पेंडींचे व्यापारी शंकरआप्पा उदगीरकर यांचे निधन
परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)
शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी रविवारी (ता.०८) दुपारी ५ च्या दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (ता.०९) सकाळी ११ वाजता विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शंकरआप्पा उदगीरकर हे शहरातील विविध धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत असत. श्री शनैश्वर देवस्थान कमिटीचे सचिव, विश्वस्त श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी, संस्थापक अध्यक्ष श्री कोलूघाणा तेली सहकारी संघ,
माजी संचालक जवाहर एज्युकेशन सोसायटी अशा विविध संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यातच वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर येथील विरशैव स्मशानभूमीत सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले उमाकांत व चंद्रकांत, चार मुली, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा