अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम
पंतप्रधान मोदींमुळे 'सुशासन' ही देशाची संस्कृती बनली - ना. पंकजा मुंडे
अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम : ना. पंकजाताईंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
अमरावती ।दिनांक १६।
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा गेल्या अकरा वर्षाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी याकाळात करण्यात आली असून सरकार म्हणजे सेवा या हेतूने काम केले जात आहे. मोदींमुळे सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे, असे सांगत त्यांच्या योजना सर्व सामन्यापर्यंत पोचवा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पुर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात भाजपातर्फे 'संकल्प से सिद्धी' हा उपक्रम राबविला जात आहे, याचाच एक भाग म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मोदी सरकारच्या लोक कल्याण कारी कामाचा लेखाजोखा मांडताना पंकजाताई पुढे बोलतांना म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या गोष्टी साध्य झाल्या त्यात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर विकासाला गती मिळते, भाजपा सरकार जेथे जेथे आहे तेथे तेथे गरिबांचा विकास झाला आहे, सरकार म्हणजे सेवा या हेतूने काम केले जाते या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेल्या 11 वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार, सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ, आयुष्यमान भारत, पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, जनधन योजना, ऑपरेशन सिंदूर अशी कितीतरी चांगली कामे झाली आहेत. यासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विविध विकास योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपण सर्वांनी करावे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी शहराध्यक्ष डाॅ .नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष प्रभुदास बिलावलेकर, रविराज देशमुख, प्रवक्ते शिवराज कुलकर्णी, जयंत डेहणकर, ललित समदूरकर, युवा मोर्चाचे बादल कुलकर्णी, कौशिक अग्रवाल, राजु कुरील, सुनील काळे, संजय नरवणे, कुसुमताई साहू, राधा कुरीळ यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबादेवी मंदिरात 'नो प्लास्टिक मोहीम'
--------
ना. पंकजा मुंडे यांनी सकाळी शहरातील सुप्रसिद्ध श्री.अंबादेवी मंदिरात देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच, आई एकवीरा मातेचे देखील दर्शन घेऊन सप्त गोमाता प्रदक्षिणा मंदिरातील गोशाळेस भेट दिली. उपस्थित भाविक भक्तांना कापडी पिशव्यांचे वाटप करून एकल प्लॅस्टिक बंदीबाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आलेला स्नेहसत्कार स्विकारला.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा