पोस्ट्स

जून २९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  जि.प. शाळेची वारी दिंडी : घोड्यांवर बसले विठ्ठल रखुमाई! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे आयोजित वारी दिंडी सोहळ्यात घोड्यावर बसलेले विठ्ठल रखुमाई हे सर्वांचे आकर्षण ठरले होते.  अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठुराया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्या म्हणजे एक आदर्श! या दिंडी सोहळ्याचा छोट्या स्वरूपातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी तालुका परळी वैजनाथ येथील विद्यार्थ्यांची आषाढी वारी दिंडी आयोजित करण्यात आलेली होती.  विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आलेल्या दोन विद्यार्थ्यांना घोड्यांवर बसून दिंडीच्या अग्रभागी ठेवण्यात आलेले होते. अनेक विद्यार्थिनी रखुमाईच्या वेशभूषेत डोईवर तुळशीवृंदावन घेऊन होत्या. विठुरायाच्या अभंगाच्या तालावर टिपऱ्या खेळत तसेच टाळ वाजवत विद्यार्थ्यांची पावले थिरकत होती. पूर्ण गावाला या दिंडीची फेरी घेण्यात आली. शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी यावेळी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.  गावकऱ्यांनी या दिंडीचे कौतुक केले. दिंडी...

आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक होणार बंद!

इमेज
परळी शहरातील ओव्हर ब्रीज वरील वाहतूक रस्ता ७ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान राहणार बंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       शहरातील ईटके कॉर्नर कडून येणारा ओव्हर ब्रीज वरील मुख्य वाहतूक रस्ता दि. ७ जुलै २०२५ पासून २७ जुलै २०२५ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.        प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.  नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला होता. आता आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक  बंद होणार आहे. उड्डाणपूल दुरुस्तीचे ...
इमेज
आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण परळी वैजनाथ(प्रतिनिधी) : आखिल भारतीय ग्राहक पंचायत परळीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनदृष्टीचा नव्या पिढीसाठी आदर्श म्हणून जागर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सामाजिक जीवनात कसा उपयोग करता येतो, यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या अध्यक्षा चित्रा देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ पारगावकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, परळी शाखेला विवेकानंदांचा फोटो भेट म्हणून दिला. यावेळी ग्राहक पंचायत च्या संघटन मंत्री विजया दहीवाळ, सामाजिक कार्यकर्त्या सौ. विदया  खिस्ते, उपाध्यक्ष सौ सुनिता बोडखे यांची उपस्थिती होती.तसेच डाॅ. किरण पारगावकर यांचा प्रवेश पण आजच झाला. स्वामी विवेकानंदांनी दिलेली प्रेरणा म्हणजे देशासाठी कार्यरत राहण्याची शिकवण आहे. त्यांच्या विचारांनी युवकांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ग्राहक पंचायत ही संघटने...
इमेज
थोरले पाटागंणावर चातुर्मास सेवेची सुरुवात   अमोल जोशी/ पाटोदा               श्री संत जनार्दन यांच्या संस्थान थोरले पाटागंण येथे ४२५ वर्ष पासून चालत आलेल्या  चातुर्मास  सेवेचा आज प्रारंभ झाला.   सकाळी श्री अभिषेक वैदिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला नंतर ब्रह्मश्री कृष्णा महाराज  रामदासी यांच्या मधुर वाणीतून श्रीमदभागवत ग्रंथ निरूपणास सुरुवात झाली, शेवटी खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला.    श्री विनायक महाराज व प्रसाद  शिवनीकर यांनी  भागवत संहिते चे पारायण सुरु केले व भिक्षा मागून दिवसभरातील सत्राची सुरुवात केली.   वेदमूर्ती श्रीकांत विडेकर, वेदमूर्ती श्रीपाद विडेकर व वेदमूर्ती प्रल्हाद जवळेकर यांच्या उपस्थिती अभिषेक झाला,अनिल कुलकर्णी मंगरूळकर पुरानिकसह अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.   भागवत श्रावणलाभ मिळवण्यासाठी सकाळी नऊ ते दहा या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन थोरले पाटागंण संस्थान, बीड च्या वतीने करण्यात येत आहे.
इमेज
भगर खाण्यापूर्वी काळजी घ्या:जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन  बीड, दिनांक 05 (जिमाका) : श्रावण मास, एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र, आषाढी एकादशी आदी उपवासाच्या काळात ‘भगर'चे (सामा, वरई) सेवन मोठ्या प्रमाणावर होते. भगर पचायला हलकी, उपयुक्त आहे. परंतु अलीकडील काळात काही ठिकाणी भगर खाल्ल्यानंतर विषबाधेचे प्रकार घडलेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी भगरचे सेवन करताना योग्य काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.  परवाना प्राप्त व विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच भगर खरेदी करावी. ती स्वच्छ, कोरडी, गंधविरहित आणि बुरशीमुक्त असावी. खराब, काळसर किंवा बुरशी लागलेली विकत घेऊ नये. बाजारात कमी दरात मिळणाऱ्या पॉलिश केलेल्या,  प्लास्टिकसदृश चमकदार भगरपासून दूर राहावे. एफएसएसएआय (FSSAI) प्रमाणपत्र असलेलीच भगर खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. भगर शिजवण्यापूर्वी किमान 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवावी. शक्य असल्यास 30 मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवावी. स्वयंपाक करताना स्वच्छ, उकळलेले पाणी, भांडी वापर...

रस्त्यावर कोंबड्यांचा बळी देणे आले अंगलट !

इमेज
देवीच्या मिरवणुकीत अघोरी  प्रकार; परळी शहरात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल परळी (प्रतिनिधी) |         परळी शहरात देवीच्या मिरवणुकीदरम्यान  आघोरी विधी करीत कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष व आयोजक  दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी वै.) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) चे कलम 325 आणि महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2013 चे कलम 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी , परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास , राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला , तसेच हळद, कुंकू, लिंबू व नागवेलीची पाने टाकून अघोरी विधी केला , असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.हा प्रकार समाजात भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असुन, त...

काँग्रेसची परळीत पून्हा एकदा 'बहादूर शहराध्यक्षालाच' पसंती !

इमेज
  काँग्रेस परळी शहराध्यक्षपदी  हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड  परळी,  प्रतिनिधी..  काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्ष पदाची  निवड करण्यात आली असुन  परळी शहराध्यक्षपदी हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         माजीमंत्री अशोक पाटील व बीड जिल्हा कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आज (शुक्रवारी) हानिफ करीम सय्यद उर्फ बहादुरभाई यांना परळी शहर अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्रदान केले आहे. काँग्रेस शहरात अधिक बळकटीने काम करेल अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.यावेळी जेष्ठ नेते प्रकाशराव देशमुख,अँड. शशीशेखर चौधरी, एहेतेशाम खतीब, सुभाष राव देशमुख, दीपक सिरसाट, बदर भाई, रसुल खान, व फरकुद आली बेग अदी नेते पदाधिकारी उपस्थित होते.

● उत्सुकता: संचालक मंडळ बिनविरोध की निवडणूक होणार ?

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! १७ जागांसाठी रणधुमाळी, १० ऑगस्टला मतदान तर 12 ऑगस्टला मतमोजणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –        वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम  जाहीर केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या या बँकेवर ना.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आहे.           ७ ते ११ जुलै दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १४ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ जुलै ते २९ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होईल. मतदान १० ऑगस्टला – सकाळी ८ ते संध्या ४ वा.पर्यंत होणार आहे.१२ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होवुन  निकाल लागेल. 🔹१७ जागा व संचालक जागांचे आरक्षण पुढीलप...
इमेज
वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी'कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासन सकारात्मक - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. ४ : समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अथवा वैयक्त‍िक जागेत कांदळवन आहेत. या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल. अशा जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणाकरिता ' कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.  पालघर जिल्ह्यातील कांदाळवनांच्या अतिक्रमणाबाबत सदस्य स्नेहा दुबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, संजय केळकर , राजेंद्र गावित यांनीही सहभाग घेतला. या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, कांदळवनांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन विभागाकडे ' मॅग्रोव्ह सेल ' कार्यरत आहे. या सेलच्या माध्यमातून कांदळवन संवर्धनाचे काम होत आहे. महाराष्ट्राच्या समुद्र...

सर्व स्तरांतून अभिनंदन !!!!!

इमेज
ॲड.प्रकाश मुंडे यांची परळी वैद्यनाथ काँग्रेस तालुकाध्यपदी निवड  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       काँग्रेसचे पक्षाचे धडाडीचे युवक नेते तथा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले अँड. प्रकाश बाबुराव मुंडे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या परळी वैद्यनाथ तालुकाध्यपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री अशोक पाटील  व बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे          अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या परळी वैद्यनाथ काँग्रेसच्या तालुकाध्यपदी अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. या बाबत दिलेल्या पत्रकात म्हटले की, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार परळी वैद्यनाथ तालुकाध्यपदी निवड करीत आहे. आपणास जाणीव आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  मल्लीकार्जुन ...
इमेज
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करा:आ. नमिता मुंदडा यांनी केली अधिवेशनात मागणी अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )-- अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.        राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधिवेशनात विधिमंडळ सभापतींच्या समोर मांडुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत असते. याच उद्देशाने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या विभागातील कॅन्सर रोगाने ग्रस्त झालेले अनेक रुग्ण आढळून येत असल्याम...
इमेज
  मजास इनामदार यांच्या प्रयत्नाने रेणुका चौक ते ट्रॅक रस्त्यावर पथदिवे बसविले परळी (प्रतिनिधी)   परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागात असलेल्या रेणुका चौक ते रनिंग ट्रॅक मार्गावर गत काही महिन्यांपासून पथदिवे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे  यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते मजास इनामदार यांच्या प्रयत्नाने या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आल्याने मोठी गैरसोय दुर झाली आहे.  बसवेश्वर कॉलनी भागात डोंगराच्या कडेने जात असलेल्या रेणुका चौक ते रनिंग ट्रॅक रस्त्यावर रात्री व पहाटे नागरीक विशेषतः महिला व्यायामासाठी मोठ्या संख्येने येत असतात या रस्त्यावर पथदिवे नसल्याने सर्वत्र अंधार होता.यामुळे व्यायामासाठी येणार्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते मजास इनामदार यांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत ही बाब निदर्शनास आणुन दिली.न.प.प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करत या रस्त्यावर पथदिवे बसविले.या रस्त्यावरील अंधाराचा प्रश्न सुटल्याने मजास इमानदार यांचे सर्वत्र क...
इमेज
गॅलेक्सी हॉस्पिटल, लातूर येथे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रतिमा भेट आणि डॉक्टरांचा सन्मान लातूर | प्रेम भक्ती साधना केंद्र, परळी यांच्या वतीने गॅलेक्सी हॉस्पिटल, लातूर येथे पवित्र ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रतिमेचे भेट देण्यात आले. या प्रसंगी हॉस्पिटलमधील मान्यवर डॉक्टर्स – हृदय तज्ञ डॉ. गजानन चव्हाण सर, डॉ. शिरीष पाटील  आणि डॉ. विश्रांत भारती  यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या  कार्यक्रमास प्रेम भक्ती साधना केंद्राचे रमेश मुंडिक धारासुरकर, युवानेते तेजस टाक यांच्यासह केंद्राचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता.सत्काराच्या वेळी प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने डॉक्टर्सना मानवतेची सेवा म्हणजेच खरी भक्ती असल्याचा संदेश देण्यात आला. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या टीमनेही प्रेम भक्ती साधना केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांप्रती कृतज्ञतेची भावना या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “जीवन वाचवणारा हात म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो. अंधारा...
इमेज
स्व.सुवालाल वाकेकर प्रतिष्ठानच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुवालाल वाकेकर यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपले - अनंत मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक, साहित्यिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विशेष करून शैक्षणिक चळवळीला बळकटी देऊन सुवालालजी वाकेकर यांनी सामाजिक दायित्व जपले, एवढेच नाही तर सुवालालजी वाकेकर हे संस्कार मूल्यांचे व्यासपीठ होते असे उद्गार मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी, शाहीर अनंत मुंडे यांनी काढले.     शहरांमध्ये सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने परळी मसापाचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज भगवान विद्यालय व नागनाथ निवासी विद्यालय वडसावित्री येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.      या कार्यक्रमास वाकेकर परिवारातील सदस्य परळीतील प्रतिष्ठित व्यापारी दीपक वाकेकर, महावीर बढेरा, अशोक कांकरिया, राजेश कांकरिय...
इमेज
परळीत चार दिवसीय दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन सु. श्री. मनीषा दीदीजी यांच्या दिव्य अमृतवाणीतून होणार सदभक्तांचे उद्बोधन परळी वैजनाथ प्रतिनिधी...     परळीत दिनांक ३ जुलै २०२५ ते ७ जुलै २०२५ या कालावधीत येथील कल्याणकारी हनुमान मंदीर मानिकनगर या ठिकाणी दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सत्संग सोहळ्यामध्ये श्री सिद्धारूढ आश्रम निवाने नाशिक येथील सु. श्री. मनीषा दीदीजी या आपल्या अमृत रसाळवाणीतून सदभक्तांचे उद्बोधन करणार आहेत अशी माहिती या सत्संग सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.            याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ येथील कल्याणकारी हनुमान मंदिर माणिक नगर या ठिकाणी आयोजित दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजक परळी वैजनाथ येथील प्रेम भक्ती साधना केंद्र व हरिहर भजनी मंडळ असून  जागृती नागरि पतसंस्था व जागृती मल्टीस्टेट यांच्या सौजन्याने हा सत्संग सोहळा संपन्न होत आहे. श्री क्षेत्र प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत आज पासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय सत्संग सोहळ्यास प्रेम भक्ती साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाने (नाशि...

मुश्रीफ यांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार

इमेज
ना. पंकजा मुंडेंचा पुढाकार ; गडहिंग्लज प्रशासकीय इमारतीला उपलब्ध करून दिली पशुसंवर्धनची जागा - अनेक वर्षांपासूनचा प्रश्न लागला मार्गी उपमुख्यमंत्री अजित पवार - ना. पंकजा मुंडे यांच्यात बैठक ; मंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागालाही मिळणार स्वतंत्र कार्यालय मुंबई।दिनांक ०२। गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील उप विभागीय कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्यात आज झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाने त्यांची ७५ आर जमीन यासाठी उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान या नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागाचे देखील स्वतंत्र कार्यालय असणार आहे. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबद्दल ना. पंकजाताईंचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ना. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज विधानभवनातील त्यांच्या समिती कक्षात कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब...
इमेज
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या न्या.शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. शिंदे समितीला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.      मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. शिंदे समितीला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.समितीला सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला अनुसरून राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन केलेली आहे, राज्यातील कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातीचा शोध घेऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली. राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम शिंदे समितीकडून सुरू आहे. या समितीकडून मराठा आरक्षणाबाबत कुणबी असल्याचे दाखले शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यात...
इमेज
डॉक्टर हे समाजातील मूल्यवान घटक – विजयाताई दहिवाळ परळी वैजनाथ | प्रतिनिधी        डॉक्टर डे निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा, परळी वैजनाथ यांच्या वतीने परळीतील काही मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा सौ. चित्राताई देशपांडे, संघटन मंत्री विजयाताई दहिवाळ, मेंबर्स सौ. सुनीता बोडके व सौ. संध्या सरोदे उपस्थित होत्या.        भारत सरकारने 1991 मध्ये एक जुलै हा दिवस ‘डॉक्टर डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवशी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. कार्यक्रमात विजयाताई दहिवाळ यांनी डॉक्टरांविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "डॉक्टर समाजातील अत्यंत महत्त्वाचा व मूल्यवान घटक आहेत. देव सगळीकडे प्रत्यक्ष येऊन आपली काळजी घेऊ शकत नाही, म्हणून डॉक्टर रूपाने तो आपल्या मदतीला धावून येतो. डॉक्टर हा शब्द उच्चारताच विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. प्रत्येक रुग्ण ड...
इमेज
  राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत G-champ अकॅडमीचे घवघवीत पाटोदा /अमोल जोशी  राज्यस्तरीय जी-चॅम्प अब‌‌ॅकस स्पर्धेत पाटोदा येथील.     G - Champ अकॅडमीने मोठे यश मिळवत, शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. जून महिन्यात  संभाजीनगर येथे झालेल्या या  प्रतिष्ठित स्पर्धेत पाटोदा  शहरातील १६ जणांच्या चमूने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रेम आगलावे आणि ‌‌श्रेया वसंत दराडे या दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च सुपरस्टार ट्रॉफी पटकावत सन्मान मिळवला. तसेच सिध्देश्वर बाबू गर्जे ,वेदिका महादेव सुकाळे, सक्षम विशाल जावळे यांनी प्रथम क्रमांक तसेच गणेश चौरे दितीय क्रमांक आणि अनिकेत महादेव सुकाळे , अमन सत्यद,या दोघांनी तृतीय क्रमांक मिळवून आपली प्रतिभा सिद्ध  केली. सुमारे ७५% विदयार्थानी कमी वेळेत १००% अचुक गणनापध्दतीने आपले पेपर पूर्ण करत सार्धेत उल्लेखणीय कामगीरी केली. या स्पर्धेत अवघ्या 7 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे होते.या यशामुळे पाटोदयाचे नाव राज्यस्तरावर झळकले असून आपल्यासाठी हे एक अभिमानाचे क्षण आहेत. या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सौ. मंजिरी श्रीहरी पांडव यां...
इमेज
  परळी पंचायत समिती समोर बांधकाम कामगारांचे यशस्वी आंदोलन-प्रा. खाडे बी.जी. परळी वैजनाथ,प्रतिनिधी...       बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतिने नागापूर येथील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी मागील वर्षी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी 30 जून रोजी धरणे आंदोलन केले. नागापूर येथील 25 बांधकाम कामगारांनी धरणे आंदोलनात सह‌भाग घेतला.  परळी शहरातील बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात समर्थनासाठी हजर राहिले.           पंचायत समिती परिसरात घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. प्रा. बी.जी.खाडे, प्रभाकर नागरगोजे व काॅ.जालिंदर गिरी यांचे प्रतिनिधी मंडळ बी डी.ओ. केंद्रे यांना भेटून चर्चा केली. परळी तालुक्यातील 1500 बांधकाम कामगाराची सरकारी कामगार अधिकाऱ्याने दिलेली नोंदी व  कामगाराची १ आगस्ट ते 23 जून पर्यंतची यादी दिली आहे. ग्रामसेवक सांगतात प्रमाणपत्र  देणे बंद आहे' असे खोरटे बोलून खऱ्या गरीब बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देत नाहीत. ग्रामसेवकाकडील काम काढलेले नाही असे सरकारी बांधकाम कामगार अधिका-याचे पत्र बीडीओना दिले.   ...
इमेज
🟠 अधिवेशनात 'हटके ग्रॅण्ड एण्ट्री' : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा ईव्ही कारमधून 'ग्रीन प्रवास'! प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनीच ई -व्हेईकल वापरासाठी  पुढाकार घ्यावा- पंकजा मुंडे   मुंबई, ३० जून (प्रतिनिधी) –            राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज एक वेगळाच आदर्श घालून दिला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरास सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, त्यांनी पारंपरिक वाहनाऐवजी महिंद्राच्या ईव्ही कारमधून रामटेक निवासस्थानातून थेट विधिमंडळात 'ग्रीन एण्ट्री' केली.          महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत इलेक्ट्रिक कारच्या वापराची सुरुवात केली आहे. "आधी केले मग सांगितले" या उक्तीला अनुसरून त्यांनी जनतेसमोर कृतीतून संदेश दिला की, शासकीय पातळीवर प्रदूषणविरहित पर्यायांची निवड ही काळाची गरज आहे.विधिमंडळात पंकजाताई मुंडेंची...

आरोपींनी राजकीय पाठबळावर अनेक गुन्हे लपवले, ते समोर येणे गरजेचे - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट बीड अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करण्याची पत्राद्वारे मागणी मुख्यमंत्री सकारात्मक; बीड प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत होणार! आरोपींनी राजकीय पाठबळावर अनेक गुन्हे लपवले, ते समोर येणे गरजेचे - धनंजय मुंडे मुंबई (दि. ३०) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन या प्रकरणात बीड जिल्हा बाहेर सेवेत असलेल्या एका अनुभवी आय पी एस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून स्वतंत्र चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.  बीड शहरातील उमाकिरण संकुलात आरोपी विजय पवार व प्रशांत खटोकर यांनी अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रक...

आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा

इमेज
बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी आरोपींवर कडक कार्यवाही करा - ना. पंकजा मुंडेंच्या एसपींना सूचना आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा बीड।दिनांक ३०।  शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करणा-या आरोपींविरुद्ध कठोर आणि कडक कार्यवाही करा अशा सूचना पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी एसपींना केल्या आहेत.    या घटनेविषयी ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी नुकतीच घटनेची माहिती घेवून याविषयी सूचना केल्या.उमाकिरण शैक्षणिक संकुलातील शिक्षक प्रशांत खटावकर आणि  विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले, याविरूध्द  सदर विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी लगेच पोलिस अधीक्षकांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना केली होती. मुळातच ही घटना अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे, शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे, त्यांन...
इमेज
बीड:धनंजय मुंडेंनी केलं खेडकर कुटुंबीयांचे सांत्वन बीड दि. 29 - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे त्यांचे सहकारी बाळासाहेब खेडकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.  बाळासाहेब खेडकर यांच्या मातोश्री स्व. मंदा बाई नारायणराव खेडकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले होते. बीड येथे आल्यानंतर याबाबत माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकारी बाळासाहेब खेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी डॉ योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, ॲड गोविंद फड, मोहनराव ढाकणे यांसह पदाधिकारी व खेडकर कुटुंबीय उपस्थित होते.

१५० दिवसांनंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच मनमोकळे बोलले...!

इमेज
  बीड अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एस आय टी चौकशीची धनंजय मुंडे यांची मागणी अशा नीच नराधमांना व त्यांना मदत करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार - धनंजय मुंडे बीड दि.29 (प्रतिनिधी): बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार दुर्दैवी व संतापजनक आहे. यातील आरोपी विजय पवारला राजकीय बळ आहे, बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आश्रयाने व वरदहस्ताने या लोकांची इथपर्यंत मजल गेली आहे. या प्रकरणी व्यवस्थित तपास होऊन याधीही असे गुन्हे या लोकांनी केले आहेत का, याची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे, म्हणून आपण या प्रकरणी एस आय टी चौकशीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.  हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, त्या अल्पवयीन भगिनी ने जी अत्याचार सहन केला, त्याची पीडा ती स्वतः व तिचे पालकच समजू शकतात.  मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत होते, अशी...

समाजभान, सेवा वृत्ती आणि नेतृत्व कौशल्याची झाली प्रशंसनीय दखल

इमेज
श्रीनिवास राऊत यांची ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ’ च्या परळी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती समाजभान, सेवा वृत्ती आणि नेतृत्व कौशल्याची झाली प्रशंसनीय दखल परळी / प्रतिनिधी – नाभिक समाजाच्या हक्कांसाठी दिवस-रात्र परिश्रम करणारे, समाजसेवेला आयुष्य समर्पित करणारे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरलेले श्रीनिवास बबनराव राऊत यांची ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ’ परळी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड केवळ एका पदाची नाही, तर त्यांच्या दीर्घकालीन कार्यकर्तृत्वाला समाजाने दिलेली सन्मानाची पावती आहे. या निवडीचा गौरव सोहळा परभणी येथे दिमाखात पार पडला. ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार  महासंघाचेअध्यक्ष मा. कल्याणजी दळे साहेब आणि परभणी महानगरपालिकेचे उपमहापौर मा. भगवानरावजी वाघमारे दादा, कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, सरचिटणीस पांडुरंग भवर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप झगडे, युवा नेते तथा बिल्डर आणि शासकीय गुतेदार गणेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीनिवास राऊत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्तीचे अधिकृत पत्...
इमेज
शक्तिपीठ महामार्गास मराठवाड्यात तीव्र विरोध कृषिदिनी बाधित शेतकरी करणार रास्तारोको आंदोलन बीड / प्रतिनिधी.....       पवनार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत असून देखील राज्य सरकार हा प्रस्तावित महामार्गास निर्मितीसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या असून या महामार्गास मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. परभणी, धाराशिव या पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजोगाई या तालुक्यातील शेतकरी देखील या महामार्गाच्या विरोधात  एकवठले असून शेतकऱ्यां देशोधडीला लावणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै कृषिदिन रोजी आंबेजोगाई तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी 27 हजार एक्कर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार असून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी भूमिहीन करण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे लक्ष्यात येताच राज्यात तसेच मराठवाड्यात या महामार्गास तीव्र विरोध होत आहे.मराठवाड्यातील परभण...
इमेज
बीड : लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या बीड : शहरातील  नामांकित उमाकिरण क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याच्या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून  फरार असलेले प्रा. विजय पवार व खाटोकर यांना अखेर शनिवार (दि. २८) रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.        स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरातून सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना सफारी गाडीतून हे दोघे पुढे जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ पथक रवाना करून दोघांना अटक केली.
इमेज
भीषण अपघात:तीन जणांचा मृत्यू एक गंभीर अंबाजोगाई :तालुक्यातील बर्दापूर - हातोला रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर  धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.       अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर भीषण अपघात झाला. दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री 7.30च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला, तर दोघांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालाय.या अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.