MB NEWS- हार्दिक अभिनंदन!!!!

उपमुख्याध्यापक अरुण कांबळे यांना पीएच.डी. बीड: केज तालुक्यातील शिंगणी येथील मूळ रहिवासी तथा छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक अरुण लक्ष्मणराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'महात्मा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा' या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली .डॉ. डी. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'डॉ.बाबसाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन: एक अभ्यास (1920 ते 1970 )' या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. अरुण कांबळे हे गेल्या 33 वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. ते इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक , लसाकम या सामाजिक संघटनेचे राज्य प्रवक्ते आहेत . त्यांचा अनिगुत काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे . मासिक लहूशक्ती, मासिक तथागत चे त्यांनी अनेक वर्ष संपादन केले आहे .विविध विषयांवर अनेक वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून आय.एस.टी. म्हणून ते जपान ये...