प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 जि.प. शाळा कासारवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी  साजरी!



लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी साजरी झाली. 

गावचे सरपंच श्री बंडू आत्माराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंदांनी साठे आणि टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल शाळेतील शिक्षक श्री सरोज कुमार तरुडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अण्णांचे शालेय शिक्षण, त्याचबरोबर त्यांचा साहित्याचा प्रवास, त्यांनी जीवनात सोसलेले दुःख, केलेली विविध कामे अशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देत शोषित समाजाला आपल्या साहित्यातून मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केल्याचं श्री तरुडे यांनी सांगितले व 'स्मशानातील सोनं' ही कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी शाळेतील शिक्षिका श्रीमती शुभांगी चट यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन आपल्या अभ्यासात ते एकपाठी कसे होते हे सांगत शाळेतील जीवनातील त्यांची कथा विद्यार्थ्यांना सांगितली. 

शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनातील शेंगा खाण्याविषयीची कथा सांगून या प्रसंगाची कविता त्यांच्या गोड आवाजात सादर केली. 

कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले. श्री राजेश्वर स्वामी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या