"हर घर नर्स, घर घर नर्स" या मोहिमेतून लाखो नर्सिंग कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी — अनिल जायभाये बीडकर यांची माहिती
मुंबई (प्रतिनिधी):
देशातील तसेच परदेशातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी "हर घर नर्स, घर घर नर्स" ही भव्य मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.
या मोहिमेच्या अंतर्गत AIIMS, DMER, DHS सारखी शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम, ओल्ड एज होम, बेबी केअर सेंटर, होम केअर सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, अंगणवाड्या, शाळा (मराठी व इंग्रजी माध्यम), आदिवासी शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठे, बँका, मॉल्स, डि मार्ट, रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, तसेच विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये नर्सिंग स्टाफसाठी रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात अशा सर्व ठिकाणी एक नर्सिंग कर्मचारी असणे बंधनकारक करण्यात आले असून, याअंतर्गत नर्सिंग स्टाफला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमातून विशेषतः महाराष्ट्रातील १० लाख नर्सिंग कर्मचारी बंधु-भगिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे श्री. जायभाये यांनी सांगितले.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील पात्रता असलेल्या नर्सिंग विद्यार्थी/कर्मचाऱ्यांनी पुढे यावे:
- INC व MNC मान्यता प्राप्त संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलेले
- ANM, GNM, PBSC, BSC, MSC, NSG-ICN, NSG-PHD, NSG-MBA, NSG-BBA, हॉस्पिटल मॅनेजमेंट, पेडियाट्रिक नर्सिंग, ऑर्थोपेडिक नर्सिंग, सायकेट्रिक नर्सिंग इत्यादी डिप्लोमा/डिग्री धारक
साथच, बोगस नर्सिंग कॉलेजपासून सावध राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
या मोहिमेशी संबंधित अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क:
अनिल जायभाये बीडकर — 9011772189
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा