परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

घरच्यांच्या त्रासातून वैतागलेला पती बेपत्ता .....!

धक्कादायक: माहेरहून१५ लाख आण, दीरासोबत नांद म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळी शहरात पुन्हा एकदा सासरकडील छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वडार कॉलनीतील एका विवाहीत  तरुणीने परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सासरच्या लोकांविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे.

        पिडितेच्या आरोपानुसार तिची सासू लक्ष्मीबाई, सासरे आसाराम आणि दीर शुभम हे गेल्या अनेक महिन्यांपासून तिचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ करत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने माहेरून १५ लाख रुपये घेऊन ये असा दबाव टाकला जात होता. या मागणीस नकार दिल्याने  अनेक वेळा मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर तू तुझ्या दीरासोबत नांद अशी बळजबरी  तिच्यावर सातत्याने  करण्यात  आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिला सासू-सासरे आणि दीर यांनी मिळून मारहाण केली.पैसे नाही आणलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे. या सर्व प्रकरणात तिचा नवरा दोन दिवसांपासून गायब आहे. तो अजूनही घरी परतलेला नाही.

      या प्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायदंड संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 74, 85, 115(2), 352, 351(2), 351(3), आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!