शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमात झाली होती चोरी....!

परळी शहर पोलीसांच्या तत्पर तपासामुळे चोरी गेलेले अडिच लाखांचे सोन्याचे दागिने परत परळी (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहरातील हलगे गार्डन येथे शिव महाकथेच्या कार्यक्रमात महाप्रसादाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन चोरीला गेले होते. याप्रकरणी फिर्यादी कमलाबाई मोतीलाल बांगड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर १७६/२४ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे गोविंद भताने, पोहे घटमळ, पो ना/पांचाळ यांनी तपास करत बीड व धाराशिव येथे आरोपी महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले एक मनी मंगळसूत्र व सोन्याची चैन जप्त करण्यात आलीअसुन, आज फिर्यादी महिला कमलाबाई यांचा मुलगा मनोज कुमार मोतीलाल बांगड यांच्याकडे २५ ग्रॅम वजनाची, सुमारे ₹२,५०,०००/- किमतीची चैन परत करण्यात आली आहे.चोरी गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय यांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहेत.