
परळी शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैद्यनाथ शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहरातील प्रसिद्ध व जुने व्यापारी शंकर अप्पा उदगीरकर यांचे नुकतेच निधन झाले होते, त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्यापारी भगवानराव डुबे यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दोन्ही कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जयपाल लाहोटी, चेतन सौंदळे, कुमार व्यवहारे, शंकर कापसे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.