अन्न ग्रहण न करता रस व पाण्यावर अनुष्ठान
श्री १०८ गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे श्रावण मास मौन व्रतअनुष्ठान सुरू
परळी :लातूर जिल्ह्यातील खरोळा (ता. शिरूर अनंतपाळ) येथील श्री शंकरलिंग शिवाचार्य मठ संस्थानाचे प्रमुख श्री १०८ गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे १६वे श्रावण मास मौन अनुष्ठान परळी येथील बेलवाडी श्री गुरुलिंग स्वामी मंदिरात २६ जुलैपासून सुरू झाले आहे. हे अनुष्ठान येत्या १६ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
या अनुष्ठान काळात शिवाचार्य महाराज कोणतेही अन्न न घेता, केवळ लिंबाच्या पाल्याचा रस व पाणी ग्रहण करीत आहेत. शुक्रवारी या अनुष्ठानाचा सातवा दिवस झाला.
दररोज श्री गुरुलिंग स्वामी मंदिरात आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. आरतीवेळी अनेक भाविक शिवाचार्य महाराजांचे दर्शन घेत आहेत.
या अनुष्ठान प्रसंगी गुरुलिंग स्वामी मठ ट्रस्ट, वक्रेश्वर देवस्थान विश्वस्त, वीरशैव लिंगायत समाज, तसेच विविध भजनी महिला मंडळे व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
: श्री शंकर लिंग शिवाचार्य महाराजांच्या अनुष्ठानास शनिवारी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक ढोणे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी अनुष्ठान समितीचे अध्यक्ष दयानंद चौधरी, महादेव इटके,संजय खाकरे ॲड .मनोज संकाये, गिरीश संकाये, रमाकांत बुरांडे, सुगरे आप्पा, नरेश पिंपळे, गोपनपाळे सर यांच्यासह इतर उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा