"आज तू हवी होतीस.." या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जल्लोषात 


पुणे – डॉ. सदाशिव रोकडे लिखित "आज तू हवी होतीस.." या नव्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अखंडित कल्याणकारी ग्रुप व काकडे देशमुख संस्था आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात जल्लोषात पार पडला. कात्रज, पुणे येथे भरलेल्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पुस्तकासाठी प्रा. कल्याण राऊत यांनी प्रस्तावना लिहिली असून, मानवी भावभावनांचा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांमध्ये वेध घेणारा हा संग्रह रसिक वाचकांसाठी सादर करण्यात आला. प्रेम, विरह, मैत्री, निसर्ग, सामाजिक वास्तव, जीवनातील सुखदुःख, स्वप्नं आणि आत्मचिंतन अशा विविध विषयांवर आधारित या कवितांमधून मानवी जीवनाचे विविध पैलू शब्दबद्ध करण्यात आले आहेत.

"आज तू हवी होतीस.." या संग्रहातील कविता केवळ भावनिक नात्यांचा आलेख नसून त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या, विचारांना चालना देणाऱ्या आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणाऱ्या आहेत. शब्दांचा गंध आणि भावनांचा गोडवा अनुभवण्यास मिळतो, असे मत यावेळी उपस्थित साहित्यिकांनी व्यक्त केले.

साहित्यप्रेमींसाठी हे पुस्तक नक्कीच एक समृद्ध अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार