नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

 खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना




परळी मतदारसंघात खत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना


परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) -


पेरणीच्या तोंडावर काही डीलर्स स्वतःकडे खताचा साठा असूनही तो लपवत असल्याचा व कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याच्या तक्रारी येत असून, कृषी विभागाकडूनही काही प्रमाणात खत येणे बाकी असून आवश्यक साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच स्थानिक डीलर्स कडे उपलब्ध असलेल्या साठ्याची आकडेवारी तात्काळ समोर आणावी, अशा सूचना आज माजी कृषमंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी खत व्यवस्थापन प्रमुख तसेच स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांना केल्या आहेत. 


जून अखेर परळी मतदारसंघात आवश्यक असलेल्या युरियासह, डीएपी व अन्य आवश्यक खतांच्या साठ्यामध्ये जो फरक आहे, तो फरक रेक लावून तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत सूचना केल्या. 


खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच प्रमुख मागण्या असलेली व नामांकित खते डावलून जाणीवपूर्वक लिंकिंग करत निकृष्ट दर्जाची खते पर्याय म्हणून जबरदस्तीने विकणाऱ्या डीलर्स व दुकानदारांची नावे उघड करून त्यांच्यावरती तातडीने शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी असेही सूचना धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 


खरीप हंगामाच्या तोंडावर खत बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, यासाठी बफर स्टॉक सह यापुढील प्रत्येक घडामोडीची आकडेवारी सह माहिती देण्यात यावी याबाबतही धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. यावेळी प्र. तहसीलदार श्रीमती पठाण, ए डी ओ गरांडे, परळी व अंबाजोगाई चे तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,  अजय मुंडे, अभय मुंडे, राजाभाऊ पौळ यांसह आदी उपस्थित होते. 


*जनता संवाद, गर्दी अन् जागच्या जागीच तोडगा, धनंजय मुंडेंचा दरबार पुन्हा गजबजला...!*


धनंजय मुंडे जिथे जातील तिथे गर्दी, आपल्या समस्या, अडचणी व मागण्या घेऊन येणारे कार्यकर्ते व सामान्य नागरिक आणि त्याच ठिकाणी त्यांच्या समस्यांवर जागच्या जागीच तोडगा काढणारे धनंजय मुंडे, असे धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे स्वरूप सबंध राज्याला परिचित आहे!


आजापणामुळे व विविध आघात सहन केल्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा सक्रिय झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती पुन्हा तितक्याच ताकदीने परळी मतदारसंघ, बीड जिल्हा इतकेच नव्हे तर जिल्हा बाहेरून देखील कार्यकर्ते व सामान्य नागरिकांची गर्दी जमा होऊ लागली असून, त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेत जागच्या जागीच त्यावर तोडगा काढण्याची धनंजय मुंडे यांची प्रचलित कार्यपद्धती पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या