जि.प. शाळेची वारी दिंडी : घोड्यांवर बसले विठ्ठल रखुमाई!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे आयोजित वारी दिंडी सोहळ्यात घोड्यावर बसलेले विठ्ठल रखुमाई हे सर्वांचे आकर्षण ठरले होते. 

अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठुराया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्या म्हणजे एक आदर्श! या दिंडी सोहळ्याचा छोट्या स्वरूपातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी तालुका परळी वैजनाथ येथील विद्यार्थ्यांची आषाढी वारी दिंडी आयोजित करण्यात आलेली होती. 

विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आलेल्या दोन विद्यार्थ्यांना घोड्यांवर बसून दिंडीच्या अग्रभागी ठेवण्यात आलेले होते. अनेक विद्यार्थिनी रखुमाईच्या वेशभूषेत डोईवर तुळशीवृंदावन घेऊन होत्या.

विठुरायाच्या अभंगाच्या तालावर टिपऱ्या खेळत तसेच टाळ वाजवत विद्यार्थ्यांची पावले थिरकत होती. पूर्ण गावाला या दिंडीची फेरी घेण्यात आली. शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी यावेळी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. 

गावकऱ्यांनी या दिंडीचे कौतुक केले. दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे, श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश स्वामी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार