पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची जलदगती कामगिरी !
संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची जलदगती कामगिरी
एक महिन्याच्या आत तपास व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून १लाख ६० हजारांचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कामकाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करत अनेक उपक्रम राबवले. या अनुषंगानेच जलद गती तपासाबाबत ही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले. त्यामुळे आता गुन्ह्याचा तपास दिरंगाईने व विलंबाने न होता जलद होताना दिसत आहे. अशाच प्रकारची कामगिरी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व त्यांच्या टीमने केली असुन परळी बस स्थानकातून जुन महिन्यात एका नागरिकाच्या गळ्यातील चैन चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा जलद गती तपास करून, याबाबतचा मुद्देमाल जप्त करून, त्याची सर्व न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण केली आणि चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकास सहीसलामत परत देण्यात आला. ही जलदगती कामगिरी एक महिन्याच्या आत करण्यात आली. या कामगिरीबद्दल संभाजीनगर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी येथील गुन्हा रजि. नंबर 115/25 बी एन एस कलम 303(2) मधील जप्त मुद्देमाल 34 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे किंमत 1,60,600 रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी अशोक नारायण शेळके रा.खरबडा ता. पूर्णा जि.परभणी यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व त्यांची तपासी टीम उपस्थित होते.
काय घडली होती घटना: गुन्हा काय होता?
याबाबतची माहिती अशी की, दिनांक- 08/06/2025 रोजी सकाळी आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास परभणी- लातुर बसमध्ये चढत असताना किंवा त्यानंतर फिर्यादी अशोक नारायण शेळके यांच्या गळयातील 34 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे किंमत 1,60,600 लंपास करण्यात आली होती.याबाबत त्यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.या गुन्ह्याचा संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगती तपास करण्यात आला.मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच फिर्यादीस मुद्देमाल परत देण्याबाबतचा न्यायालयीन आदेश इथपर्यंतची सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करुन मुद्देमाल फिर्यादीस सुपूर्द करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा