पोस्ट्स

इमेज
  जि.प. शाळेची वारी दिंडी : घोड्यांवर बसले विठ्ठल रखुमाई! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे आयोजित वारी दिंडी सोहळ्यात घोड्यावर बसलेले विठ्ठल रखुमाई हे सर्वांचे आकर्षण ठरले होते.  अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठुराया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्या म्हणजे एक आदर्श! या दिंडी सोहळ्याचा छोट्या स्वरूपातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी तालुका परळी वैजनाथ येथील विद्यार्थ्यांची आषाढी वारी दिंडी आयोजित करण्यात आलेली होती.  विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आलेल्या दोन विद्यार्थ्यांना घोड्यांवर बसून दिंडीच्या अग्रभागी ठेवण्यात आलेले होते. अनेक विद्यार्थिनी रखुमाईच्या वेशभूषेत डोईवर तुळशीवृंदावन घेऊन होत्या. विठुरायाच्या अभंगाच्या तालावर टिपऱ्या खेळत तसेच टाळ वाजवत विद्यार्थ्यांची पावले थिरकत होती. पूर्ण गावाला या दिंडीची फेरी घेण्यात आली. शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी यावेळी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.  गावकऱ्यांनी या दिंडीचे कौतुक केले. दिंडी...

आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक होणार बंद!

इमेज
परळी शहरातील ओव्हर ब्रीज वरील वाहतूक रस्ता ७ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान राहणार बंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       शहरातील ईटके कॉर्नर कडून येणारा ओव्हर ब्रीज वरील मुख्य वाहतूक रस्ता दि. ७ जुलै २०२५ पासून २७ जुलै २०२५ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.        प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.  नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला होता. आता आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक  बंद होणार आहे. उड्डाणपूल दुरुस्तीचे ...
इमेज
आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण परळी वैजनाथ(प्रतिनिधी) : आखिल भारतीय ग्राहक पंचायत परळीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनदृष्टीचा नव्या पिढीसाठी आदर्श म्हणून जागर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सामाजिक जीवनात कसा उपयोग करता येतो, यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या अध्यक्षा चित्रा देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ पारगावकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, परळी शाखेला विवेकानंदांचा फोटो भेट म्हणून दिला. यावेळी ग्राहक पंचायत च्या संघटन मंत्री विजया दहीवाळ, सामाजिक कार्यकर्त्या सौ. विदया  खिस्ते, उपाध्यक्ष सौ सुनिता बोडखे यांची उपस्थिती होती.तसेच डाॅ. किरण पारगावकर यांचा प्रवेश पण आजच झाला. स्वामी विवेकानंदांनी दिलेली प्रेरणा म्हणजे देशासाठी कार्यरत राहण्याची शिकवण आहे. त्यांच्या विचारांनी युवकांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ग्राहक पंचायत ही संघटने...
इमेज
थोरले पाटागंणावर चातुर्मास सेवेची सुरुवात   अमोल जोशी/ पाटोदा               श्री संत जनार्दन यांच्या संस्थान थोरले पाटागंण येथे ४२५ वर्ष पासून चालत आलेल्या  चातुर्मास  सेवेचा आज प्रारंभ झाला.   सकाळी श्री अभिषेक वैदिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला नंतर ब्रह्मश्री कृष्णा महाराज  रामदासी यांच्या मधुर वाणीतून श्रीमदभागवत ग्रंथ निरूपणास सुरुवात झाली, शेवटी खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला.    श्री विनायक महाराज व प्रसाद  शिवनीकर यांनी  भागवत संहिते चे पारायण सुरु केले व भिक्षा मागून दिवसभरातील सत्राची सुरुवात केली.   वेदमूर्ती श्रीकांत विडेकर, वेदमूर्ती श्रीपाद विडेकर व वेदमूर्ती प्रल्हाद जवळेकर यांच्या उपस्थिती अभिषेक झाला,अनिल कुलकर्णी मंगरूळकर पुरानिकसह अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.   भागवत श्रावणलाभ मिळवण्यासाठी सकाळी नऊ ते दहा या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन थोरले पाटागंण संस्थान, बीड च्या वतीने करण्यात येत आहे.
इमेज
भगर खाण्यापूर्वी काळजी घ्या:जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन  बीड, दिनांक 05 (जिमाका) : श्रावण मास, एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र, आषाढी एकादशी आदी उपवासाच्या काळात ‘भगर'चे (सामा, वरई) सेवन मोठ्या प्रमाणावर होते. भगर पचायला हलकी, उपयुक्त आहे. परंतु अलीकडील काळात काही ठिकाणी भगर खाल्ल्यानंतर विषबाधेचे प्रकार घडलेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी भगरचे सेवन करताना योग्य काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.  परवाना प्राप्त व विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच भगर खरेदी करावी. ती स्वच्छ, कोरडी, गंधविरहित आणि बुरशीमुक्त असावी. खराब, काळसर किंवा बुरशी लागलेली विकत घेऊ नये. बाजारात कमी दरात मिळणाऱ्या पॉलिश केलेल्या,  प्लास्टिकसदृश चमकदार भगरपासून दूर राहावे. एफएसएसएआय (FSSAI) प्रमाणपत्र असलेलीच भगर खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. भगर शिजवण्यापूर्वी किमान 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवावी. शक्य असल्यास 30 मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवावी. स्वयंपाक करताना स्वच्छ, उकळलेले पाणी, भांडी वापर...

रस्त्यावर कोंबड्यांचा बळी देणे आले अंगलट !

इमेज
देवीच्या मिरवणुकीत अघोरी  प्रकार; परळी शहरात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल परळी (प्रतिनिधी) |         परळी शहरात देवीच्या मिरवणुकीदरम्यान  आघोरी विधी करीत कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष व आयोजक  दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी वै.) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) चे कलम 325 आणि महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2013 चे कलम 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी , परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास , राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला , तसेच हळद, कुंकू, लिंबू व नागवेलीची पाने टाकून अघोरी विधी केला , असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.हा प्रकार समाजात भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असुन, त...

काँग्रेसची परळीत पून्हा एकदा 'बहादूर शहराध्यक्षालाच' पसंती !

इमेज
  काँग्रेस परळी शहराध्यक्षपदी  हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड  परळी,  प्रतिनिधी..  काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्ष पदाची  निवड करण्यात आली असुन  परळी शहराध्यक्षपदी हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         माजीमंत्री अशोक पाटील व बीड जिल्हा कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आज (शुक्रवारी) हानिफ करीम सय्यद उर्फ बहादुरभाई यांना परळी शहर अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्रदान केले आहे. काँग्रेस शहरात अधिक बळकटीने काम करेल अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.यावेळी जेष्ठ नेते प्रकाशराव देशमुख,अँड. शशीशेखर चौधरी, एहेतेशाम खतीब, सुभाष राव देशमुख, दीपक सिरसाट, बदर भाई, रसुल खान, व फरकुद आली बेग अदी नेते पदाधिकारी उपस्थित होते.