
भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे भाविकांनी घेतले दर्शन परळी (प्रतिनिधी) शहरातील गणेशपार भागातील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवार दि.१० एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.भगवान महावीरांच्या प्रतिमेची रथात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत करत दर्शन घेतले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त गुरुवारी गणेशपार भागातील दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी सात वाजल्यापासुन पारायण,भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी 10 वाजता आकर्षक रथामध्ये जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची जैन मंदिर येथुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी चढावा घेत महावीर संघई व सौ.मनिषा संघई यांनी घेत शोभायात्रा निघालेल्या भगवान महावीर यांच्या रथामध्ये मान मिळविला. सदरील शोभायात्रा अंबेवेस,नेहरू चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट,जैन स्थानक,बाजार समिती,मोंढा, राणी लक्ष्मीबाई टॉवर,गणेशपार मार्...