इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

Video Viral: परळीत युवकाला बेदम मारहाण; आठ ते दहा जण मारतायत अन् 'तो' जीवाच्या अकांताने विव्हळतोय!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     परळीत एका टोळक्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ८ ते १० जणांनी मिळून एका तरुणाचं अपहरण केलं आणि जंगलामध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
             टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ८ ते १० युवक लाकडी काठी,  बेल्टने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. हा तरुण वेदनांनी विव्हळत आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथा बुक्याने मारहाण करत आहेत. यात एक तरुण हा मारहाण करताना चित्रीकरण देखील करत असल्याचं दिसून येत आहे. मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील शिवराज दिवटे असल्याचं समोर आलं आहे.या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले असुन या प्रकरणी अद्याप पोलीसात नोंद झालेली नाही.या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी युवकाला परळीतील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार का घडला? यामागचे कारण स्पष्ट झाले नाही.पोलीस प्रक्रियेनंतरच हे कारण समोर येणार आहे.
--------------- Video----------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....