गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमात झाली होती चोरी....!

परळी शहर पोलीसांच्या तत्पर तपासामुळे चोरी गेलेले अडिच लाखांचे सोन्याचे दागिने परत





परळी (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहरातील हलगे गार्डन येथे शिव महाकथेच्या कार्यक्रमात महाप्रसादाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन चोरीला गेले होते. याप्रकरणी फिर्यादी कमलाबाई मोतीलाल बांगड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर १७६/२४ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे गोविंद भताने, पोहे घटमळ, पो ना/पांचाळ यांनी तपास करत बीड व धाराशिव येथे आरोपी महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

आरोपींकडून चोरीस गेलेले एक मनी मंगळसूत्र व सोन्याची चैन जप्त करण्यात आलीअसुन, आज फिर्यादी महिला कमलाबाई यांचा मुलगा मनोज कुमार मोतीलाल बांगड यांच्याकडे २५ ग्रॅम वजनाची, सुमारे ₹२,५०,०००/- किमतीची चैन परत करण्यात आली आहे.चोरी गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय यांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या