आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) : आखिल भारतीय ग्राहक पंचायत परळीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनदृष्टीचा नव्या पिढीसाठी आदर्श म्हणून जागर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सामाजिक जीवनात कसा उपयोग करता येतो, यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या अध्यक्षा चित्रा देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ पारगावकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, परळी शाखेला विवेकानंदांचा फोटो भेट म्हणून दिला. यावेळी ग्राहक पंचायत च्या संघटन मंत्री विजया दहीवाळ, सामाजिक कार्यकर्त्या सौ. विदया खिस्ते, उपाध्यक्ष सौ सुनिता बोडखे यांची उपस्थिती होती.तसेच डाॅ. किरण पारगावकर यांचा प्रवेश पण आजच झाला.
स्वामी विवेकानंदांनी दिलेली प्रेरणा म्हणजे देशासाठी कार्यरत राहण्याची शिकवण आहे. त्यांच्या विचारांनी युवकांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले. ग्राहक पंचायत ही संघटनेची भूमिका केवळ ग्राहकहितासाठी मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनेही महत्त्वाची आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले.
या कार्यक्रमात ग्राहक पंचायत परळीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विवेकानंदांच्या विचारांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे संयोजन परळी शाखेचे प्रमुख यांनी केले. कार्यक्रमात अनेक युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा