काँग्रेसची परळीत पून्हा एकदा 'बहादूर शहराध्यक्षालाच' पसंती !
काँग्रेस परळी शहराध्यक्षपदी हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड
परळी, प्रतिनिधी.. काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असुन परळी शहराध्यक्षपदी हानिफ करीम सय्यद यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
माजीमंत्री अशोक पाटील व बीड जिल्हा कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आज (शुक्रवारी) हानिफ करीम सय्यद उर्फ बहादुरभाई यांना परळी शहर अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्रदान केले आहे. काँग्रेस शहरात अधिक बळकटीने काम करेल अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.यावेळी जेष्ठ नेते प्रकाशराव देशमुख,अँड. शशीशेखर चौधरी, एहेतेशाम खतीब, सुभाष राव देशमुख, दीपक सिरसाट, बदर भाई, रसुल खान, व फरकुद आली बेग अदी नेते पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा