
जि.प. शाळा कासारवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी! लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी साजरी झाली. गावचे सरपंच श्री बंडू आत्माराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंदांनी साठे आणि टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल शाळेतील शिक्षक श्री सरोज कुमार तरुडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अण्णांचे शालेय शिक्षण, त्याचबरोबर त्यांचा साहित्याचा प्रवास, त्यांनी जीवनात सोसलेले दुःख, केलेली विविध कामे अशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देत शोषित समाजाला आपल्या साहित्यातून मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केल्याचं श्री तरुडे यांनी सांगितले व 'स्मशानातील सोनं' ही कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी शाळेतील शिक्...