वैद्यनाथ कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. जे. व्ही. जगतकर यांची नियुक्ती

  

परळीवैजनाथ, प्रतिनिधी... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. जे. व्ही जगतकर यांची नियुक्ती सेवाजेष्ठता नुसार संस्था व विद्यापीठाने केली आहे.

      डॉ जे व्ही जगतकर यांना शिक्षण क्षेत्रातील व प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विविध परिषदा, शोध निबंधाचे वाचन त्यांनी केलेले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे व प्रदीर्घ अनुभवामुळे संस्थेने त्यांची प्राचार्य पदी नियुक्ती केलेली आहे.  या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  श्री धनंजय मुंडे , जवहार शिक्षण संस्थेचे सचिव  श्री दत्ताप्पा इटके यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. जे व्ही जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार