पोस्ट्स

जुलै १३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे

इमेज
  ज्ञाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड:आवेदन पत्र सादर करा गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे  गेवराई ( प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे शुक्ल यजुर्वेदीय मांध्यदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे व शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड संयुक्त विद्यमाने पारितोषिक अर्ज संस्थेकडे मागविण्यात येत आहेत.  पारितोषक १0 व१२ वी पदवी, पदविका व उच्च पदवी धारकांना गुणाक्रमाने दिले जाते त्यासाठी अर्जाची प्रिंट विद्यार्थ्यांना द्यावी व बीड जिल्हा सही शिक्क्याने पुणे कार्यालयाकडे पाठवावीत तसेच परतफेड शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.  नियम :- शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ती परत करावयाची आहे. अर्जाची किंमत फक्त रु १00 सर्व कागदपत्र पूर्ण करून अर्ज स्टॅम्प पेपर आम्ही पत्रासहित शाखेच्या सही शिक्क्याने मध्यवर्ती कडे पाठवावा.     वरील शिष्यवृत्तीसाठी ज्ञाती समाज बांधव गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज सादर करावेत. सर्वांनी संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज संस्थेकडे द्यावेत याचा ...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त....

इमेज
  रविवारी पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन - डॉ.राजेश इंगोले ======================= अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )     राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी  अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मराठी पत्रकार परिषद वैद्यकीय कक्ष व राजकिशोर पापा मोदी  मित्र मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुन  या आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय कक्ष प्रमुख सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.      शहरातील समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत या भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात ...
इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे  आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात   परळी (प्रतिनिधी ) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने वार शनिवार दिनांक 19/7/2025/ रोजी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते.                            दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धे च्या निमित्ताने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत1) पी टी उषा हाऊस 2)  कर्मन मल्लेश्वरी 3) मिल्खा सिंग 4 ) मेजर ध्यानचंद हाऊस या सर्व हाऊस मधील मुलांनी उस्फुर्त सहभाग घेतला यात इयत्ता  पहिली ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक कुमारी संघमित्रा हुमने मॅडम ,राजु कलावत, भरत हएलओर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.               या स्पर्धा आयोजित क...
इमेज
 पं.यादवराज फड यांना स्वरब्रह्म पुरस्कार जाहिर  अंबाजोगाई :  तालुक्यातील वरवटी येथील पंडित यादवराज फड यांना स्वरब्रह्म संगीत पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वरब्रह्म कला अकादमीच्या वतीने घेण्यात येणारा यंदाचा स्वरब्रह्म संगीत महोत्सव धायरी,पुणे येथे  होणार आहे. या महोत्सवात स्वरब्रह्म कला अकादमीच्या पन्नासहून अधिक विद्यार्थी कलाकार आपले गायन - वादन सादर करणार आहेत. यानिमित्ताने किराणा घराण्याचे जेष्ठ गायक व संगीतकार पं. यादवराज फड, जेष्ठ किर्तनकार व गायक-वादक ह.भ.प.भास्कर महाराज सानप, नाना पानसे घराण्याचे युवा पखावज वादक कृष्णा साळुंके व युवा गायक गोविंद कांबळे यांना स्वरब्रह्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.11 हजार रू. रोख,सन्मानचिन्ह ,शाल   श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पं. यादवराज फड यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार असुन रसिक, कलाकार व मान्यवर मंडळी या महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. धायरी येथील कै.बंडोजी खंडोजी चव्हाण हायस्कुल सभागृह येथे रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव संपन्न होणार असुन पुणे व परिसरा...

सभागृहात आमदारांना दिलेला शब्द पाळला

इमेज
अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल; अधिवेशन संपताच पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश सभागृहात आमदारांना दिलेला शब्द पाळला मुंबई, दि. १९ – अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या. सी.टी.एस. क्रमांक १६१, पहाडी गोरेगाव परिसरात झालेल्या पाहणीत आमदार श्री. परब, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.  यावेळी बफ...

MB NEWS-बीड जिल्हयात २४ ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी ९ कोटी ४० लाखाची तरतूद

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांच्या कामाचा धडाका राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती ; जिल्हा नियोजन मधून ४५८ कोटी होणार खर्च बीड जिल्हयात २४ ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी ९ कोटी ४० लाखाची तरतूद मुंबई,।दिनांक १८। राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गतिशील काम करण्याच्या पध्दतीमुळे राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी    यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.    पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाची सुत्रे हातात घेतल्यापासून ना. पंकजाताई मुंडे यांनी एका मागोमाग एक चांगल्या निर्णयासह आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. पशुसंवर्धनला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय त्यांनी  घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसूली विभागातील ३४ जिल्ह्यात एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय ...

MB NEWS-गरजूंनी लाभ घ्यावा आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाचे आवाहन

इमेज
  उपमुख्यमंत्री अजित पवार व‌ आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन - डॉ.राजेश इंगोले गरजूंनी लाभ घ्यावा आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाचे आवाहन ==================== अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे ) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. तर आरोग्य तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.  शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांच्या समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन ...

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

इमेज
  परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी दुचाकी व एसटी बसमडध्ये  धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...        परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज  झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी  एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.  धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

MB NEWS- Missing Case.....

इमेज
नवरा बाजाराला जाताच दोन मुलांची आई बेपत्ता केज :- नवरा भाजीपाला विक्री करण्यासाठी बाहेरगावी जाताच दोन मुलांची आई असलेली एक २६ वर्षाची महिला केज शहरातून बेपत्ता होण्याची खळबळजनक घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक कुटुंब हे केज शहरात राहत असून ते कुटुंब भाजीपाला आणि माळव्याची विक्री करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. दि. १६ जुलै रोजी सदर महिलेचा नवरा हा केज तालुक्यातील तर लव्हुरी येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी गेला होता. दुपारी ४:०० वाजता त्यांना लिंबाचीवाडी येथील त्यांच्या मावसभावाने कळविले की, त्याच्या बायकोने फोन करून पैसे मागितले होते.  दरम्यान रात्री घरी आल्या नंतर भाजीपाला विक्रेत्याने त्याच्या बायकोची चौकशी केली असता ती आढळून आली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता.  या प्रकरणी महिलेच्या नवऱ्याच्या तक्रारी वरून ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेची उंची ५ फुट, रंग सावळा, बांधा मध्यम, अंगात मेहंदी रंगाची साडी, केस लांब काळे, गळ्यात बेनटेक्सचे मंगळसुत्र, क...

MB NEWS- police action mode......

इमेज
ध्वनिप्रदूषण करत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंन्सरवर पोलिसांचे बुलडोझर  अंबाजोगाई (प्रतिनिधी):-  अंबाजोगाई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक शहर असल्याने आजूबाजूच्या शहरातील नागरिक देखील अंबाजोगाई मध्ये वास्तव्यास येत आहेत. लोकसंखेप्रमाणेच शहरात वाहनांची संख्या देखील त्याच प्रमाणात वाढत आहे. यामध्ये विविध प्रकारचे दोन चाकी वाहने हे विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यातील काही मोटारसायकलच्या आवाजाणे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अशा कर्णकर्कश आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरीक हैराण झाले होते. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके  यांच्या आदेशानुसार  अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली  वाहतूक पोलिसांच्या पथकाने  गुरुवार दि १७ रोजी एक मोहीम राबवून या मोहिमेत ३० बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर बुलडोझर  फिरवण्यात आले  .       ...

MB NEWS-गरुड पक्षाला केले मुक्त

इमेज
जगात सर्वत्र पक्षीधाम निर्माण करावेत : श्री काशी जगद्गुरू गरुड पक्षाला केले मुक्त लुधियाना (पंजाब): प्राणी, पक्षांना मुक्त जगण्याची संधी दिली पाहिजे. भगवंताने निसर्गामध्ये सर्व जीवजंतूंना जगण्याची संधी दिली आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी प्राणी, पक्षांना मारतात. आहार म्हणून सेवन करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक मनुष्याने प्राणी पक्षांना जगण्यासाठी संधी दिली पाहिजे. सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. पक्षीधामची निर्मिती जगात सर्वत्र झाली पाहिजे असे विचार श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.        लुधियाना येथील पक्षीधाममध्ये सकाळच्या सत्रात आहारदान वितरण समारंभ प्रसंगी महास्वामीजींनी उपदेश केला. पंजाब मधील लुधियाना येथे २० एकर परिसरात पक्षीधाम निर्माण केले आहे. लाखो पक्षी या ठिकाणी मुक्त संचार आणि वास्तव्य करीत आहेत. लुधियाना येथील पक्षी सेवा सोसायटीने हे कार्य उभे केले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षांसाठी एक क्विंटल धान्याचे वाटप हे सदस्य करतात. ब्रेड, पनीर, बिस्कीट यांसह विविध अन्नपदार्थ पक्षांना ...

MB NEWS-निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षाने न्याय द्यावा - भोजराज पालीवाल

इमेज
आगमी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार - परशुराम जाधव  निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षाने न्याय द्यावा - भोजराज पालीवाल अंबाजोगाई, प्रतिनिधी... अंबाजोगाई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परळी केज मतदार संघाची आढावा बैठकीत शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी सांगितले जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका शिवसेना सर्व टाकतीने स्वबळावर निवडणूक लढविणार   निष्ठावंत शिवसैनिकांनी कामाला लागावे. मी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांचा आदेश घेऊन आलो आहे.अंबाजोगाईच्या बैठकीत परळी मतदारसंघाचा आढावा सांगताना शिवसेना तालुका प्रमुख भोजराज पालीवाल यांनी सांगितले निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने न्याय दिला पाहिजे .  अंबाजोगाई येथे परळी व केज मतदार संघातील आढावा बैठक शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख उल्हास गिराम शिवसेना केज तालुकाप्रमुख अशोक जाधव अंबाजोगाई शहर प्रमुख आशोक हेडे अशोक गाढवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परळी शिवसेन...

दोन दिवसांत रस्ता तयार करून देण्याचे नप प्रशासनाचे आश्वासन

इमेज
  गावभागातील रस्ते ऐन पावसाळ्यात खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास-सुशील हरंगुळे दोन दिवसांत रस्ता तयार करून देण्याचे नप प्रशासनाचे आश्वासन  परळी वैजनाथ,प्रतिनिधी... गोपणपाळे गल्ली, ईटके गल्ली, मुजावर वाडा भागातील रस्ते भूमिगत गटार करण्यासाठी मागील एक महिन्यापासून खोदून ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने रस्ता पूर्ववत करावा अन्यथा परळी नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवकनेते  सुशील हरंगुळे यांनी दिला आहे.  यासंदर्भात नप मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.  शहरात चालू असलेली भूमिगत गटार योजनेचे काम ऐन पावसाळ्यात जुन्या गावभागातील गोपणपाळे गल्ली, ईटके गल्ली, मुजावर वाडा येथे चालू केल्याने रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. वृद्ध नागरिक, विद्यार्थी यांना चालण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे.  पुढील आठवड्यात पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वैद्यनाथ भक्तांनाही खोदलेल्या रस्त्याचा त्रास होणार आहे. संत गुरुलिंग स्वामी यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात गावभागात साजरा केला जातो. त्यानिमित्...

पहा यादी: कोणत्या गावचे सरपंचपदाचे आरक्षण कोणते?

इमेज
परळी तालुक्यातील एकूण ९० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे ठरले आरक्षण  आरक्षण सोडतीत कोणत्या गावचे आरक्षण कोणते ?  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी तालुक्यातील सन 2025- 30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडती मधून वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी सरपंच पदाच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे तालुक्यातील कोणत्या गावच्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गाला आरक्षित झाले? याची निश्चिती करण्यात आली. पहा यादी:  कोणत्या गावचे आरक्षण कोणते? सर्वसाधारण प्रवर्ग : पोहनेर,कावळयाचीवाडी, बोधेगाव,वाका, परचुंडी,नागापुर कन्हेरवाडी, ममदापुर,आचार्य टाकळी,रेवली, वानटाकळी, लोणारवाडी,इंदपवाडी डाबी लोणी,वडगाव दा,खोडवा सावरगाव,हाळंब,नागदरा,तपोवन, माळहिवरा, मांडेखेल,वाघबेट,जिरेवाडी, गुट्टेवाडी. सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) ; तेलसमुख, बोरखेड, हिवरा गो.,सिरसाळा गडदेवाडी, तडोळी,दौनापुर,मिरवट,चांदापुर,नंदागौळ, जळगव्हाण, भिलेगाव,वडखेल, आस्वलंबा, भोपला, मरळवाडी,हेळंब,दैठणा घाट पिंपळगाव गाढे,पांगरी नागप...

MB NEWS-दखल कार्याची / अमोल जोशी.....

इमेज
  पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा ‘नगरचे जिगर’ संस्थेकडून गौरव दखल कार्याची / अमोल जोशी.....     समाजात सातत्याने व नि:स्वार्थ भावनेतून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमुळे सामाजिक भान जागवणार्‍या पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टला ‘नगरचे जिगर’ आणि छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. माऊली सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार संग्राम भैया  जगताप, प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक केतन पुरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.रविंद्र शितोळे यांच्या हस्ते ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल व  वरद लकशेट्टी यांनी हा सन्मान स्वीकारला. कार्यक्रमात बोलताना ‘नगरचे जिगर’ संस्थेचे राजेंद्र बुलबुले यांनी सांगितले की, पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टने सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. कोविड काळात गरजू, एकटे, आजारी, वृद्ध, विधवा महिलांना सलग तीस दिवस जेवण पुरविण्याचे केलेले कार्य, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, वह्या, दप्तर यांचे वाटप, तसेच अनाथ व निराधार कुटुंबांना वैद्यकीय मदत ...

सामाजिक वृत्त /अमोल जोशी....

इमेज
  दुसऱ्याला मदतीचा हात देण्याची रोटरीची शिकवण प्रेरणादायी : पीडिजी रो मोहन पालेशा रोटरीचे नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर तर सचिव सुमित जैैस्वाल यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात  सामाजिक वृत्त /अमोल जोशी.... रोटरीचे नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर तर सचिव सुमित जैैस्वाल यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. आज समाजात गुन्हेगारीचे नवनवीन प्रकार उघडकीस येत असताना सामाजिक संवेदनशीलता कमी होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. समाजातील सर्व स्तरांतील घटकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामूहिकपणे कार्य करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत रोटरीने दुसऱ्याला मदतीचा हात देण्याचे जे मूल्य शिकवले आहे. ते समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. रोटरी ही संस्था “सेवा सर्वाेपरि” या तत्त्वावर काम करते. “दुसऱ्याला मदतीचा हात देणे” हेच तिचे मुख्य ध्येय आहे असे प्रतिपादन रोटरीचे पीडिजी मोहन पालेशा यांनी केले. रोटरी क्लब ऑफ बीडचा 40 व्या पदगृहण सोहळा हॉटेल ऑन्विता येथे शनिवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीराम मंदिर ट्रस्टचे मुख्य आर्थिक सल्लागार सी.ए.राज मणियार, सहायक प्रांतपाल प्रवीण देशपांडे आदी उ...
इमेज
आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलिपर्स वाटप शिबिराचा १८२ दिव्यांगांनी घेतला लाभ---- डॉ संतोष मुंडे परळी (प्रतिनिधी):दिनांक १६ जुलै.     आ. धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलिपर्स वाटप शिबिर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे चे उपाध्यक्ष तथा  या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संतोष मुंडे,परळी उपविभागीय कार्यालयाचे चे उपविभागीयअधिकारी अरविंद लाटकर , वैराग्य मूर्ती हभप प्रभाकरनाना झोलकर महाराज, परळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड,व्यापारी महासंघाचे बंडू गरुड आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.या प्रसंगी  इटके काका, हरीश नागरगोजे, बबन मुंडे,पद्माकर शिंदे ,मोहन भताने ,माजी नगरसेवक शेख शमोभाई,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष एजाज शेख, मेहबूब कुरेशी आदी मान्यवर उपस्थिती होते आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलीपर्स वाटप शिबिराचा एकुण १८२ दिव्यांगांन...
इमेज
  मिलिंद माध्यमिक विद्यालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम  उत्साहात   परळी वैजनाथ :येथील नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.  धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज येथे शालेय क्रिडा व सांस्कृतिक सप्ताह  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी उप जिल्हा रूग्णालय,परळी वैजनाथ येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रूग्णालय परळी वै.येथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी श्री.विष्णू मुंडे, श्री.शेख समी,श्री.वैद्य एस.एम.,श्री.रोडे विशाल,श्री.विशाल,श्री.वाघमारे संतोष,श्री.भुषण हरकळ, श्री.शुभम शिसोदे,श्रीमती गित्ते शामल,श्रीमती आम्रपाली घनघाव ईत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांस वैयक्तिक स्वच्छता व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम तसेच डासांमुळे होणारे विविध आजार व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना यांच्या विषयी सखोल असे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ...
इमेज
आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालयात कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन परळी वै.     येथील नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  आ.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत शालेय क्रिडा व सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे  यांच्या मार्गदर्शनात दि.१५ जुलै ते २२ जुलै २०२५ पर्यंत नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत विविध शालेय स्पर्धा,शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्य विषयक मार्गदर्शन, माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व संवर्धन तसेच शालेय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत आज मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, प्राचार्य श्री.शिंदे व्ही.एन.व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक श्री.विश्वास अशोक रोडे, जमील अब्बास शेख व समंदर बाबूमियाँ शेख,श्री.शुद्धोधन विश्वनाथ साळवे यांच्या हस्ते ५ वी ते ८ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटन क...

आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा आणि समाजोपयोगी भेट

इमेज
शिर्षस्थ नेतृत्वद्वयांचा वाढदिवस: समाजासाठी समर्पण – परळीत 'सेवा संकल्प सप्ताहा'चा शानदार शुभारंभ आ.धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा - राजेश्वर आबा चव्हाण धनंजय मुंडेंनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला - संजय दौड सामाजिक उपक्रमातून  जनसेवेत समर्पण  देवू - अजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी। दि.१५    राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प सप्ताहा’चा उत्साहात शुभारंभ परळी येथे झाला. या सामाजिक उपक्रमाचा उद्देश विविध समाजोपयोगी कार्यांच्या माध्यमातून लोकसेवा करणे हा असून, उद्घाटन सोहळ्याला  विविध राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.      या कार्यक्रमात मान्यवरांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर  चव्हाण यांनी सांगितले की, धनंजय  मुंडे हे आपले खंबीर नेतृत्व आहे. सतत जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपलं  नेतृ...

आ.धनंजय मुंडे अभिष्टचिंतन:लेख ✍️ सुधीर सांगळे.......

इमेज
"मैं बीज हुं, आदत है मेरी, बार बार उग जाने की!" क वितेच्या ओळी अनुषंगिक वाटत असल्या तरी त्या तंतोतंत लागू पडणाऱ्या आहेत. त्याचं कारण असं आहे की, धनंजय मुंडे हे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होण्याची ही काही पहिली वेळ नाही! तसं यावेळी जरा अतीच झालं म्हणावं लागेल मात्र अशा प्रकारचे आघात हे या व्यक्तीसाठी काही नवीन नाहीत.  आयुष्यात लढविलेली पहिली जिल्हा परिषद निवडणूक ही त्या सुप्त संघर्षाची सुरुवात होती, सोप्या आणि जवळच्या जागा सोडून त्या काळी म्हणजे २००२ साली बीड जिल्ह्याची गडचिरोली म्हणवल्या  जाणाऱ्या पट्टीवडगाव सर्कल मधून लढावे लागले. कदाचित संघर्ष हा यांच्या पाचवीला पुजलेला असावा, त्यामुळे आजवर जे मिळाले त्यातले सहज हाती लागले असे काहीच नाही.  कधी नियतीने तर कधी व्यक्ती द्वेषाने धनंजय मुंडे यांना अनेक हल्ले सहन करून प्रतिहल्ला न करता संयमाने परतवून लावावे लागले; याची शेकड्याने उदाहरणे देता येतील. पण त्या प्रत्येक आघातातून कुणालाही न दुखावता किंवा फारसे डॅमेज न होऊ देता अत्यंत धीरोदात्त पणे लढून धनंजय मुंडे इथपर्यंत पोचले. त्यात सगळ्यात मोठा वाटा प्रभू वैद्यनाथ नगरी अर्थात...

मोठ्या संख्येने सहभागी व्हा -वैजनाथ सोळंके, बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी

इमेज
उपमुख्यमंत्री अजित पवार व आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस: आजपासून परळीत सेवा संकल्प सप्ताह मोठ्या संख्येने सहभागी व्हा -वैजनाथ सोळंके, बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचा सेवा संकल्प सप्ताह 15 ते 22 जुलै 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रा.काँ. तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे.           १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वा. योगासन स्पर्धा, सकाळी १०:०० वा सेवा संकल्प सप्ताह उदघाटन व धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सकाळी ११ वा. मृदंग स्पर्धा,,सायं ७:०० ते १०:०० वा .भावरत्न गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन १६ जुलै २०२५ रोजीयुवा पिढीसाठी सामाजिक भान जपणारे मनोरंजनात्मक व्यासपीठ- रिल्स स्पर्धा ,१७ जुलै २०२५: महिलांसाठी भजन स्पर्धा १८ जुलै २०२५:शाल...
इमेज
सुरक्षासेवेकरी यांचे प्रामाणिकत्व: सापडलेला मोबाइल शोध घेवुन मालकाला दिला परत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        वैद्यनाथ मंदिर परिसरात सुभाष चौक येथील भाविक संगीता धनंजय काळूमाळी या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या असताना त्या आपला मोबाइल विसरून गेल्या. हा मोबाइल सुरक्षा रक्षक प्रियंका सरवदे यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत मोबाइल चौकीत जमा केला. त्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके यांनी संबंधित भाविकांचा शोध घेऊन योग्य तपासणीअंती तो मोबाईल परत केला. मंदिरच्या सुरक्षा सेवेकरी प्रियंका सरवदे यांच्या या प्रामाणिक व तत्पर सेवेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिर परिसरातील सुरक्षारक्षकांची कार्यक्षमता व निष्ठा यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित वाटत असल्याचे अनेकांनी नमूद केले.

MB NEWS- पहा: कोणती गावे कोणत्या जि.प.गटात व पं.स. गणात?

इमेज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक : परळी तालुक्यात असे असणार जि.प.गट व पं.स.गण परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सध्या सुरू असून बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप प्रशासनाने तयार केले आहे. या अनुषंगाने परळी तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणांचे प्रारूपही तयार झाले आहे.          जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये व पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे याची माहिती प्रशासनाने अधिसूचनेद्वारे दिली आहे. परळी तालुक्यात आपापली गावे कोणत्या जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाली आहेत हे यातून आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद गटांची प्रारूप रचना करताना काही जिप गटांची नावे बदललेली आहेत .बाकी पुर्वीएवढेच म्हणजेच सहा जि प गटांची रचना परळी वैजनाथ तालुक्यात असणार आहे. पहा: कोणती गावे कोणत्या जि.प.गटात व पं.स. गणात? 1. सिरसाळा जि.प.गट • पोहनेर गण : डिग्रस,बोरखेड, तेलसमुख, रामेवाडी/कासारवाड...
इमेज
आ.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद सामाजिक प्रतिष्ठान विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करणार- संतोष मुंडे परळी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.       या कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळेमध्ये हा वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.           वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उपयुक्त असे साहित्य वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ----------------------------------------------- Click: ♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट ...

१५ जुलै रोजी भेटीसाठी उपलब्ध नसणार - मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती

इमेज
यावर्षी वाढदिवस सोहळा साजरा करणार नाही - धनंजय मुंडे सहकारी - कार्यकर्त्यांनी बॅनर, जाहिराती ऐवजी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा येत्या 15 जुलै रोजी वाढदिवस असून, यावर्षी आपण वाढदिवस साजरा करणार नसून सहकारी व कार्यकर्त्यांनी  वाढदिवसाचे सोहळे आयोजित करू नयेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.  धनंजय मुंडे यांचा वाढदिवस हा दरवर्षी चाहते व कार्यकर्त्यांसाठी मोठी पर्वणीच असतो, मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, दुसरीकडे नुकतेच जवळचे सहकारी स्व. आर. टी. देशमुख यांचे झालेले निधन आदी बाबींचा विचार करून धनंजय मुंडे यांनी वाढदिवस साजरा करणार नसून, सहकारी - कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी, जाहिराती आदिंवरील खर्च टाळून त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले आहे.  धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी बेल्स पाल्सी या आजाराचे निदान झाले होते. त्यानंतर विविध उपचार घेऊन मुंडेंनी इगतपुरी येथील ध्यान केंद्रात विपश्यना द...

गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते - सुश्री पद्महस्ता भारतीजी

इमेज
  परळीत गुरु महिमेचा गजर... ! दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या गुरूपोर्णिमा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते - सुश्री पद्महस्ता भारतीजी सदगुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -सुश्री अन्नपूर्णा भारतीजी परळी वैजनाथ/प्रतिनिधी दिव्य ज्योति जागृती संस्थान लातूर शाखेच्या वतीने प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे गुरूपोर्णिमा महोत्सव अत्यंत भव्य, दिव्य व भक्तिमय वातावरणात मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहुन गुरूचरित्राचा महिमा अनुभवला.                 कार्यक्रमाची सुरूवात परळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते पवित्र दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री गुरूंची आरती, भजने व भक्तीमय वातावरणात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. यानंतर प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या दिल्ली येथील सुप्रसिद्ध भागवत भास्कर कथा व्यास सुश्री पद्महस्ता भारतीजी यांनी आपल्या सुमधूर वाणीतील प्रवचनातून गुरूंचे जीवन...