इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

Accident.....

बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू ;संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

        तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.


मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे आहे. त्यांनी रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परतत असताना शिवशाही बसने ( एमएच ०४ एफएल ०९८८ ) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा काही अंतर फरफटत गेल्याने श्रीनिवास  राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदतीचा हात दिला. दरम्यान, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण टोले, जमादार दत्ता उबाळे,  रमेश तोटेवाड, सुनील अन्नमवार आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!