पोस्ट्स

जून २२, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहभागी व्हावे -दिपक देशमुख यांचं आवाहन

इमेज
  सप्तश्रृंगी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची जय्यत तयारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार भक्तिभावनेचा सोहळा परळी / प्रतिनिधी       परळीतील गणेशपार परिसर श्रद्धेच्या भावनांनी भारलेला असून, श्री सप्तश्रुंगी सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या वतीने आई सप्तश्रुंगी देवीच्या सुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण  वातावरणात संपन्न होणार आहे. या पवित्र सोहळ्यास आषाढ शुद्ध नवमी, शुक्रवार दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार असून दुपारी ०१.११ वाजता शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. यानंतर भाविकांसाठी दुपारी २ ते ४ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शोभेची मिरवणूक व गोंधळ मिरास श्री सप्तश्रुंगी सभागृह, गणेशपार येथून निघणारी मिरवणूक ही गणेशपार – नांदुरवेस – अंबेवेस – श्री वैद्यनाथ मंदिर – नेहरू चौक – मोंढा – रोडे चौक – टॉवर – गणेशपार मार्गे परत अशी असणार आहे. रात्री जागरण गोंधळ, अग्निकुंडातून चालणे आणि सप्तश्रृंगी देवीचा लगेच कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याचे प्...

तब्बल १० विद्यार्थी निवड: जिल्ह्यात एकमेव शाळा

इमेज
विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांचे स्काउट्मध्ये घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय ,नवीन शक्तीकुंज वसाहत, परळी वैजनाथ ता.परळी वैजनाथ जि.बीड या शाळेतील पाच  विद्यार्थी सुवर्णबाण व चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभाग घेऊन यश मिळवले. जिल्ह्यात एकमेव ही शाळा आहे .महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स ,मुंबई तर्फे राज्य प्रशिक्षण केंद्र(स्काऊट), लातूर या ठिकाणी आमच्या विद्यावर्धिनी विद्यालयातील साने गुरुजी कब पथकातील सुवर्णबाण कब विद्यार्थी दिनांक 14 /2 /2024 ते 16 /2/ 2024 पर्यंत राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभागी होऊन त्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना सुवर्णबाण हा इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक विभागातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे.     तसेच दिनांक 03/03/2025 ते 05/03/2025 पर्यंत आमच्याच विद्यावर्धिनी विद्यालयातील साने गुरुजी कब पथकातील कब विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिर( कब विभाग ) याची परीक्षा राज्य प्रशिक्षण केंद्र (स्काऊट),...
इमेज
महिला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे १००% सुयश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         येथील कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची  विजयी परंपरा अखंड चालू असते.मार्च / एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या कॉमर्स - वाणिज्य विभागाने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे  .     वाणिज्य विभागातील सर्वच्या सर्व विद्यार्थिनी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या . या विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून या विभागांतील तृतीय वर्षातील कु . फुलारी वैष्णवी किशोर , कु.ढाकणे प्रतीक्षा गोविंद व कु .बालटे वैष्णवी व्यंकटी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . या विद्यार्थिनी व कु . बन्साळी सिया सुरज  ही विद्यार्थिनी पुणे येथे सीए फाउंडेशन कोर्स करीत आहेत .      या उतुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख सचिव रवींद्र देशमुख कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी संपूर्ण वाणिज्य विभागाचे व  विद्यार्थिनींचे मनस्वी अभिनंदन केले असून महाविद्या...
इमेज
जागृती नागरी सहकारी पतसंस्थेत रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी परळी (प्रतिनिधी):-       परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.      कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मुंदडा सर तसेच जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा गंगाधर शेळके सर यांच्या हस्ते  छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे, प्रजाहितदक्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.       याप्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनाच्या कामासोबत सर्व समाजांना न्याय देण्याचे काम काम केले. राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी प्रजाहितदक्ष असे आदर्श राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी ...

न.प.प्रशासनाला काँग्रेसने दिले 15 दिवसाचे अल्टिमेटम

इमेज
परळी न.पच्या अंतर्गत झालेल्या कामांची इ.स.2016 ते 25 वर्षातील श्वेतपत्रिका त्वरित जाहीर करा-बहादुरभाई शहरातील  विविध प्रश्नांवर परळी काँग्रेसचे निवेदन  परळी वैजनाथ , प्रतिनिधी.. झोपेचे सोंग घेऊन परळी नगर परिषद प्रशासन मुग गिळून करोडो रुपयांचा अफरातफर करत गिळंक्रत करत आहे याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतिने वारंवार श्वेतपत्रिका काढावी म्हणून निवेदने, आंदोलने केले परंतु अद्यापही श्वेतपत्रिका काढु शकली नाही यामुळे भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावला आहे.याच निवेदनाची पुन्हा आठवण म्हणून काँग्रेसच्या वतीने परळी नगर परिषदेला देण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शुक्रवार दि.27 जुन रोजी परळी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, न.प.प्रशासनाने 2016 से 2024 पर्यतची श्वेतपत्रिका आठ दिवसात प्रसिद्ध करावी, मागील दोन तीन वर्षा पासून आमच्या  काँग्रेस पक्षा मार्फत अनेक निवेदन आपणास देण्यात आली जसे की, दुबार टेंडर ची चौकशी, झालेले कामाचे निवेदा काडून कोट्यावधी चे भ्रष्टचार बाबत चौकशी, कामाची गुणवत्ता बाबत, श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणे बाबत, म...

क्लासेस संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून करायचे विनयभंग

इमेज
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षक व क्लासेस चालकाच्या विरोधात गुन्हा  क्लासेस संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून करायचे विनयभंग  बीड,प्रतिनिधी : बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या क्लासेसचे संचालक व शिक्षक अशा दोघांवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राध्यापक विजय पवार व  प्रशांत खटावकर असे या शिक्षकांची नावे आहेत. पिढीत विद्यार्थिनी 30 जुलै 2024 पासून या क्लासेसमध्ये शिक्षण घेते. क्लासेस संपल्यानंतर प्रशांत खटावकर व विजय पवार हे या  विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावत तिचा विनयभंग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. दरम्यान बीडच्या शैक्षणिक वर्तुळात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई -: ( वसुदेव शिंदे) यांजकडून विशेष वृत्त.....!

इमेज
  अंबाजोगाईकरांनी लुटला रिंगण सोहळ्याचा आनंद ! अश्व रिंंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात अंबाजोगाईकरही झाले दंग वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ पाहून उपस्थित प्रेक्षक भारावले अंबाजोगाई -:  ( वसुदेव शिंदे)- अंबाजोगाई शहरात गुरुवारी सायंकाळी  योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर चार पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.   वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगड्या, बाल वारकऱ्यांची झालेली दिंंडी स्पर्धा. हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.       आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंडया व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात. या दिंडीतील वारकरी मागील दहा वर्षांपासून अंबाजोागाई  येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात. गुरूवारी हिंगोली  जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, अंबाजोगाईतील महसूल विभागाची पालखी,  संत मोहनानंद महाराज यांची पालखी, तर  चारोधाम हनुमान पायी पालखी यांची पालखी शहरात दाखल झाली. य...
इमेज
मानवतेचे पूजक :- समाजभूषण स्व.सुवालालजी (ललवाणी) वाकेकर सु वालालजी वाकेकर यांच्या हळव्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची मोहिनी दोन दशके उलटूनही समाजमनावर आजही कोरल्या गेलेली आहे.    खरंतर या जगात मोजकीच माणसं असतात की ज्यांचं चांगुलपण कुठल्याच मोजपट्ट्यात मोजता येत नाही, दूरवर पसरलेल्या क्षितिजासारखं त्यांचं मोठेपण हे कितीही सांगायचं म्हटलं तरी ते शब्दात मावत नाही.   “ या काळाच्या भाळावरती      तेजाचा तू लाव टिळा,  आणि फुलू दे तुझ्या श्रमातून      मानवतेचा इथे मळा”  असा त्यांच्या कर्तुत्वाने फुललेला माणुसकीचा मळा ते आपल्यातून गेले तरी तो फुलतच राहत असतो.        असाच आपल्या माणुसकीचा,  मळा फुलवून आपल्यातून निघून जाऊन दोन दशक झाली आहेत तरी ज्यांच्या स्मृती अवीट अन आजही ताज्या वाटतात असं बहुआयामी प्रेरणास्त्रोत आणि माणुसकीचा मूर्तीमंत झरा आणि मानवतेचे खरे पूजक म्हणजे समाजभूषण सुवालालजी (ललवाणी) वाकेकर.                       सुवालालजींना जाऊन आज 21 वर...

तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण

इमेज
समाजभूषण स्व. सुवालाल वाकेकर यांच्या स्मृतिदिना निमित्त परळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन समाधीस्थळी अभिवादन, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य, रेनकोटचे करणार वाटप - विजयकुमार वाकेकर तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण परळी वैजनाथ ....          शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणारे समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या शुक्रवार दि. 27 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाधीस्थळी अभिवादन, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य व रेनकोटचे वाटप आणि संत धुराबाई विद्यालयात विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, त्याचप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांनी सांगितले.        विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद, परळीचे नगराध्यक्षपद आणि साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पदावर काम करून आपली वेगळी ओळख करणाऱ्या स्व. सुवालालजी वाकेकर यां...
इमेज
स्कुटीवरील युवकास हटकले, संभाजीनगर पोलिसांच्या हाती लागला पावनेचार लाखांचा गुटखा परळी (प्रतिनिधी)  संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोउपनि.ए.टी.शिंदे हे शहरातील ईटके कॉर्नर येथे गस्त घालत असताना संशयास्पद स्कुटीस्वारास हटकले,त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता गुटख्याचे चार पुडे आढळले.याची पोलिसांनी चौकशी केली असता दादाहरी वडगाव येथील दुकानावर छापा टाकत ३ लाख ७० हजार ३७८ रुपयांचा गुटखा जप्त केला.याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.     पोलिस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी कठोर भुमिका घेतल्यानंतर  परळी पोलिसांनी गुटखा विक्रेत्याविरोधात मोहीम उघडत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.सोमवार दि.२३ जुन रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोउपनि.ए.टी.शिंदे,पोहे.नागरगोजे,पठाण हे ईटके कॉर्नर येथे गस्त घालत असताना संशय आल्याने स्कुटीस्वार ओंकार बालाजी नवगीरे वय १६ वर्षे रा.सिध्देश्वरनगर यास हटकले.त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे चार पुडे आढळले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गुटखा दादाहरी वडगाव येथील किराणा दुकानातुन आणल्याचे सांगितले गस्तीवरील प...
इमेज
बाजीराव भैय्या धर्माधिकारी  ‘माऊली सेवा समर्पण’ पुरस्काराने सन्मानित ! हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी,दि. २५  –       संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘माऊली सेवा समर्पण’ या प्रतिष्ठित आशिर्वादरुपी पुरस्काराने बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.       आषाढी वारीनिमित्त संत शिरोमणी नामदेव महाराज दिंडीचे श्रीक्षेत्र नर्सी येथून वैद्यनाथ नगरीत आगमन झाले. यावेळी पार पडलेल्या पारंपरिक ‘रिंगण सोहळा’ कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. माऊली महाराजांच्या नावाने मिळालेला हा गौरव माझ्या आयुष्यात सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा आणि दिशा देईल. पुढील काळात अधिक जोमाने समाजासाठी कार्य करेन, हे माझे अभिव...
इमेज
  रस्त्यावर जड वाहनांची पार्किंग: शालेय विद्यार्थ्यांना अडथळा- मजास इनामदार यांचं निवेदन  परळी : शहरातील श्री संत जगमित्र नागा मंदिर जवळील लिटल फ्लॉवर स्कूल व नवगण कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर  जड वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे त्यामुळे रहदारीस अडथळा होत असून शालेय विद्यार्थ्यांना त्रासदायक होत आहे. याप्रकरणी बसवेश्वर कॉलनी जवळील  सरदार नगर येथील मजास इनामदार यांनी  मंगळवारी शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले आहे.           रस्त्यावरील जड वाहनांची पार्किंग हटवावी अशी मागणी इनामदार यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे तसेच या भागातील रस्त्यावर गतिरोधक करण्याची मागणी परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या सदर्भात मजाज इनामदार यांनी सांगितले की, इमदादुलउलूम शाळा, लिटल फ्लॉवर स्कूल कडे शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळेच्या रस्त्यावर ट्रक लावण्यात येत असल्याने  विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे तसेच नवगण क...

सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
म.सा.प. परळी शाखेची  नुतन कार्यकारिणी गठीत  अध्यक्षपदी विजय वाकेकर तर सचिवपदी प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांची निवड   परळी , दि.२४/०६/२०२५ (प्रतिनिधी)     येथील मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी मंगळवार दि.२४/०६/२०२५ रोजी सायं. ५:३० वा. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.       या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार पदाधिकारी निवडण्यात आले. त्यात अध्यक्ष म्हणून विजय वाकेकर , सचिवपदी प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड , प्राचार्य अरुण पवार (उपाध्यक्ष ) , प्रा.संजय आघाव ( कोषाध्यक्ष ) ,दिवाकर जोशी (सहसचिव) , प्रा.डॉ.अर्चना चव्हाण (सहसचिव ) ,सिद्धेश्वर इंगोले ( प्रसिद्धी प्रमुख ),बालाजी कांबळे (संपर्कप्रमुख ) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी पुढील पाच वर्षात साहित्य परिषदेची ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली .       निवडीनंतर सत्कारप्रसंगी बोलताना नुतन अध्यक्ष विजय वाकेकर यांनी पुन्हा एकदा मराठवा...

जीवघेण्या स्पर्धेत अट्टहासी पालंकांच्या डोळ्यात अंजन घालणारा प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लॉग नक्कीच वाचा >>>

इमेज
  समाज म्हणून आपण कुठे चुकतोय? आ जचे युग हे स्पर्धेचे युग आहे, हे सत्य नाकारता येत नाही. परंतु, ही स्पर्धा जेव्हा 'जीवघेणी' होते आणि त्यातून आपलेच पाल्य मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खचून जातात, तेव्हा समाज म्हणून आपण कुठे चुकतोय, याचा विचार करणे अनिवार्य ठरते. परीक्षांमधील गुण आणि यश-अपयशाचे गणित हे केवळ शैक्षणिकच नाही, तर सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक पैलूंनी भरलेले एक जटिल कोडे आहे, ज्याची आज सखोल चिकित्सा करणे गरजेचे आहे. *गुणांचे जोखड आणि शिक्षणाचे बदललेले स्वरूप:-* शिक्षण हे व्यक्तीला सुजाण नागरिक बनवण्यासाठी, विचारशक्ती विकसित करण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यासाठी असते. मात्र, आजच्या काळात शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ चांगले गुण मिळवून उच्च पगाराची नोकरी मिळवणे इतकेच मर्यादित राहिले आहे. 'टक्क्या-टक्क्यांची स्पर्धा' हे वास्तव इतके भीषण झाले आहे की, मुलांना एखाद्या शर्यतीतील घोड्याप्रमाणे वागवले जाते, जिथे अंतिम रेषा गाठणे हेच एकमेव ध्येय असते. एकीकडे अभ्यासक्रमाचा वाढता आवाका, तर दुसरीकडे अवाढव्य गृहपाठ आणि शिकवणी वर्गांचे ओझे यामुळे मुलां...

परळीसाठी अभिमानास्पद!!!!!

इमेज
  परळीच्या भूमिकन्येचे फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश:निपर जेईईमध्ये कु. संपदा रेवलेने  मिळवला 290 वा रँक ! आईच्या कष्टाचं  झालं चीज :  मुलीने घेतली यशाची उंच भरारी ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळीची सुपुत्री कु. संपदा सुवर्णा भगवान रेवले हिने फार्मसी क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या  जाणाऱ्या निपर जेईई (NIPER JEE) (National Institute of Pharmaceutical Education and Research Joint Entrance Examination) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत 290 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण परळीकरांचा अभिमान उंचावला आहे.परळीच्या भूमिकन्येचे फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले असुन सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.        NIPER JEE (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) ही परीक्षा भारतातील नामांकित NIPER संस्थांमध्ये M.Pharm., M.S.(Pharm.), M.Tech. आणि PhD यांसारख्या अभ्या...
इमेज
  अवैध विक्रीला प्रतिबंध :परळी शहर पोलिसांची  गुटखा  कारवाई  परळी (प्रतिनिधी)  परळी शहर पोलिसांनी मागील काही दिवसांमध्ये आपल्या हद्दीत गुटखा विक्री करणारे,मटका व इतर जुगार अड्ड्यावर कारवाई करत अनेकांविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली आहे.शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्रीची साखळी तोडण्याचा प्रयत्न पोलिस करतांना दिसत आहेत.   परळी शहरात गुटखा विक्री, सर्रासपणे सुरु होती.परळी शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.रघुनाथ नाचन यांनी याबाबत कठोर भुमिका घेत हद्दीमध्ये सुरू असलेल्या छोट्या,मोठ्या गुटखा विक्रेत्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.कारवाई दरम्यान मांडवली करण्यासाठी आलेल्यांना कुठलाही थारा न देता या कारवाया केल्या जात असल्याने गुटखा विक्रीची मजबुत चैन उध्वस्त होत आहे.तीन दिवसांपुर्वी दुचाकीवरुन विक्रीसाठी नेण्यात येणारा ४६ हजार रुपयांचा गुटखा पकडुन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी गुटखाविक्री विरोधात कारवाई केल्यानै गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत आहे.शहर पोलिसांची कारवाई या धंद्यामध्ये प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष गुंतलेल्यांच्या जिव्हारी लागत असली तरी ...

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची निवेदनाद्वारे मागणी

इमेज
महाडिबीटी प्रणाली सुरू करून लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची निवेदनाद्वारे मागणी अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- महाडिबीटी प्रणाली सुरू करू लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दिनांक २० जुन २०२५ रोजी दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाडिबीटी प्रणाली बंद असल्यामुळे श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार योजना, विधवा महिलांना दिले जाणारे अनुदान व दिव्यांग यासाठी मिळणारे अनुदान हे महाडिबीटीमुळे मिळत नाही. कारण, गेल्या एक महिन्यापासून महाडिबीटी बंद आहे. त्यामुळे या सर्व लाभधारकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यासाठी त्यांना बँकेचे व आपल्या कार्यालयाचे ह...