विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.....

अकरावी प्रवेश प्रक्रिया – नवीन सूचना जाहीर, नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! परळी वैजनाथ, ५ जून २०२५ – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची आणि दिलासादायक सूचना जाहीर करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा अर्ज अर्धवट राहिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टपणे कळवले आहे की, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी काही अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🔹 भाग १ लॉक करून भाग २ बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी: ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ अद्याप भरलेला नाही किंवा लॉक केलेला नाही , अशा विद्यार्थ्यांना आता दुसरी संधी दिली जात आहे. ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० या कालावधीत या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरून लॉक करता येणार आहे. मात्र, आधीच भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना या कालावधीत पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही. 🔹 नोंदणी न केलेल्या किंवा अर्धवट अर्ज असलेल्या विद्या...