पोस्ट्स

ऑगस्ट ३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नशेच्या आहारी युवक: पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर...

इमेज
नातवाकडून सत्तूरने आजीवर जीवघेणा हल्ला; मायबापांनाही केलं गंभीर जखमी नशेच्या आहारी गेलेल्या  वीस वर्षीय युवकाचे कृत्य परळी वैजनाथ ,प्रतिनिधी : परळी शहरातील तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात आज (दि.९) सायंकाळी ६.३०वा. सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतले आहे.             ही हृदयद्रावक घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरातील कुरेशी कुटुंबात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुबेदा इब्राहिम कुरेशी या ८० वर्षीय वृद्धा घरी  होत्या. त्यांचा नातू आरबाज रमजान कुरेशी(वय २० वर्षे) हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला. या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली आहे.त्याची आई समिना रमजान कुरेशी व वडील रमजान  इब्राहिम कुरेशी तातडीने  धाव...

Public appeal:Prakash Joshi...

इमेज
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा ऐतिहासिक विजय निश्चित- प्रकाश जोशी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा विजय निश्चित असुन मतदारांनी भुलथापांना बळी न पडता लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन पॅनलचे उमेदवार प्रकाश जोशी यांनी केले आहे.      राज्यातील अतिशय विश्वासहर्ता प्राप्त  असलेल्या वैद्यनाथ बँक निवडणूकित विरोधकांनी विरोधाला विरोध म्हणून केविलवाणा प्रयत्न सुरू केले आहेत. पण जनतेला सर्व बाबी ओळखून असल्याने, लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल च्या सर्वच उमेदवारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि याअगोदर चार संचालक बिनविरोध निवडून आले असल्याने, विरोधकांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होऊन सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. भविष्यात विरोधाला विरोध ही प्रवृती नामशेष करण्यासाठी, सर्वंच सभासदांनी भ...

Public appeal:Nilkanth Chate

इमेज
वैद्यनाथ बॅंकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी  लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच विजयी करा- निळकंठ चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ बँकेमध्ये ठेवी वाढवून शेड्युल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले आहे.          केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विस्तार आणि नामांकित असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी उद्या रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, छोट्या - मोठ्या गरजू कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणारी व ठेवीदारांचा विश्वास असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच निवडून देऊन सुरक्षित हातात बँक देण्याचे आवाहन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून विश्वास कमावला असल्याचे म्हटल...

Vote Appeal:Vijaykumar Wakekar...

इमेज
वैद्यनाथ बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार - विजयकुमार वाकेकर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक ही ग्राहकांच्या सेटिंग सेवेसाठी सदैव तत्पर असलेली आर्थिक संस्था असून जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी दिली असुन या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी केले आहे.      वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी उद्या रविवारी मतदान होणार असुन आज प्रचाराचा समारोप झाला. यावेळी विजयकुमार वाकेकर म्हणाले की, वैद्यनाथ बँक ही केवळ मराठवाडा असे नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला आले असून राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आगामी काळातही बँक नवनवे यशोशिखर गा...

कोणा सभासदाचे कुठे मतदान?

इमेज
वैद्यनाथ बँक संचालक मंडळासाठी वैद्यनाथ महाविद्यालय आणि महिला महाविद्यालयात मतदान सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 11794 पर्यंत महिला महाविद्यालयात मतदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत उद्या रविवारी मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मतदान होणार आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी विविध कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार असून सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.      वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 यांचे मतदान वैद्यनाथ महाविद्यालयात 19 मतदान केंद्रावर तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात 10 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मतदारांनी काळजीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मतदाराची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांची यादी     मतदाराची ओळख...

राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम

इमेज
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांसमवेत साजरी केली राखी पौर्णिमा  राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.०८) येथील पोलीस ठाण्यात राखी पोर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे सह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या.        शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवत पोलीस बांधवा समवेत राखी पौर्णिमा साजरी केली. पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही. नेमके यावेळी बंदोबस्तात वाढ केलेली असते. यामुळे सण, उत्सव साजरे करता येत नाहीत म्हणून येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोलीस बांधवांना परिवारातील सदस्यांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फुलांची उधळण करत व...

Rakshabandhan : राखी बांधण्यासाठी यंदा कोणता कालावधी योग्य?

इमेज
यंदा दिवसभरात कधीही बांधा राखी!         श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. 'रक्षाबंधन' ( Raksha Bandhan ) म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या शुभ दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बाधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. श्रावण पौर्णिमेला आपण 'रक्षाबंधन' आणि 'नारळी पौर्णिमा' साजरी करतो. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला 'रक्षाबंधन' सण यंदा 09 ऑगस्टला साजरा होणार आहे.         पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 पर्यंत राहील.           पंचांगानुसार, 09 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधण...

Public appeal:Blood donation camp

इमेज
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त ११ रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन   Public appeal:मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......       माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान, उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  (दि.११) रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.         माजीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी  मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव  धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १...

Vaidyanath bank election: Public appeal...

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या मजबूत व प्रगतीशील वाटचालीसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच विजयी करा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी Vaidyanath bank election: Public appeal... परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळीतून सुरु झालेल्या व आज राज्यभरात विस्तार असणाऱ्या आणि सभासदांचे हित कायम जपणाऱ्या वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ हे जबाबदार, विकासाची क्षमता, मजबूत आर्थिक स्थिती आणि प्रगतीशील वाटचाल करणारे असावे यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल वैद्यनाथ बँक संचालक मंडळाची निवडणूक लढवत आहे. यापूर्वीच या पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. सहकारी बँकांमधील एक अग्रगण्य व परळीच्या अर्थकारणातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र ठरलेल्या वैद्यनाथ बँकेशी परळीकरांचा एक स्नेहबंध आहे. परळीतील सर्वसामा...

'मुलगी शिकली-प्रगती झाली' : समाजाला अभिमान!

इमेज
स्वकुळ साळी समाजातून पहिली कन्या झाली ‘सीए’ :  समाजाने केला गायत्री शिवगणचा गौरव  परळी वैजनाथ, ः- परळीत आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वकुळ साळी समाजाच्या वतीने साळी समाजातून पहिली तरूणी कु.गायत्री अनिता गोविंद शिवगण ‘सीए’ (चार्टर्ड अकाऊटंट) झाल्याबद्दल तिचा साळी समाजाच्या वतीने सौ.स्वाती विलासराव ताटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी गायत्रीला प्रोत्साहन म्हणून नितीन भंडारे यांच्या वतीने लॅपटॉप बॅग भेट देण्यात आली. यावेळी गायत्रीचे वडील गोविंद शिवगण, समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस, विलासराव ताटे, नितीन भंडारे, धनंजय आरबुने आदी समाज बांधव, महिला उपस्थित होत्या. यावेळी गायत्रीने मनोगत व्यक्त करताना म्हटले की, माझ्या या यशात माझे गुरूजन, मार्गदर्शक, वडील, काका यांचे मनापासून आभार मानले तसेच समाजातील मुला-मुलींना ‘सीए’ होण्याची इच्छा असेल अशा मुलां-मुलींना व इच्छुकांना मी योग्य ते मार्गदर्शन करेल अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त करून तिचा सत्कार केल्याबद्दल साळी समाज बांधवांचे आभार म...

दुर्देवी घटना.....!

इमेज
  खतपेरणीसाठी शेतात असणाऱ्या एकाचा वीज पडून मृत्यू परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)         शहरातील वैद्यनाथ मंदिर परीसरातील रहिवाशी कोंडिबा जयवंत कवले (वय ४८) यांचा नागापूर येथील शेतात विज पडून मृत्यू झाला तर पत्नी किरण जखमी झाल्या आहेत.      शहरातील वैद्यनाथ मंदिर परीसरातील रहिवाशी कोंडिबा जयवंत कवले यांचे तालुक्यातील नागापूर येथे शेती आहे. शेतात पत्नी किरण सह खत पेरणीसाठी गेले असता सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक विजेचा गडगडाट व पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोंडिबा व किरण शेतातील लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले असता विज पडली यामध्ये कोंडिबा कवले यांचा जाग्यावर मृत्यू झाला व पत्नी किरण जखमी झाल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ बैलगाडी मध्ये गावात आणून तिथून दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.०८) दुपारी बारा वाजता विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख वृक्षलागवड मोहीम.

इमेज
  अंबाजोगाई व परळीत वनविभागाकडून २ लाख मिश्र उपवनाची लागवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            बीड जिल्ह्यात आज ७ ऑगस्ट रोजी हरित बीड अभियान राबवण्यात आले. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे वृक्षारोपण करुन शुभारंभ करण्यात आला. तर आजच्याच दिवशी जिल्हाभरात तब्बल ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. या अनुषंगाने अंबाजोगाई व परळी येथे वन विभागाकडून जोरदार प्रतिसाद देत दोन लाख मिश्र उपवनांची लागवड करण्यात आली.   परळी वैजनाथ वन विभागाअंतर्गत अंबाजोगाई व  परळी या ठिकाणी वन विभागाच्या वतीने 'हरित बीड' अभियानात हिरिरीने सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये मिश्र रोपवनांची लागवड करण्यात आलख.बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्षाची लागवड करण्याच्या पहिल्या टप्प्यात परळी वनविभागाने अंबाजोगाई व परळी या ठिकाणी दोन लाख मिश्र रोपवन लागवड केली. वसंतनगर येथील वन विभागाच्या जंगलात वृक्ष लागवड अभियानाचा मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी परळीचे तह...

आराखडा नियोजन विभागाकडे होणार वर्ग

इमेज
श्री.वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा! आराखडा नियोजन विभागाकडे  होणार वर्ग धनंजय मुंडेंनी मांडली अभ्यासपूर्ण माहिती; दादांचे मानले आभार बीड (दि. ०७) - पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिर व परिसराच्या विकास कामांचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेण्यात आला. यावेळी विकास आराखड्याच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या व नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.  मंदिर व परिसराचा विकास करताना पौराणिक महत्त्व अबाधित राखून अभूतपूर्व विकास कार्य करण्यात यावे, अशा सूचना अजित दादांनी सर्व संबंधितांना दिल्या.  वाहनतळ, मेरुगिरी पर्वत परिसरातील कामे, दर्शन मंडप, नंदी, शिव प्रतिमा, उद्यान, प्रवेशव्दारे यांसह लागणाऱ्या अधिकच्या जमीन अधिग्रहण करण्याची जबाबदारी यावेळी धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत आराखडा कामातील बारकावे सर्वांच्या लक्षात आणून दिले. वाढीव जागेसह विविध कामांच्या पूर्ततेसाठी...

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली.....!

इमेज
  पत्रकार संतोष जुजगर यांना आजीशोक :१०३ वर्षांच्या इंदिराबाई हुगे यांचे वृद्धापकाळाने निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –    येथील  वीरशैव लिंगायत कोष्टी समाजाच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ महिला    हैदराबाद बँकेशेजारी, मोंढा हालगे गल्ली येथील रहिवासी श्रीमती इंदिराबाई शंकरआप्पा हुगे (वय १०३) यांचे वृद्धापकाळाने (आज दि.६ ) रात्रीच्या सुमारास निधन झाले. पत्रकार संतोष जुजगर यांच्या त्या आजी होत.         श्रीमती इंदिराबाई हुगे या अत्यंत कष्टाळू, संयमी व धार्मिक वृत्तीच्या महिला होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी कुटुंबासाठी समर्पित केले. एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्या परिचित होत्या. संतोष व वामन या दोन नातवांवर त्यांचा विशेष स्नेह होता. हुगे व जुजगर परिवासाठी एक आधारवड असे आयुष्य त्यांनी घालवले. धार्मिक वृत्तीच्या इंदिराबाई यांची पवित्र श्रावणात वयाच्या १०३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे स्नेही,आप्तेष्ट व परिचितांमधून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.           त्यांच्या पश्चात एक मुलगी सौ. गंगाब...
इमेज
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या फेरीला सभासदांचा भरभरून प्रतिसाद बॅंकेच्या प्रगतीसाठी आमचे मत तुम्हालाच - मतदारांनी दिला शब्द परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         वैद्यनाथ बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, त्यामुळे आमचे मत केवळ तुम्हालाच आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मत देणार आहोत अशी ग्वाही आज सभासद मतदारांनी दिली. वैद्यनाथ बँक निवडणूकीसाठी राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या फेरीला आज माणिक नगर आणि विविध ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.       वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँकेसाठी रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे चार उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. यात माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, सौ. माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर या...

परळीत ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई !

इमेज
तांबे,पितळ, अॅल्युमिनिअम/जर्मन अशा धातूंची चोरी : टेम्पोभर माल पकडला   परळी ते बीड रोडवर सुमारे 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ,प्रतिनिधी....       परळी ते बीड रोडवरील पांगरी कॅम्प चौक परिसरात सुमारे 16 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल परळी वैजनाथ ग्रामीण पोलिसांनी जप्त करत एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी शब्बीर अकबर काकर (रा. काकर मोहल्ला, परळी वै.) याच्याविरुद्ध कलम 303(2), 317(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       ही घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.30 ते 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र जप्त करण्यात आलेले धातू व त्यांचे परिक्षण,मोजदाद आदी सविस्तर प्रक्रिया पुर्ण  केल्यानंतर फिर्यादी विशाल विजयकुमार वडमारे (वय 35, पोलीस कर्मचारी, परळी ग्रामीण पो.स्टे) यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत अॅल्युमिनिअम/जर्मन इलेक्ट्रीक तार,तांब्याची तार,पितळ प्लेट्स आणि आयशर टेम्पो  असा 16,54,600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.   गुन्हा कसा उघडकीस आला?  ...

देशातील सर्वात स्वच्छ शहराचे माॅडेल अभ्यासले !

इमेज
ना. पंकजा मुंडेंचा मध्यप्रदेशात पर्यावरण विषयक अभ्यास दौरा ; 'स्वच्छ महाराष्ट्र' मोहिमेला मिळणार नवी दिशा इंदौर शहरातील स्वच्छता आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा घेतला आढावा इंदौर (म.प्र.) ।दिनांक ०५।  महाराष्ट्राच्या  पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे पर्यावरण विषयक अभ्यासासाठी मध्यप्रदेश दौर्‍यावर असून देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरला त्यांनी आज येथे भेट देत शहरातील ठोस कचरा व्यवस्थापन (सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट) प्रणालीची माहिती व आढावा घेतला. स्वच्छता, पर्यावरण आणि शहर व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर येथील अधिकाऱ्यांसमवेत विस्तृत चर्चा केली. पंकजाताई यांच्या या अभ्यास दौर्‍यातून 'स्वच्छ महाराष्ट्र' मोहिमेला  नवी दिशा मिळणार आहे.            देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौर येथे  पंकजाताई मुंडे यांनी बैठकीस उपस्थित राहून स्वच्छता, पर्यावरण आणि शहर व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.या बैठकीस इंदौरचे महापौर  पुष्पमित्र भार्गव, आयुक्त  शिवम वर्मा तसे...

श्रावणी वेदसप्ताह......परळी वैजनाथ.

इमेज
  विवेक जागृतीशिवाय दुःखमुक्ती व आनंदप्राप्ती शक्य नाही ! श्रावणी वेदसप्ताहात आचार्य पं. चंद्रदेवजींचे विचार परळी- वैजनाथ,दि.६-        आजकाल माणूस भौतिक साधने व सुख- सुविधांमध्ये गुरफटत चालला आहे. अविवेक व अनिष्ट विचारांमुळे वाढत चाललेली त्याची बहिर्मुख वृत्ती ही त्याला शाश्वत सुख व आनंदापासून वंचित ठेवत आहे. याकरिता आत्मज्ञानाच्या माध्यमातून विवेक जागृत होणे गरजेचे आहे. त्याशिवाय दुःखमुक्ती आणि आनंदप्राप्ती होऊ शकत नाही, असे विचार प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य पं. चंद्रदेव जी शास्त्री यांनी मांडले.                महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने येथील आर्य समाजात सुरू असलेल्या श्रावणी वेदज्ञान प्रचार सप्ताहात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. गेल्या ३ तारखेपासून त्यांची आध्यात्मिक सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर प्रवचने होत आहेत.         कालच्या सायंकालीन सत्रात त्यांनी "सुखी जीवनासाठी अध्यात्मज्ञान!"या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले - परमेश्वराची अमृतवाणी म्हणून ओळखल...

हे प्राधिकरण निश्चितच विकासात्मक भूमिका बजावेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
पंकजा मुंडेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल: ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ ची स्थापना ! नद्यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात एक नवा अध्याय माझ्यासाठी हे केवळ प्रशासकीय काम नाही तर संकल्प होता - पंकजाताई मुंडे मुंबई, प्रतिनिधी....        राज्यच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राने आज पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी  "महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण" (Maharashtra State River Rejuvenation Authority - MSRRA) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे तसेच सल्लागार संस्थेच्या नमिता रेपे...

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयासाठी शहरात भव्य प्रचार फेरी

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या सुरक्षित भविष्य आणि वेगवान प्रगतीसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयासाठी शहरात भव्य प्रचार फेरी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँकेच्या सुरक्षित भविष्य आणि वेगवान प्रगतीसाठी राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारासाठी शहरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तप्रतिसाद दिला.       वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी येत्या रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार माजी खासदार ...

Congratulations:सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
परळीतील पो.ह.मारुती मुजमुले यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती सर्व स्तरातून अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सर्व परिचित पोलीस कर्मचारी मारुती द्वारकोबा मुजमुले यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या बढती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.            बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील पोलीस हवालदार पदावरील पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर केली असुन यामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले व एक सुसंस्कृत, सुस्वाभावी, संयमी पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले मारुती मुजमुले यांची पदोन्नती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना मिळालेल्या या भरतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संभाजी मुंडे, बालासाहेब फड व नितीन ढाकणे यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!

इमेज
टिव्ही 9मराठीचे रिपोर्टर संभाजी मुंडे व संपादक बालासाहेब फड,संपादक नितीन ढाकणे यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर रविवारी होणार नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा नाशिक( प्रतिनिधी) न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिन निमित्त  वंजारी समाजरत्न पुरस्कार 2025 चा टिव्ही 9मराठीची संभाजी मुंडे तसेच दै. सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड व दै. अतुल्य महाराष्ट्र चे संपादक नितीन ढाकणे यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून श्री मुंडे व फड यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.       न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिन निमित्त  वंजारी समाजरत्न पुरस्कार 2025चेआयोजन रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता  संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजा गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री  धनंजय मुंडे  , माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे ,माजी आ. गोविंद केंद्रे, ह भ प डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, अनिल गर्जे, .कोंडाजी आव्हाड, उद्योजक बुधाजी...

सर्व स्तरातून कौतुक.....!

इमेज
  किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटेने जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पटकवला तिसरा क्रमांक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-             कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. समर्थ धोकटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन  करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.              महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बीड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत, तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचा प्रचार व्हावा यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर...

सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब

इमेज
  वैद्यनाथ बँकेसोबतचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलला विजयी करा मा.खा.प्रितम मुंडे यांचे वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड येथील सभासदांना आवाहन सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब बीड। दि ०४ । वैद्यनाथ सहकारी बँक ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाला सार्थ ठरवणारी बँक आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात बँकेचा लौकिक वाढला आहे. बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. आर्थिकदृष्ट्या बँक अत्यंत सक्षम आहे. बँकेसोबतच नात अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या सभासदांना केले. वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड येथे आयोजित सभासदांच्या मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रितमताई मुंडे बोलत होत्या. वडवणी येथे मा.आ. केशव...
इमेज
अरोही स्टाईल स्टुडीओमुळे असंख्य महिलांचे करिअर घडले-उमाताई समशेट्टे नविन जागेतील स्थलांतर महिलांसाठी सोयीचे-सरोजनीताई हालगे  परळी (प्रतिनिधी)  महिलांनी आपला व्यवसाय सुरु करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी ब्युटी पार्लर व इतर कलांमध्ये निपुन असलेल्या जुन्या परळी भागातील श्रध्दा हालगे(फुलारी) या युवतीने सुरु केलेल्या अरोही स्टाईल स्टुडीओमुळे मागील काही वर्षात असंख्य महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभे करत करिअर घडवले असल्याचे भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी सांगितले तर अरोही स्टाईल स्टुडीओ आता नविन रुपात परळीच्या मुख्य रस्त्यावर सुरु झाल्याने महिलांची सोय झाल्याचे माजी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांनी सांगितले.अरोही स्टाईल स्टुडीओ उर्जा कॉम्प्लेक्स, मिलिंद शाळेजवळ, राणी लक्ष्मीबाई टॉवर रोड येथे स्थलांतरित झाल्यानंतर आयोजित पानसुपारी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  अत्यंत माफक दरात मेकअप व इतर सुविधांच्या उपलब्धतेमुळे परळी शहर व परिसरातील महिला व युवतींच्या पसंतीस उतलेल्या श्रध्दा हालगे (फुलारी) यांच्या अरोही स्टाईल स्टुडीओचे उर्जा कॉम्प्लेक्स येथे स्थलांतर झाले आहे.अधि...

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी घेतली प्रचारात आघाडी

इमेज
वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूक लातुर, उदगीर, पानगाव, रेणापूर आदी ठिकाणच्या सभासदांच्या भेटी घेऊन साधला संवाद लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी घेतली प्रचारात आघाडी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूकीत राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. लातुर, उदगीर, पानगाव, रेणापूर आदी ठिकाणी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.       10 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवार माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, सौ. माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता 13 जागांसाठी मतदान ह...
इमेज
  वैद्यनाथ बँक निवडणुक ; ना. पंकजा मुंडेंचा परळीत मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयाचा केला संकल्प परळी वैजनाथ ।दिनांक ०३। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या निवडणुक प्रचारार्थ सभासद मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला.    बँकेचे अध्यक्ष विनोद सामत यांच्या निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी सभासद मतदारांना संबोधित केले. चेअरमन विनोद सामत यांच्यासह व्हा. चेअरमन रमेश कराड, विकासराव डुबे, शांतीलाल जैन, जुगलकिशोर लोहिया, सूर्यभान मुंडे, सतीश मुंडे, वैजनाथ जगतकर, बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंके, माऊली फड आदी यावेळी उपस्थित होते.     वैद्यनाथ बँकेविषयी आपल्या सर्वाच्याच मनात एक वेगळी भावना आहे, एक वेगळा आदर आहे. लोकनेते मुंडे साहेब यांनी बँकेच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष दिले. या भागाची आर्थिक उन्नती केली. परळीच्या प्रगतीत बँकेचा सिंहाचा वाटा आहे. बँकेला याहून अधिक यशोशिखरावर...