माजलगाव-केज व माजलगाव-परतूर महामार्ग रस्त्यावरील कामे....
राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) : पॅकेज दुरुस्ती व रस्त्याच्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई |
राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत माजलगाव ते केज (जि. बीड) आणि माजलगाव ते परतूर (जि. जालना) या मार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या संबंधित रस्त्यांच्या कामांची माहिती घेतली गेली. उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव ते केज आणि जालना जिल्ह्यातील परतूर ते माजलगाव या पॅकेजच्या दुरुस्ती व उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्व कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
तसेच माजलगाव शहरात अंमलात आणण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्याची चाचणी तातडीने घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.
बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा