आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक होणार बंद!

परळी शहरातील ओव्हर ब्रीज वरील वाहतूक रस्ता ७ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान राहणार बंद



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

      शहरातील ईटके कॉर्नर कडून येणारा ओव्हर ब्रीज वरील मुख्य वाहतूक रस्ता दि. ७ जुलै २०२५ पासून २७ जुलै २०२५ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

       प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.  नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला होता. आता आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक  बंद होणार आहे.


उड्डाणपूल दुरुस्तीचे महत्त्व

हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वापरात असून, काही ठिकाणी तांत्रिक दोष, गंज व थरांचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पुलाचा कालावधी वाढवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. कामांनंतर पुलाची स्थिती अधिक सुरक्षित व स्थिर होणार असून, वाहनचालकांसाठीही तो निर्धोक होणार आहे.


टिप्पण्या

  1. दुचाकी साठी कमीत कमी दुसरा पर्यायी रस्ता करायला पाहिजे होता..

    उत्तर द्याहटवा
  2. पर्यायी रस्ता वापरल्याने उड्डाण पुलाच्या या टोकापासून त्या टोकाकडे (१ किमी पेक्षा कमी अंतर) जाण्यासाठी १० किमी लागतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार