शेतकऱ्यांसाठी खुशखबर: पंतप्रधान किसान सन्मान निधी
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला वितरित होणार
नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या हप्तावाटप कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (KVKs), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), तसेच विविध कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू व अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही लघु व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. २० वा हप्ता वेळेत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा