थोरले पाटागंणावर चातुर्मास सेवेची सुरुवात
अमोल जोशी/ पाटोदा
श्री संत जनार्दन यांच्या संस्थान थोरले पाटागंण येथे ४२५ वर्ष पासून चालत आलेल्या चातुर्मास सेवेचा आज प्रारंभ झाला.
सकाळी श्री अभिषेक वैदिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला नंतर ब्रह्मश्री कृष्णा महाराज रामदासी यांच्या मधुर वाणीतून श्रीमदभागवत ग्रंथ निरूपणास सुरुवात झाली, शेवटी खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला.
श्री विनायक महाराज व प्रसाद शिवनीकर यांनी भागवत संहिते चे पारायण सुरु केले व भिक्षा मागून दिवसभरातील सत्राची सुरुवात केली.
वेदमूर्ती श्रीकांत विडेकर, वेदमूर्ती श्रीपाद विडेकर व वेदमूर्ती प्रल्हाद जवळेकर यांच्या उपस्थिती अभिषेक झाला,अनिल कुलकर्णी मंगरूळकर पुरानिकसह अनेक भक्त या वेळी उपस्थित होते. भागवत श्रावणलाभ मिळवण्यासाठी सकाळी नऊ ते दहा या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन थोरले पाटागंण संस्थान, बीड च्या वतीने करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा