संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक वारशाचा गौरव..
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती राज्यभर साजरी होणार
मुंबई, ३० जुलै २०२५: महाराष्ट्र शासनाने संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२५, गोकुळ अष्टमी च्या दिवशी राज्यभरात उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नगर विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा यांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती पालखीतून मिरवून उत्सव साजरा करायचा आहे.
हा निर्णय मा. मुख्यमंत्री महोदयांच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या निर्देशांनुसार घेण्यात आला असून, प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक २०२५०७३०१९०८३९७८२५ अंतर्गत उपलब्ध आहे आणि ते डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या आदेशानुसार, नगर विकास विभागाचे अवर सचिव अनिलकुमार रा. उगले यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा