ट्रकचे टायर बदलतांना कारने धडक दिली....जागेवर मृत्यू!

 परळी-सिरसाळा रोडवर भीषण अपघात : ट्रक मालक सय्यद मगदुम यांचा मृत्यू

परळी-सिरसाळा रस्त्यावर आज रात्री 11.45 वा.सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक मालक सय्यद मगदुम सय्यद जफर (वय अंदाजे 45, रा. पेठ मोहल्ला, परळी वै.) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


प्राथमिक माहितीनुसार, सिरसाळा जवळील रस्त्यावर सय्यद मगदुम रस्त्याच्या कडेला  पंक्चर झालेला आपल्या ट्रकचा टायर बदलत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

        घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक, नागरिकांनी मोठी गर्दी केली.दरम्यान धडक दिलेली कार सिरसाळा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !